महाबळेश्वरातील जनरेटर स्फोट दुर्घटनेप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल

Mahabaleshwar News 20231024 233916 0000 1 jpg

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर कोळी आळी येथे दुर्गादेवीच्या मिरवणुकीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश प्रताप पिसाळ (वय 28, रा. आखाडे, ता. जावली), असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दुर्गादेवीच्या मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पाईपचा भीषण स्फोट झाल्याची घटना महाबळेश्वर येथे मंगळवारी … Read more

रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत आ. पृथ्वीराजबाबा गटाला जोरदार धक्का; डॉ. अतुल भोसले गटाच्या 7 जागा बिनविरोध

Rethere Budruk Gram Panchayat Elections News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी डॉ. अतुल भोसले गटाच्या समर्थकांनी विरोधी आ. पृथ्वीराज चव्हाण गटावर सरशी केली आहे. सत्ताधारी भोसले समर्थक गटाच्या कृष्णा विकास आघाडीच्या ७ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, गेल्या ३५ वर्षांत इतक्या जागा एकाचवेळी बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. … Read more

‘जयवंत शुगर्स’कडून ऊस बिलाचा 50 रुपये अंतिम हप्ता जाहीर; डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा

Jaywant Sugars Sugar Factory News 20231025 143226 0000 jpg

कराड प्रतिनिधी | धावरवाडी, ता. कराड येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यास सन २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन ५० रुपयांप्रमाणे अंतिम ऊसबिल देण्याचा निर्णय जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला आहे. येत्या २७ ऑक्टोबरला ही रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असून, यामुळे जयवंत शुगर्सच्या ऊस उत्पादकांना गेल्या हंगामाच्या ऊसबिलापोटी … Read more

महाबळेश्वरमधील भीषण स्फोटात 8 चिमुकले गंभीर जखमी; थरारक घटनेचे CCTV फुटेज आले समोर…

Crime News 4 jpg

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर येथील कोळी आळी मधील दुर्गा माता मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी रायटी जनरेटरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. जनरेटरच्या पेट्रोल पाईपला गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला. या घटनेमुळे मोठा स्फोट होऊन दुर्घटना घडली. या अपघातामध्ये दुर्गा देवीच्या मूर्तीजवळ बसलेली ८ छोटी मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर सातारा व पुणे येथील … Read more

मेढा पोलिसांची गुटख्याच्या वाहतुकीवर धडक कारवाई; कारसह 5 लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त

Medha Police Crackdown News 20231025 114916 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । बेकायदेशीररीतीने गुटखा व पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर मेढा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एका चारचाकी गाडीसह 5 लाख 76 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना कुडाळ- पाचगणी रोडवर मंगळवारी घडली. आकाश प्रकाश मोरे (वय- 32 वर्षे, रा. विराटनगर, अमृतवाडी, ता. वाई) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची पोलिसांकडून मिळालेली … Read more

संपूर्ण जिल्हाभर सुरु आहे सातारा पंचायत समितीतील ‘या’ अनोख्या पाटीची चर्चा!

Satara Panchayat Samiti News jpg

सातारा प्रतिनिधी । एखादा शासकीय कार्यालयातील अधिकारी किव्हा कर्मचारी म्हंटलं की त्यांच्या मागेपुढे करण्याबरोबरच कागद टेबलावरून हलविण्यासाठी अनेक प्रलोभने दिली जातात.कामे झटपट आणि गुपचूप करून घेण्यासाठी काहीजण पैशांचीही ऑफर पुढे करतात. कारण ‘साहेब काही मिळणाऱ्या पगारात खुश नसतील, असं त्यांना वाटत असते. मात्र, सातारा पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेल्या सतीश बुद्धे यांनी … Read more

कुटुंब गेलं देवदर्शनाला अन् चोरट्यांनी बंद घरावर मारला डल्ला; तब्बल 50 तोळे दागिने केले लंपास

Pahalatan Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । आपल्याला सुखसमृद्धी लाभू दे, घरात भरभराटी होऊ दे अशी असे मागणे मागत संपूर्ण कुटूंब देवदर्शनासाठी तुळजापूरला गेलं अन पाठीमागे घरात विपरीत घडलं. बंद घर असल्याचे पाहात अज्ञात चोरटयांनी चोरी करत तब्बल 50 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची घटना फलटण तालुक्यातील जिंती येथे घडली आहे. या घटनेमुळे फलटण शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून … Read more

फलटण मराठा क्रांती मोर्चाचे उद्यापासून तहसील कार्यालयाबाहेर साखळी उपोषण

Pahalatan News jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव एकवटले आहेत. दरम्यान, जरांगे- पाटील यांच्या पाठींब्यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीने उद्या बुधवार, दि. २५ ऑक्टोंबर पासूनफलटण तहसील कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करण्याचा निर्णय सकल मराठा समाज फलटण तालुका यांच्यावतीने घेण्यात आला आहे. फलटण येथील मराठा क्रांती मोर्चाच्या बांधवांच्या … Read more

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी सुरक्षा रक्षकांना मिळेना पगार; 6 महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत

Karad News 7 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यात कंत्राटी भरतीच्या जीआरवरून चांगलच राजकारण तापले आहे. अशात आता कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सध्या कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांवर एन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे. कारण येथील कार्यरत असलेल्या सांगली सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक अजित पाटील यांच्यासह सात सुरक्षा रक्षकांना गेल्या सहा महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. … Read more

सातारच्या प्रतापगडावरील भवानीमातेचे उदयनराजे यांनी घेतले दर्शन!

Satara News 8 2 jpg

सातारा प्रतिनिधी । पवित्र खंडेनवमीचे औचित्य साधत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी प्रतापगडनिवासिनी भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी अभिषेक व होमहवन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस भवानी मातेची भक्ती भावाने आराधना केली. खा. उदयनराजे भोसले दरवर्षी भवानी मातेच्या दर्शनाला गडावर येत … Read more

Satara News : मराठा आरक्षण कुणाच्या काळात अन् कुणामुळे मिळणार?; राजेश क्षीरसागर यांचे मोठे विधान

Satara News 7 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीचा आणि त्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सध्याच्या राज्य सरकारकडून मराठा समाजबांधवांना आरक्षण दिले जावे, अशी सर्वत्र मागणी होत असता सातारा येथे आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मराठा आरक्षण कुणामुळे आणि कुणाच्या काळात मिळणार याबाबत एक मोठे विधान केले … Read more

दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किशोर बेडकिहाळ

Satara News 6 jpg

सातारा प्रतिनिधी । दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्यावतीने सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ येथे दि. १६ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांची निवड करण्यात आल्याची घोषणा साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी नुकतीच केली. दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांनी सातारा येथील … Read more