Satara News : उद्या ५ तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Satara News

Satar News । जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार दि. 20जुलै रोजी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. या बाबींचा विचार करता सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण, महाबळेश्वर, जावली, वाई आणि सातारा) मधील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दि. 20जुलै2023 … Read more

कोयना नदी काठावरील ‘या’ गावच्या पाणवट्यावर मगरीचे दर्शन

Koyna River Crocodiles News

कराड प्रतिनिधी | कराड व पाटण तालुक्यातील कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढत होत आहे. दरम्यान, आज अचानक नदीकाठच्या गावात राहणाऱ्या काही ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाले आहे. निसरे ग्रामपंचायतीचा कर्मचारी शरद कोळी हा पाण्याच्या टाकीत टीसीएल टाकण्यासाठी गेला असताना त्याला नदीपात्राच्या कडेला मगर दिसल्याने त्याने याबाबत गावातील ग्रामस्थांना कलपणा दिली. नदीकाठच्या गावांमध्ये मगरीचे दर्शन होऊ लागल्यामुळे … Read more

जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यानं महिलेसोबत केलं ‘हे’ कृत्य

Karad City Police

कराड प्रतिनिधी : कराड शहरात जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याला पुरुषांप्रमाणे आता महिलाही बळी पडू लागल्या आहेत. असाच प्रकार कराड शहरात घडला असून एका तरुणाने महिलेला पैशांची गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देतो असे सांगत फसवणूक केली आहे. याबाबत तबस्सूम हमीद शेख (रा. मलकापूर) यांनी कराड शहर पोलीस … Read more

फलटणमध्ये २२ गावच्या ग्रामस्थांनी ट्रॅक्टरसह काढला मोर्चा; केली ‘हि’ महत्वाची मागणी

Phaltan News

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील सुमारे 22 गावातील शेतकरी व नागरिकांनी ट्रॅकटरमधून फलटण येथील जलसंपदा कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मंगळवारी मोर्चा काढला. यावेळी या मोर्चामध्ये महिला व अबाल वृद्ध शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी मोर्चातील महिला व शेतकरी यांनी ‘अस्तरीकरण हटाव शेतकरी बचाव’, जल है तो कल है, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर … Read more

खड्डा पाहण्यासाठी ‘तो’ खाली उतरला; अचानक मशीन सुरु होताच शरीराचे अक्षरशः झाले तुकडेच तुकडे

Crime News Satara

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावर काम सुरू असताना एक भयानक घटना घडली. याठिकाणी काम करत खड्डा पाहण्यासाठी एक तरुण कामगार खाली उतरला असताना अचानक मशीन सुरु झाल्याने त्याच्या शरीराचे अक्षरश: तुकडेच -तुकडे झाले. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री खेड फाट्यावर घडली. करुणेश कुमार (वय २९, रा. अतीत, ता. सातारा, मूळ … Read more

अगोदर घातलं उंदीर मारण्यासाठी औषध, नंतर त्याच हाताने मळली तंबाखू; पुढं घडलं असं काही…

Crime News

सातारा प्रतिनिधी । कधी कधी आपण घाई गडबडीत एखादी अशी कृती करतो कि ती एकदा आपल्या जीवानिशी येते. अशीच कृती महाबळेश्वर येथील एका युवकाने केली आहे. ज्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.ज्या हाताने उंदीर मारण्याकरिता विषारी औषध घातले व त्याच हाताने तंबाखू मळून खाल्यामुळे विषबाधा होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उमेश … Read more

शेतकऱ्यांना दर्जेदार कृषि निविष्ठांचा पुरवठा करा; जिल्हाधिकारी डुडी यांचे निर्देश

Jitendra Dudis News

कराड प्रतिनिधी । शेतकऱ्यांची बियाणे, खते, व किटकनाशके या कृषि निविष्ठांमध्ये फसवणूक होवून त्यांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी कृषि विभागाने काटेकोर दक्षता घ्यावी. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार नाही. गुणवत्ता नियंत्रणामध्ये ज्या बियाणे, खते, आणि किटकनाशकांचे नमुने अप्रामणित आढळून ज्या कंपन्या कोर्ट केस पात्र ठरल्या आहेत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी. कृषि निविष्ठा … Read more

कोयना धरण क्षेत्रात मुसळधार; 24 तासात ‘इतका’ TMC वाढला पाणीसाठा

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. धरण 25 टक्के भरले असून नवजा व महाबळेश्‍वर परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5 TMC पाणीसाठा वाढला असून १५० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. कोयनानगर येथे 77 (1149) मिलिमीटर, नवजाला … Read more

एकीव धबधब्याच्या कड्यावरून पडलेल्या ‘त्या’ दोन तरुणांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं

Crime News (7)

कराड प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील एकीव येथील धबधब्याजवळील ७०० फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात होता. तपासादरम्यान या तरुणांचा धबधब्यात पडून नाही तर त्यांना ढकलून देत त्यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी वादावादी झाल्यानंतर अनोळखी दोन पर्यटकांनी दोघा तरुणांना दरीत … Read more

डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांतून कराड दक्षिणमधील रस्ता सुधारणेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर

Atul Bhosale News

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ११ रस्ते हे अत्यंत … Read more

कराडमधील दरोड्याप्रकरणी दोघांना अटक; 4 दिवसाची कोठडी

jpg 20230710 104226 0000

कराड प्रतिनिधी । कराड येथील शिंदे मळ्यातील डॉक्टर शिंदेंच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून सुमारे 46 लाख 20 हजारांचे सोन्याचे दागिने व रक्कम घेऊन पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान टोळीतील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कुलदीप सिंग … Read more

पाणी टंचाईग्रस्त भागात तातडीने उपाययोजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत खंडाळा, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा या पाच तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. तसेच माण, खटाव, फलटण, कोरगाव, वाई, कराड या सहा तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. या गावात विहीर अधिग्रहण करण्याच्या अधिकाराला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यानी … Read more