उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कराड मुक्कामी; BJP कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन

Devendra Fadnavis to stay in Karad

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभर महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत कराडला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. 22) सकाळी 11 वाजता कराड येथे भव्य … Read more

साताऱ्याचे सुपुत्र जवान सुरज यादव यांना नागा बॉर्डर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण

martyred Soldier Suraj Yadav

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे गावचे सुपुत्र व जवान सूरज मधुकर यादव हे आसाम दिवापूर येथे नागा बॉर्डरवर सेवा बजावत शहीद झाले. जवान सुरज यांनी रोइंगमध्ये राष्ट्रपती पदक पटकावले होते. त्यांची 14 वर्ष सेवा झाली असून ते 111 इंजीनियरिंग रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील येरवळे गावचे … Read more

गहू, तूर व उडीद अतिरिक्त साठा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार : जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने

Vaishali Rajmane agriculture (1)

कराड प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार गव्हाच्या साठ्यावरील निर्बंध 31 मार्च 2024 पर्यंत तर तूर व उडीद डाळींच्या अतिरिक्त साठ्यावरील निर्बंध 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू केले आहेत. या अधिसुचनेपासून व्यापाऱ्यांना 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत गव्हाचा साठा कमी करणे आवश्यक राहील. मात्र, साठेबाजी केल्यास अशा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, … Read more

लोणंद येथे रेल्वेच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Ananda Varkat Death Train Accident

सातारा प्रतिनिधी । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सरवडे (जि. कोल्हापूर) येथील आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) या वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडली. आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत सहभागी झाले होते. वारीत ते ट्रकचालक म्हणून काम करत होते. त्यांचा अपघाती मृत्यू … Read more

Satara News : जिल्ह्यातील १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमचे रद्द; शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी ‘या’ नंबरला फोन करावा..

Satara News

Satara News | खरीप हंगाम 2023 च्या पार्श्वभूमीवर अप्रमाणित बियाणे, खते, किटकनाशके विक्री करणाऱ्या 14 कृषि सेवा केंद्रांवर कृषि विभागाने कारवाई करून त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये 3 बियाणे विक्रेते, 9 खत विक्रेते, व 2 किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे. तसेच 2 खत विक्रेते व 1 किटकनाशक विक्रेते यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे कृषि … Read more

लोणंद मुक्कामात आरोग्य विभागाकडून 5 हजार 269 माऊलीच्या वारकऱ्यांची तपासणी

health department Warkari

कराड प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात काल आगमन झाले. माऊलीच्या पादुकांचे नीरा स्नान केल्यानंतर पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला आहे. या ठिकाणी पालखीसोबत लाखो वारकरी थांबले आहेत. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत एकूण 5 हजार 269 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहेत. यासाठी याठिकाणी … Read more

जिल्ह्यातील नवीन कामांचे प्रस्ताव तात्काळ मान्यतेसाठी सादर करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Collector Jitendra dudi

कराड प्रतिनिधी । सातारा येथील जिल्हाधिकार्यालयात आज जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-24 अंतर्गत दायित्व निधी मागणी व नवीन कामांचे प्रस्ताव लवकरात लवकर मान्यतासाठी सादर करावेत व प्रशासकीय मान्यता घेऊन ऑगस्ट … Read more

इगो हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही; खासदार उदयनराजे भोसले

Udayanaraje Bhosale Shambhuraj Desai Shivendraraje Bhosale.

सातारा प्रतिनिधी । उदयनराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांच्यातील हे इगो वॉर असून, त्यात सातारकर आणि शिवप्रेमी अडकले आहेत, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती. त्यांच्या टिकेला आज खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिउत्तर दिले. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमचे सलोख्याचे संबंध आहेत. माझा कोणत्याही कामाला विरोध नाही; परंतु पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे पावित्र्य हे … Read more

इंच ना इंच जमीन पाण्याखाली येत नाही, तोपर्यंत काम करत राहणार : आ. महेश शिंदे

Mahesh Shinde News

कराड प्रतिनिधी । कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजना १९९७ मध्ये मंजूर झालेली ही उपसा सिंचन योजना युती सरकार सत्तेतून जाताच बासनात गुंडाळली होती. कालांतराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. बुद्धीभेदाचे व लबाडीचे राजकारण करत केवळ बोंबा मारणाऱ्यांकडे आता दुर्लक्ष … Read more

कराडात चोरट्यांनी फोडले प्रसार माध्यमांचे कार्यालय; तब्बल इतकी रक्कम केली लंपास

karad crime

कराड प्रतिनिधी | कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांकडून घडफोडीचे प्रकार केले जात आहेत. आता चोरट्यांनी काही कार्यालयांकडे आपला मोर्चा वळवला असून त्यांनी कराड शहरातील एका प्रसार माध्यमाचे कार्यालय फोडून सुमारे 50 हजाराचे साहित्य तसेच रोकड लंपास केल्याची घटना शनिवार पेठेत पंचायत समितीनजीक रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत प्रकाश काशिनाथ पिसाळ (रा.कार्वे, ता. कराड) यांनी … Read more

माऊलींच्या पालखी सोहळ्यात आजी-माजी पालकमंत्री आले एकत्र; पुढं घडलं असं काही…

Shambhuraj Desai Balasaheb Patil Makarand Patil

कराड प्रतिनिधी । संतोष गुरवसातारा जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर अनेकदा टीका करत असतात. मात्र, ते कधीकाळी एखाद्या कार्यक्रमाच्या निम्मिताने एकत्रित येतात. एकत्रित आल्यानंतर त्यांच्यात अनेक विषयांवर गप्पा रंगतात. त्याचा प्रत्यय आज आला. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद … Read more

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत; नीरा नदीच्या तिरावर पादुकांचे स्नान

Mauli palkhi Ceremony News

कराड प्रतिनिधी । टाळ मृदंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरेकडे प्रस्थान झाले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माऊलींच्या पादुकांचे नीरा दत्तघाटावर स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी माऊलीच्या पालखीचे प्रशासनाच्यावतीने … Read more