अजितदादांनी संविधान पाळा म्हणून सांगणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’; अंबादास दानवेंचं टीकास्त्र

Satara News 20240122 181557 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजितदादांनी जरांगे-पाटलांना संविधान पाळा, असे सांगणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत. जरांगे-पाटलांनी घेतलेल्या भूमिकेचे अजितदादांनी कौतुक केले पाहिजे. त्यांच्या भूमिकेचा अजितदादांनी अवमान करू नये, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. साताऱ्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणाला शिवसेनेचा नेहमीच पाठिंबा राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यायचे आहे … Read more

व्यापाऱ्यास 10 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

Satara News 20240122 121125 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ‘तुला या प्राॅपर्टीत राहायचे असेल तर मला १० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अन्यथा तुझ्या गुडघ्यापासून खालचा पाय काढून टाकीन,’ अशी धमकी एका उद्योजकाला देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाचगणी पोलिस ठाण्यात चाैघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. अनुप गाडे (वय ३६, रा. सातारा), सागर मेश्राम (वय २८) यांच्यासह अन्य अनोळखी … Read more

मराठा सर्व्हेेक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील गावागावात होणार जनजागृती

Satara News 20240122 113301 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे सर्व्हेक्षण होणार आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे काम सोपवले आहे. या सर्व्हेक्षणासाठी गावागावात दवंडी देवून जागृती केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रविवारी शासकीय कर्मचार्‍यांना महसूल विभागामार्फत याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तालुक्यात नेमण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी जावून मराठा … Read more

कोणता खेळाडू पुढे आणायचा, कोणाची विकेट घ्यायची, हे शरद पवारच ठरवतील; आमदार शिंदेंचा यॉर्कर

Shashikant Shinde 20240122 094520 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोणता खेळाडू पुढे आणायचा, कोणाची विकेट घ्यायची, हे आयपीएलचे जनक असलेले खासदार शरद पवारच ठरवतील, असे वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केलं आहे. दरम्यान, कारसेवक असल्याचे पुरावे फडणवीसांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणविसांवर त्यांनी केली. शरद पवारांनीच आयपीएल आणली कराडमध्ये देवेंद्र फडणवीसांनी खा. उदयनराजेंना … Read more

सांबराच्या शिंगांची विक्री करण्यासाठी आले अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले

Crime News 20240121 191019 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सांबराच्या शिंगांची विक्री व तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना एलसीबी पथकाने सापळा रचून पकडले. पुणे-बंगळुरू महामार्गावर पेरले (ता. कराड) हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. नितीन आत्माराम जाधव आणि अमोल सुरेश गायकवाड (दोघेही रा. गोसावीवाडी, ता. कराड), अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांची कारवाई पेरले गावच्या हद्दीतील पुणे-बेंगलोर … Read more

विहिरीचे काम करताना ठेकेदाराचा गेला तोल, उपचारापूर्वीच झाला मृत्यू

Crime News 20240121 162351 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील गोडवलीमध्ये विहिरीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू झाला. काल शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून तानाजी आबाजी मालुसरे (वय ५८) असे त्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोडवली या गावातील तानाजी आबाजी मालुसरे (वय … Read more

सातारा जिल्ह्यात कारखान्यांनी ऊस गाळपात गाठला उच्चांक

Satara News 20240121 135444 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात १६ सहकारी साखर कारखाने आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप काढले जाते. दरम्यान, यंदाच्या वर्षी या साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ५५ लाख ४ हजार ९८० टन ऊस गाळप करून ५२ लाख ६९ हजार २८५ क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले आहे. सध्या सरासरी ९.७५ टक्के उतारा मिळत आहे. यामध्ये सहकारी कारखान्यांनी … Read more

साताऱ्यातील गांधी मैदानावर उदयनराजेंच्या हस्ते होणार महाआरती

Satara News 20240121 122151 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अयोध्येतील राम मंदिरामध्ये उद्या सोमवारी दि. २२ रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याचा उत्सव देशभरात साजरा केला जाणार असून, जिल्ह्यात हा उत्सव प्रत्येक मंदिरात, घराघरांत केला जाणार आहे. यादिवसाचे औचित्य साधून साताऱ्यातील गांधी मैदानावर सायंकाळी 6 वाजता एक लाख रामज्योती पेटविल्या जाणार आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती … Read more

सातारासह कराड दक्षिणेतील 3 मोठ्या पक्षांतील कार्यकर्त्यांचा ‘उबाठा’ शिवसेनेत प्रवेश

Karad News 20240121 112928 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा आणि दक्षिण कराडमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून कार्यकर्त्याची मोर्चे बांधणी केली जात आहे. अशात आता सातारासह कराड दक्षिणेत भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. कारण या 3 मोठ्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना नेते तथा खासदार अनिल देसाई … Read more

टेंभू योजनेच्या व्हॉल्व्ह चोरट्यास पोलिसांनी केली अटक

Crime News 20240121 071127 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील टेंभू धरणावरून चोरीस गेलेले अॅन्टीव्हॅक्युम व्हॉल्व्हची चोरी करणाऱ्या चोरट्यास कराड तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बापूराव रघुनाथ मदने (वय ३६, रा. टेंभू, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, कराड तालुक्यातील महत्वाच्या योजनापैकी एक असलेल्या टेंभू … Read more

आले व्यापाऱ्याकडून कृषी सेवा केंद्र चालकावर कोयत्याने वार

Crime News 20240121 064306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे एका आले व्यापाऱ्याने कृषी सेवा केंद्र चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. सुमारे यात चालक जखमी झाला आहे. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरीनाथ नारायण गायकवाड (वय ४८) असे जखमी चालकाचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरीनाथ नारायण … Read more

विटांनी भरलेली ट्रॉली अंगावरुन गेल्यान ‘त्याच्या’ डोळ्यादेखत ‘तिचा’ झाला मृत्यू

Crime News 20240121 055228 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिंगणापूर-दहिवडी घाट महामार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ विटांनी भरलेली ट्रॉली महिलेच्या अंगावरुन गेल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. रंजना वाघमारे (मूळ रा. नांदेड, सद्या रा. मांडवे, ता. माळशिरस) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मांडवे (ता. माळशिरस) या ठिकाणाहून विटांनी भरलेल्या दोन ट्रॉली असलेला ट्रॅक्टर (क्र.एमएच ११ यु … Read more