कुटुंब साखर झोपेत असताना चोरटयांनी मारला 13 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Vathar Station Police Station News jpg

सातारा प्रतिनिधी । कुटुंब साखर झोपेत असताना चोरटयांनी गुपचूप घरात प्रवेश करून तब्बल १३ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे घरातील महिलेसमोर हा प्रकार घडला. नांदवळ, ता. कोरेगाव येथील एक घरातघडलेल्या चोरीच्या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदवळ येथील अमोल पवार, त्यांची पत्नी प्रियंका आणि वडील … Read more

तारळे अत्याचार प्रकरणातील मोकाट आरोपीला तातडीने अटक करा : शिवसेना उपनेत्या छाया शिंदे

Karad News 4 jpg

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील तारळे येथील एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी तेथीलच दोन सख्ख्या भावांवर विनयभंग व अत्याचार हा गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला असला तरी दुसरा मात्र मोकाट फिरत आहे. पोलीस कोणाच्यातरी दबावापोटी त्या संशयिताला अटक करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या छाया … Read more

सातारा जिल्ह्यात 1 लाख 32 हजार 447 आनंदाचा शिधा वाटप : वैशाली राजमाने

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । सर्व सामान्यांची दिपावली आनंदी व उत्साहात साजरी व्हावी यासाठी शासनामार्फत आनंदाचा शिधा वाटप केले जात आहे. हा शिधा रास्त भाव दूकानांच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचविला जात आहे. दिपावली सणानिमित्त सातारा जिल्ह्यात आनंदाचा शिधावाटप सुरु असून यामध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत 1 लाख 32 हजार 447 आनंदाचा शिधा सच वाटप झाले … Read more

कुठं हाय क्रेनचा चालक…म्हणत 15 जणांनी केली दोघांना बेदम मारहाण, पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । तुमच्या क्रेनचा चालक कुठं हाय? अशी विचारणा करत १० ते १५ जणांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना सातारा शहराजवळ नुकतीच घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १५ जणांविरोधात दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. याबाबत पोलिसांनी व यश प्रमोद चतूर (रा. जरंडेश्वर नाका, खेड सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, दि. ८ नोव्हेंबर … Read more

शिधा वाटपात सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिल : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 1 2 jpg

सातारा प्रतिनिधी । गौरी पुजन सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटपात सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर होता. आता दिपावली सणानिमित्त शिधा वाटपातही राज्यात प्रथम क्रमांकवर राहिल, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी व्यक्त केला. सातारा येथील करंजे पेठेतील काळ भैरवनाथ सांस्कृतिक सभागृहात जिल्हाधिकारी श्री. डूडी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, … Read more

साताऱ्यातील प्रतापगंज पेठेत फटाक्यांमुळे घराला लागली आग; परिसरात धुराचे लोट

Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । दिवाळी सणामुळे सर्वत्र फटाक्यांची दुकाने लागलेली आहेत. तर अनेकजण फटाके खरेदी करून ते घरामध्ये ठेवत आहेत. मात्र, फटाके ठेवताना त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर ती घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. अशीच घटना साताऱ्यातील मध्यभागी असणाऱ्या प्रतापगंज पेठेत गुरुवारी रात्री घडली. येथील SBI बँकेसमोरील घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे घराला आग … Read more

दिवाळीला गावी आला अन् गाडीवरील ताबा सुटला; पुढं घडलं असं काही…

Mhasvad News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या दिवाळी सणामुळे सुट्टी लागल्याने मुंबई- कामानिमित्त असणारे तरुण आपल्या गावी आलेले आहेत. गावी आल्यानंतर ते खरेदीसाठी बाहेर पडून खरेदीबरोबर मित्रांसोबत देखील फिरण्यास जात आहेत. मात्र, भरधाव वेगाने वाहने चालवण्याच्या भरात अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील इंजबाव – म्हसवड या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला आहे. … Read more

साताऱ्यात आढळले तब्बल 20 हजार ‘कुणबी’; पालकमंत्र्यांच्या पाटणमध्ये ‘इतक्या’ नोंदी!

20231110 083214 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन करत सरकारला झुकायला लावले. त्यांच्या आंदोलनानंतर प्रत्येक जिल्ह्यात कुणबीच्या नोंदींचा शोध घेण्याचे काम शासनाने हाती घेतलेले आहे. तालुकास्तरावर नेमलेल्या समितीकडून या कुणबीच्या नोंदींचा शोध सुरू आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात तब्बल २० हजार २ कुणबी नोंदी सापडल्या असून सर्वाधिक नोंदी पाटण व सातारा तालुक्यात … Read more

ऊस दरावरून शेतकरी अन् संघटना आक्रमक; कराड तालुक्यातील कारखानदाऱ्यांना दिला ‘हा’ थेट इशारा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । यंदा देखील ऊस दरावरून विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आता त्यांच्यानंतर सर्वसामान्य शेतकरी देखील ऊस दरावरून आक्रमक होत असल्याचे बुधवारी दिसून आले. ऊस दरासह विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत एकत्रित येत आज कराड येथील दत्त चौकात जोरदार घोषणाबाजी केली. उसाला प्रति टन 5 हजार रुपये … Read more

साताऱ्याच्या कासच्या कामाची पालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara kas News 20231108 131829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, सातारा नगरपालिका संचालनालयाच्या अधिकारी पल्लवी सोनवणे यांनी मंगळवारी या कामाच्या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली. तसेच सुरू असणारे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभिंयता दिलीप चिद्रे, … Read more

साताऱ्यासह कराड, पाटणला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकरी हवालदिल

Karad Rain News jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु असताना आज पहाटे साताऱ्यासह कराड, पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामामधील सुरू असलेल्या पीक काढणीच्या कामात व्यत्य आला असून ऊस तोडीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर शेतकऱ्यांच्या पिकांनाही या … Read more

मध्यरात्री अज्ञाताने लावली गुऱ्हाळाच्या गंजीला आग; पुढं घडलं असं काही…

Supane News 20231107 094759 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी गुऱ्हाळ घरावरील गंजीला आग लावल्याची घटना सुपने, ता. कराड येथे घडली. यामध्ये गंज पूर्णपणे जळून खाक झाली. कराड पालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग विजवली. या आगीमध्ये गुऱ्हाळ मालकाचे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की. कराड तालुक्यातील सुपने- किरपे … Read more