इर्शाळवाडीहून NDRF ची टीम थेट कराडात दाखल

NDRF Team Karad News

कराड प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इर्शाळ गडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडली. या ठिकाणचे बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर NDRF ची टीम आज बुधवारी दुपारी 3 वाजता कराडात दाखल झाली. सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली … Read more

कराड तालुक्यात 3 बिबट्यांची दहशत; रात्रीस ‘या’ गावात वावर

3 Leopards Agai Karad News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात रात्रीच्यावेळी अगोदरच चोरट्यांकडून धुमाकूळ घेतला जात असताना आता तालुक्यात तब्बल 3 बिबटे आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री ठीक 1 वाजून 34 मिनिटांनी रस्त्यावरून जात असलेली या बिबट्यांची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. याबाबत अधिक माहिती की, कराड तालुक्यातील वराडे गाव … Read more

अवैध गुटखा वाहतुकीवर शाहुपूरी पोलीसांची धडक कारवाई, एक जणास अटक; 92 हजाराचा मुद्देमाल जप्त

Gutkha News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थाची विक्री व वाहतुक करणाऱ्या एका युवकास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून सुमारे 92 हजार 130 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्वर नजीर सय्यद (वय 45, रा. 203 बुधवार पेठ सातारा ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत … Read more

कराडात कारगिल शौर्य दिन साजरा; विजय दिवस चौकात स्मृतीस्तंभाला अभिवादन

Kargil Valor Day is celebrated in Karad News

कराड प्रतिनिधी । 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धामध्ये भारताने विजय संपादन केले. या विजयाप्रित्यर्थ हा दिवस ‘कारगिल शौर्य दिन’ म्हणून कराड येथे साजरा केला जातो. आज बुधवारी सकाळी येथील विजय दिवस चौकात विजय दिवस समारोह समिती व त्रिशक्ती फाउंडेशन यांच्या वतीने कारगिल शौर्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी विजय दिवस चौकात असणाऱ्या विजयस्तंभाला मान्यवरांच्या हस्ते … Read more

साताऱ्यातील फुटक्या तलावातील हजारो माश्यांचा मृत्यू

Death of Fish Futka Lake Satara News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध असलेल्या फुटक्या तलावातील हजारो मासे आज, बुधवारी सकाळी अचानक मृत्युमुखी पडले आहेत. या घडलेल्या प्रकारानंतर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काही नागरिकांच्या मदतीने तलावातील मृत पावलेले मासे तात्काळ बाहेर काढले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फुटके तळे आहे. या … Read more

कासकडे जाणाऱ्या मार्गावर भेगा पडल्याने 2 बस अडकल्‍या

Kas lake in Satara News

कराड प्रतिनिधी । सध्या महाबळेश्वर, पाटण तालुक्यात पाऊस कोसळत असल्यामुळे या ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत आहेत. तसेच तलावही भरल्याने त्या ठिकाणी पर्यटकांकडून गर्दी केली जात आहे. मात्र, पावसाळ्यात दरडी कोसळणे, भेगा पडणे आदी घटना घडत आहेत. अशीच घटना बुधवारी सकाळी घडली. साताऱ्याच्या कास पठाराकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेगा पडल्या आहेत. त्‍यामुळे या मार्गावरून … Read more

तुला जिवंत सोडत नाही म्हणत ‘त्यांनी’ युवकावर केला कोयत्याने हल्ला

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराडात पूर्ववैमन्यातून हल्ल्याच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना कराड येथील सह्याद्री दूध डेअरीसमोर घडली. आपल्या आजीचे औषध आणण्यासाठी गेलेल्या एका युवकावर धारदार कोयत्याने ४ जणांनी कोयत्याने वार केले. ही घटना कराड शहरातील मंगळवार पेठेत मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली असून या हल्ल्यात आयेजरजा अल्ताफ मुजावर (वय १९, रा. गुरूवार पेठ, कराड) … Read more

दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी?

Bomb Blast Test News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क झाले असताना जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकास दिली. त्यानुसार याबाबतची माहिती संबंधित पथकाने आज पुणे जिल्हा न्यायालयास दिली … Read more

कराड उत्तरमधील प्रत्येक ZP गटात काँग्रेसची ताकद वाढविण्यावर भर देणार : श्रीरंग चव्हाण

Srirang Chavan News

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विभाग हा कायमच काँग्रेस विचारांच्या पाठीशी राहिला आहे. काँग्रेसची विचारधारा जपणाऱ्या या कराड उत्तर मतदार संघात तसेच जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे संघटन मजबूत करून ताकद वाढविण्यावर भर देणार असल्याचे मत सातारा जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी यावेळी केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नुकताच कराड उत्तर विधानसभा मतदार … Read more

पाटण तालुक्यातील टोळेवाडी रस्त्यावर दरड कोसळली

Patan Tolewadi News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातीळ महाबळेश्वर, पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्याला आला असताना आज पाटण तालुक्यातील टोळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली असून या परिसरात आणखी दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता हा रस्ता वाहतुकीस … Read more

भूस्खलन, दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा; जिल्हाधिकारी डुडींचे महसूल यंत्रणेला आदेश

Collector Jitendra Dudi News 1

सातारा प्रतिनिधी । हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा वेळोवेळी दिला जात आहे. सातारा जिल्हयाला ज्या-ज्या वेळी संबंधित विभागाकडून रेड अथवा ऑरेन्ज अलर्टचा इशारा दिला जाईल अशावेळी पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा या तालुक्यातील भूस्खलन, दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल विभागास दिले आहेत. जिल्हाधिकारी डुडी यांनी महसूल विभागातील … Read more

सातारा शहरातील खड्ड्यांत तरंगल्या कागदी होड्या! AAP च्या कार्यकर्त्यांचं अनोख निषेध आंदोलन

Satara Protest AAP Workers News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांकडे पायिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी चक्क खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून व वृक्षारोपण करून पालिकेच्या कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. … Read more