राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात उद्या विविध कार्यक्रम

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी | चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उद्या गुरुवारी दि. २५ रोजी सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून लाेकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबत सर्वसमावेशक प्रचार- प्रसाराचा आराखडा, जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तींचा समावेश, विविध संस्थांची भागीदारी … Read more

सातारालगत 2 कारला लागली भीषण आग, आगीत लाखोंचे नुकसान

Satara News 70 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरालगत महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात दोन कार जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून कारचे मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा शहरालगत गॅस भरत असताना ही घटना घडली असून एका कारमध्ये गॅस भरताना ती पेटल्याने शेजारील उभी असलेली … Read more

मुख्यमंत्री शिंदे गावच्या यात्रेसाठी दाखल; गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात केलं स्वागत

Satara News 20240124 083759 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या दरे आणि आजुबाजूच्या पंधरा गावांचे ग्रामदैवत असलेल्या उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यात्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत महाबळेश्वर तालुक्यातील दरे, तांब, उचाट आदींसह पंधरा गावांचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा सध्या सुरू आहे. यात्रेसाठी … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा

Satara News 20240123 232851 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ईव्हीएम हटाव कृती समितीच्यावतीने साताऱ्यात मंगळवारी माजी आमदार, ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली मतदान यंत्राची जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’चा नारा दिला. राजवाडा येथून मतदान यंत्राची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा जिल्हाधकारी कार्यालयासमोर आल्यानंतर आंदोलकांसमोर बोलताना माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले, कोणतेही बटण … Read more

कराड तालुक्यातील शरिराविरुध्दचे गुन्हे करणारी 7 जणांची टोळी 2 वर्षाकरीता तडीपार

Crime News 20240123 195457 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील कराड तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाया ७ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. टोळी प्रमुख १) शुभम शंकर काकडे, (वय २४, रा. शिवाजीनगर मलकापुर, ता. कराड जि. सातारा) तसेच टोळी सदस्य २) समीर ऊर्फ सॅम नुरमोहंमद मोमीन, (वय २९, रा. मुजावर कॉलनी, ता. कराड जि. सातारा) … Read more

पालच्या यात्रेत चोरटयांनी चार भाविकांचे दागिने केले लंपास

Pal Yatra News 1 jpg

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस काळ पार पडला. मात्र, यात्रेत चोरीच्या घटना देखील घडल्या. चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून हातोहात तब्बल ३ लाखांचे दागिने गायब करण्यात आले. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात अनोळखी पाचजणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

कराडची महिला कारसेवक फक्त 200 रूपये घेऊन गेली होती अयोध्येला

Karad News 22 jpg

कराड प्रतिनिधी | अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त संपूर्ण देशात आज जल्लोषाचे आणि भक्तिमय वातावरण असताना कार सेवकांच्या योगदानाचा देखील गौरव करण्यात आला. बाबरी पाडताना कराडमधील १०५ कार सेवक अयोध्येत घटनास्थळी कार सेवा करत होते. त्यापैकी एक असलेल्या विनया खैर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना आज ३० वर्षांपुर्वीच्या त्या घटनेला उजाळा दिला. लहान मुलं घरी ठेऊन … Read more

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सर्वेबाबत अंगणवाडी, आशा सेविका आक्रमक

Satara News 20240123 120015 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मानधन वाढ झाली नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका व गटप्रर्वतक आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी जो पर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आपल्या संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. राज्य शासनाच्या मराठा समाज आरक्षण सर्वेक्षणावर बहिष्काराचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबत तालुका पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले जात आहे. … Read more

पोक्सो खटल्यातील आरोपीस 3 वर्ष सक्तमजुरीसह 1.5 हजार रुपये दंडाची शिक्षा

Crime News 20240123 111952 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरून विषेश जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के.व्ही. बोरा यांनी आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तानाजी दौलत भगत (वय ५८, रा. पिंप्रद ता. फलटण, जि. सातारा), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी तानाजी दौलत भगत याने … Read more

पाटणला कुणबी नोंदीची शोधमोहीम झाली आता होणार वितरण

Patan News 20240123 100205 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सध्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरागे पाटील मोठ्या संख्येने मराठा बांधवासह मुंबईच्या दिशेने जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील समजायचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. संपूर्ण राज्यात 23 जानेवारी पासून सर्वेक्षण सुरू होत आहे. पाटण तालुक्यात देखील या सर्वेक्षणाची पूर्वतयारी करण्यात आलेली असून प्रगणक व पर्यवेक्षक यांचे … Read more

सदानंदाच्या यळकोटाने पालनगरी दुमदुमली, खंडोबा यात्रेला 6 लाखांवर भाविकांची उपस्थिती

Pal Yatra News 20240123 091155 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खंडोबाच्या नावानं चांगभलं… यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात पाल (ता. कराड) येथील मल्हारी म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली. खोबरे आणि भंडाऱ्यात पाल नगरी न्हाऊन निघाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस … Read more

अल्पवयीन मेव्हण्याच्या खून प्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा

Crime News 20240123 073451 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सासुशी असलेल्या जुन्या भांडणाचे कारणावरून व पत्नी हिचे बरोबर असलेल्या वादावरून मेहुणा रणजित उर्फ निरंजन (वय ७ वर्षे ) याच्यावर असलेल्या रागातून त्याचा आगाशिवनगर, दांगटवस्ती येथील डोंगरातील दगडी पायऱ्यांवर आपटून खून केल्याच्या खटल्यात दोषी धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आण्णासाहेब पाटील यांनी आरोपी सागर शंकर जाधव यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक … Read more