2 वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेतलेला महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला

Satara News 20240803 210647 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेतली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. आज, अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घटना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे. संचिता साळुखे (वय 22) असं या महिलेचं नाव असून … Read more

जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेसाठी 4 लाख 18 हजारांवर अर्ज; ‘इतके’ लाख शेतकरी झाले सहभागी

Satara News 26

सातारा प्रतिनिधी । शासनाकडून पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपया भरून पीक संरक्षण दिले जात असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार यावर्षी खरीपसाठी मुदतीत ४ लाख १८ हजारांवर अर्ज दाखल झाले असून १ लाख ५२ हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे … Read more

लायन्स क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी जितेंद्र ओसवाल

Karad News 13

कराड प्रतिनिधी । लायन्स क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी जितेंद्र ओसवाल तर सचिवपदी अविनाश भिसे आणि खजिनदारपदी सुप्रीम तावरे यांची निवड करण्यात आली आहे. 58 वर्षाची परंपरा असलेला कराड लायन्स हा सर्वात जुना क्लब आहे. लायन्स क्लब कराडचा कायमस्वरूपी प्रकल्प असलेल्या आर. के. लाहोटी लायन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून पन्नास हजाराहून अधिक रुग्णावर मोफत डोळे शस्त्रक्रिया करण्यात … Read more

जिल्ह्यात रिमझिम पाऊस; कोयना धरणात पाणीसाठा किती?

Koyna News 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आज कमी झाला असून धरणात देखील पाण्याची आवक काहीशा प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, कोयना धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली असून वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वरला 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील पाणीसाठा 86.63 टीएमसी झाला … Read more

काँग्रेसच्या तासवडे टोलनाक्यावरील टोलविरोधी आंदोलनाला यश; 100 टक्के टोल माफीचे NHAI कडून पत्र

Karad News 12

कराड प्रतिनिधी । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडेतील टोलनाक्यावर आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनास यश मिळाले आहे. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून तासवडे टोलनाका परिसरातील 20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना 100 टक्के टोल माफी करण्यात आली … Read more

देशमुख कुटुंबाच्या घरावर ED ने धाड टाकताच प्रभाकर देशमुखांनी केली महत्वाची मागणी; म्हणाले; “जे काही सत्य आहे ते…”

prbhakar deshmukh News

सातारा प्रतिनिधी । भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात कोरोना काळातील भ्रष्टाचाराची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख व त्यांचे चुलत बंधू हिंमत देशमुख यांच्या घरावर ‘ईडी’ने शुक्रवारी सकाळी धाड टाकली आहे. ईडीच्या झोन-२ मुंबई कार्यालयातून दोन उच्च अधिकारी व त्यांच्यासोबत २२ सीआरपीएफच्या जवाणांनी सकाळी सात वाजता घरावर धाड टाकली. यावरून सध्या माण, … Read more

घरांच्या छपरांवरच ऊर्जा निर्मिती; मान्याचीवाडी गाव झाले राज्यातील पहिले सौरग्राम

Patan News 5

कराड प्रतिनिधी । विविध शासकीय उपक्रमांसह राष्ट्रीय उपक्रमांमध्ये नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील घरांच्या छपरांवर आता सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. घरांच्या छपरांवर तब्बल शंभर किलोवॕट वीज निर्मिती करणारी मान्याचीवाडी लवकरच सौरग्राम म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करेल. घरोघरी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून सौरऊर्जा प्रकल्पाच्या … Read more

पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आक्रमक; शिरवळमधील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात संप

Shirval News

सातारा प्रतिनिधी । राज्यभरातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर गेलेले आहेत. महाविद्यालयीन शिक्षण, तसेच विद्यालयांना जोडलेल्या पशुचिकित्सालयांवरही बहिष्कार विद्यार्थ्यांद्वारे टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय एरवी गजबजलेले असलेल्या या महाविद्यालयासमोर शुकशुकाट पसरला आहे. यासर्व महाविद्यालयातील चार हजार विद्यार्थ्यांनी १ ऑगस्टपासून संप पुकारला आहे. राज्य सरकार खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी … Read more

“पैसा जनतेचा, मोदी-गडकरींच्या खिशातील नाही”; पृथ्वीराज बाबांचा हल्लाबोल; काँग्रेसचे कराडच्या तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

Congress News 1

कराड प्रतिनिधी । पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यावर आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व वाहने टोल न घेता सोडून दिली. प्रशासनाने टोलबाबत ठोस भूमिका घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण … Read more

‘सातारा झेडपीत नोकरी लावतो,’ सांगत ‘त्यांनी’ तिघांना लावला चुना; चरेगावच्या संशयित दोघांवर गुन्हा दाखल

Crime News 6

सातारा प्रतिनिधी । “सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कामाला लावतो”, असे सांगून जिल्ह्यातील ३ युवकांची सुमारे ६ लाख रुपयांची दोघांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी आकाश संभाजी कोळी (वय ३०) व अमित अशोक माने (वय ३३, दोघे रा. चरेगाव, ता.कराड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ऋषीकेश धनाजी न … Read more

पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

Crime News 20240803 102920 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने पर्यटनस्थळांकर बंदी घालण्यात आली असताना देखील पाटण तालुक्यातील पर्यटनस्थळी पर्यटक हुल्लडबाजी, दंगामस्ती व कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. अशा हुल्लडबाजी करणाऱ्यावर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडू नये म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाटण … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 80 लाखाचा केला अपहार; 4 संशयितांना अटक

Crime News 20240803 091337 0000

सातारा प्रतिनिधी | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून जवळपास ऐंशी लाख रुपयांचा अपहार झाल्याबाबतची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी सर्व संशयित आरोपींना खंडाळा पोलिसांनी मुंबई, मनमाड, संभाजीनगर या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भीमसेन भालेराव, चित्रसेन भालेराव, मयूर व्यवहारे, जैन राहुल पालवे या सर्व संशयिताना न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more