कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ; नदीने ओलांडली धोक्याची पातळी

Koyna News 20240803 080837 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायमच आहॆ. त्यात हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या २४ तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ९६ नवजा येथे १३१ तर महाबळेश्वर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. … Read more

कराडला 150 ट्रॅक्टरची निघाली भव्य रॅली; चौका चौकात एक मराठा लाख मराठाचा जयघोष

Karad News 20240803 073033 0000

कराड प्रतिनिधी | मराठा समाजाच्या न्याय व हक्कांसाठी लढणार्‍या मनोज जरांगे पाटील यांनी सगसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसह मराठा समाजावरील अन्याया विरोधात कराड शहरात शुक्रवारी मराठा समाज बांधवांच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे 150 ट्रॅक्टर सहभागी करण्यात आले होते. प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन ही रॅली समाप्त करण्यात आली. याच रॅलीचा … Read more

इमारतीवरून ढकलून देऊन प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकरास अटक; 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Karad News 20240802 215851 0000

कराड प्रतिनिधी | दुसऱ्या मुलाशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रेयसी आरूषी मिश्रा हिला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकराला आज शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी संशयितास दि. ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ध्रुव राजेशकुमार छिक्कारा, असं त्याचं नाव आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर तरुणीला दिलं ढकलून … Read more

उद्योगांनी स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे : जीवन गलांडे

Satara News 20240802 210339 0000

सातारा प्रतिनिधी | वीज, पाणी, स्वच्छता यासारख्या पायाभूत सुविधा विनाविलंब व विनाअडथळा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यंत्रणांनी उद्योगांना या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. याबरोबरच औद्योगिक विकासामध्ये स्थानिक जनतेला योग्य वाटा मिळावा यासाठी सुक्ष्म, लघु, मध्यम, मोठ्या व विशाल औद्योगिक उपक्रमांमध्ये किमान 80 टक्के स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची तात्काळ … Read more

काँग्रेसचा वापर करून भाजपमध्ये गेलेल्या गद्दारांना गाडण्यासाठी कामाला लागा; रणजितसिंह देशमुखांची जयकुमार गोरेंवर टीका

Satara News 20240802 194505 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे माण तालुका काँग्रेस कमिटीची नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली. “पैशाच्या बळावर विजय मिळवायचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला जनतेने लोकसभा निवडणुकीत जागा दाखवली आहे. आता सुद्धा भाजपकडून विविध योजनांचे प्रलोभन दाखविण्यात येत आहे. … Read more

कोरेगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार; आमदार शशिकांत शिंदेंची मोठी घोषणा

Shahikant Shinde News 20240802 180625 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अनेक पक्षांच्या नेत्यांच्या बैठका देखील घेण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी आज साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेत कोरेगाव मतदारसंघातून मी लढणार असल्याची घोषणा केली. ‘काहीही असू देत मी कोरेगाव मतदारसंघातूनच … Read more

कराड बाजार समितीच्या सभापतिपदी प्रकाश पाटील यांची निवड

Prakash Patil News 20240802 171920 0000

कराड प्रतिनिधी | कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश पाटील सुपणेकर यांना संधी देण्यात आली आहे. विजयकुमार कदम यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची वर्णी लागली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. शेती उत्पन्न बाजार … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंच्या विरोधात याचिका करणाऱ्या देशमुख यांच्या घरावर ED चा छापा

Jaykumar Gore News 20240802 162116 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या दीपक देशमुख यांच्या घरावर आज सकाळच्या सुमारास ईडीने छापा टाकला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणीतील मायणी मेडिकल कॉलेजचे सर्वेसर्वा देशमुख कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ईडीचे पथक मायणीत दाखल झाले. देशमुख कुटुंबातील सदस्यांची चौकशी सकाळी सहापासून सुरू होती. मायणी येथील श्री … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; 24 तासांत 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ

Koyna Rain News 20240802 132334 0000

पाटण प्रतिनिधी | भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करुन तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे. आज कोयना धरणात 86.63 टीएमसी … Read more

कराड, शिरवळमधील सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्यांवर कारवाई, सहाजण दोन वर्षांसाठी तडीपार

Crime News 20240802 124430 0000

सातारा प्रतिनिधी | सातत्याने गुन्हे करणाऱ्या कराड आणि शिरवळमधील ६ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. यामध्ये कराडमधील ४ आणि शिरवळमधील २ जणांचा समावेश आहे. कराड मधील चौघांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तर शिरवळ मधील दोघांना सातारा, पुणे व सोलापुर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून बेलवडे हवेलीच्या नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार

Karad News 20240802 121140 0000

कराड प्रतिनिधी | बेलवडे हवेली गावच्या सरपंच पदी सौ. अंजना प्रकाश पवार यांची सर्वानुमते निवड झाली. सौ. पवार या काँग्रेस पक्षाच्या सदस्यां असून त्यांची सरपंच पदी नियुक्ती झाल्याने गावातील काँग्रेसच्या सदस्यांना एक ताकद मिळाली आहे. यानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील … Read more

‘लोकशाहिरां’च्या भारतरत्न पुरस्काराची शिवेंद्रसिंहराजेंची फडणवीसांकडे मागणी

Shivendraraje Bhosale News 20240802 114107 0000

सातारा प्रतिनिधी | मुंबई येथे भाजप आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दलित साहित्याचे संस्थापक असलेल्या लोकशाहिरांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही मोलाची भूमिका बजावली आहे. अशा या थोर समाजकारणी, लोकहितवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. … Read more