कोटपा कायद्यांतर्गत कराडातील 19 टपऱ्यांवर कारवाई

Crime News 16 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा रुग्णालयांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्यावतीने (एनटीपीसी) ‘कोटपा’ कायद्यानुसार कराड येथील 19 टपऱ्यांवर कारवाई करुन 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी, तंबाखूची जाहिरात आदी निर्बंध आहेत. त्याअनुषंगाने तंबाखू विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे, अशी … Read more

साताऱ्याचे खा. उदयनराजेंची दिल्लीत अमित शहांशी चर्चा; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 41 jpg

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले हे काहीना काही कारणावरून चर्चेत येतात. सध्या जाते त्यांच्या दिल्लीवारीवरून चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण सातारा जिल्ह्यातील अनेक प्रश्न, प्रलंबित विकासकामावरून त्यांच्याकडून दिल्लीतील विविध खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या जात आहरेत. कामांबाबत पाठपुरावा केला जात आहे. त्यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याची भेट घेतली आहे. छत्रपती … Read more

कराडात सावकारांच्या त्रासामुळे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; 7 खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

Crime News 15 jpg

कराड प्रतिनिधी । खासगी सावकारांकडून पैसे घेतल्यानंतर त्याच्याकडून त्रास दिला जात असल्याच्या घटना कराड शहरात अनेकवेळा उघडकीस आल्या आहेत. या प्ररकरणी पोलिसांनी सावकारांवर देखील कारवाई केली आहे. अशीच एक घटना कराड शहरात घडली असून खासगी सावकारांकडून घेतलेल्या १८ लाख रुपये कर्जापोटी ३३ लाख रुपयांची रक्कम परत देऊनही सावकारांकडून त्रास दिला जात असल्याने एकाने आत्महत्येचा प्रयत्न … Read more

महाबळेश्वरात गव्याच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी

Satara News 40 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मधील मांघर या ठिकाणी गव्याच्या केलेल्या हल्ल्यात दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवार, दि. २८ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस पाटील योगेश गणपत पार्टे, गंगाराम पार्टे असे जखमींचे आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वरहून तापोळा एसटीमधून आलेले दोघेजण गुरुवारी … Read more

खेडच्या सरपंच लता फरांदेंना अपात्र करा, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची मागणी

Satara News 39 jpg

सातारा प्रतिनिधी । खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या लता अशोक फरांदे यांनी निवडणुक अर्ज माहिती भरताना खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल करत कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांचे पती यांच्या नावाने असलेल्या अशोक फरांदे यांच्या मिळकतीमधील मोबाईल टॉवरचा ग्रामपंचायतीचा कर थकित असतानाही प्रतिज्ञापत्रात कोणतेही थकबाकी नसल्याचे लता फरांदे यांनी नमूद केले आहे, त्यामुळे … Read more

भुताची चेष्टा पडली महागात; महिलेसह चौघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Satara News 38 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील कैकाड गल्लीत सोमवारी एक अनोखी घटना घडली होती. त्यामुळे सातारकर चांगलेच घाबरले होते. रात्रीच्यावेळी 11 वाजता साताऱ्यातील कैकाड गल्लीत सोमवारी कोपऱ्यावरचं असलेल्या सार्वजनिक शौचालयात एका बाईचा पुतळा ठेवण्यात आला होता. तो पुतळा नेमका कुणी ठेवला? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. महिला शौचालयात भुताची केलेली चेष्टा करणार्याचा पोलिसांनी शोध घेत … Read more

मलकापूरातील 16 वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Karad News 12 1 jpg

कराड प्रतिनिधी । जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याला घाबरून एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना मलकापूर, ता. कराड येथे घडली आहे. या घटनेत संबंधित मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी ३ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. करण थोरात, … Read more

सातारा जिल्ह्यातील लाखो मतदार वगळण्याची प्रक्रिया पूर्ण : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 35 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दीड महिन्यांत लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरु आहे. मतदार नोंदणीसोबत मयत, स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यात 1 लाख 50 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून तितक्याच मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक मतदार अर्ज सातारा जिल्ह्यात भरुन घेण्यात आले … Read more

साताऱ्यात मध्यरात्री एकावर गोळीबार, एक संशयित ताब्यात

Satara News 34 jpg

सातारा प्रतिनिधी । रस्त्यात गाडी उभी केल्याच्या वादातून साताऱ्यातील कमानी हौद परिसरात गुरुवारी मध्यरात्री एकावर गोळीबार करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गोळीबार करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोळीबारामुळे कमानी हौद परिसरात खळबळ साताऱ्यातील कमानी हौद परिसरात … Read more

कराडात आज पुन्हा ‘एक मराठा लाख मराठा’; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचा ‘जेल भरो’

Karad News 11 1 jpg

कराड प्रतिनिधी । मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या १७ नोव्हेंबर रोजीच्या सभेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर गुन्हा दाखल करून नोटीस काढण्यात आल्यामुळे मराठा बांधव गुरूवारी जमावाने पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक आणि गोपनीय विभागाच्या कर्मचाऱ्यांची काही समन्वयकांना बुधवारी रात्री दत्त चौकात गाठले. त्यांची मनधरणी … Read more

महाबळेश्वरमध्ये नव्याने बांधकाम झाल्यास कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

Satara News 20231228 083124 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वरमधील जुन्या अनाधिकृत बांधकामांबाबत राज्य शासन निर्णय घेईल, पण त्याठिकाणी नव्याने बांधकाम होत असेल तर कारवाई करणार, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाबळेश्वर व कास अनाधिकृत बांधकामांबाबत विचारले असता जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामांवर पूर्वी कारवाई केली … Read more

पोलीस निरीक्षकांनी संभ्रम दूर केल्याने मराठा बांधवांचा जेलभरो स्थगित

Karad News 15 jpg

कराड प्रतिनिधी । मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर गुन्हा दाखल करून नोटीस काढण्यात आल्यामुळे गुरूवारी जमावाने पोलीस ठाण्यात जाऊन जेलभरो करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी मराठा बांधवांची सर्किट हाऊस मध्ये चर्चा करून कारवाईच्या संदर्भातील संभ्रम दूर केल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी जेल भरोचा निर्णय स्थगित केला. मराठा क्रांती मोर्चा … Read more