मुख्यमंत्री शिंदेंनी लावली प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभास उपस्थिती

Satara News 87 jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे.प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगड घ्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी १३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुर्ग … Read more

2 आठवड्यात म्हणणे सादर करा, द्विसदस्यीय खंडपीठाचे राज्य सरकारच्या वकिलांना आदेश

karad News 29 jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील मशिदीवर हल्ला तसेच मुस्लिम धर्मीयांच्याविषयी भावना भडकवणारी वक्तव्ये करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम पावसकर यांच्या विरोधात सातारा व सांगली पोलिसांनी का कारवाई केली नाही? असा सवाल करत येत्या दोन आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात म्हणणे सादर करण्याचे आदेश सरकारच्या वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या द्वीसदस्यीय न्यायाधीशांच्या बेंचने दिला आहे. … Read more

अमरावती-सातारा रेल्वेला प्रारंभ, आज साताऱ्यातून होणार प्रस्थान

Satara News 85 jpg

सातारा प्रतिनिधी । भारतीय रेल्वेच्या ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’नंतर पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना दुसरी गाडी नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. मोठी गैरसोयीचा सामना करावा लागत होता. प्रवाशांकडून खासदार उन्मेशदादा पाटील यांना भेटून नविन गाडी सुरु करावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत खा. उन्मेश पाटील यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व … Read more

मुख्यमंत्री शिंदेंना कराड तालुका मराठा बांधवांनी लिहलं पत्र; नेमकं कारण काय?

Karad News 28 jpg

कराड प्रतिनिधी । उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पाटण दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमनातरी शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर असून पाटणला येत असल्याने यावेळी त्यांनी पाच मिनिटे वेळ द्यावा, अशी विनंती करणारे पत्र कराड तालुका सकल मराठा बांधवांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला कुणबी आरक्षण … Read more

साडेपाच एकरात पसरलेलं विस्तीर्ण वडाचं झाडं पाहिलंय का? जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी आहे

Satara News 84 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात तसे पाहिले तर अनेक ऐतिहासिक वस्तू, जुनी वृक्षे आणि सुदर अशी पर्यटन स्थळे आहेत. मात्र, जिल्ह्यातील एक असे गाव आहे कि, त्या ठिकाणी तब्बल साडेपाच एकर क्षेत्रात वडाचं झाड पसरलं आहे. दाट झाडी आणि चहूबाजूने जंगल. या जंगलात गेल्यावर आश्चर्य वाटतं त्याचं कारण म्हणजे हे जंगल फक्त वडाच्या झाडांच्या पारंब्यांनी … Read more

‘दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादम तात्या’ पुरस्काराचे उद्या वितरण

Karad News 27 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कुसूर येथील श्री. स. गा. म. विद्यालय व पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने दिवंगत दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादम तात्या यांच्या जयंतीनिमित्त विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा ४३ वा मुकादम साहित्य पुरस्कार हा डॉ. सुरेश व्यंकटराव ढमढेरे यांनी लिहिलेल्या ‘माझा जीवन प्रवास’ या … Read more

मुंबईच्या पर्यटकाला दिली आराम बसने धडक, उपचारापूर्वी झाला मृत्यू

Crime News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर – पाचगणी मुख्य मार्गावर मॅप्रो गार्डन समोर आराम बसने मागून धडक दिली. मुंबई येथील पर्यटक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. नीरज अरुण मेहता असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आराम बस चालकाविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी … Read more

मराठा समाजाला न्याय देण्याचं आ. शिवेंद्रराजेनी दिलं फडणवीसांना श्रेय, म्हणाले की…

Maratha News jpg

सातारा प्रतिनिधी । मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज मोठं यश आल्याचं मानलं जातंय. त्याचं श्रेय साताऱ्यातील भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलंय. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. अनेक नेते मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यापैकी कोणीही मराठ्यांना न्याय दिला नाही. परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यात आधी तो न्याय देवेंद्र फडणवीस … Read more

खेळताना 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Crime News 30 jpg

सातारा प्रतिनिधी | चार फुटांच्या दगडावर चढून खेळत असताना अचानक तोल जाऊन पडून एका सहा वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील निरगुडी येथे दि. २६ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. आर्या शशिकांत लकडे (वय ६), असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आर्या लकडे … Read more

आगाशिवनगरच्या डोंगरावरून पडून युवकाचा मृत्यू

Karad News 20240128 093013 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथील आगाशिव डोंगरावरून पडून कोयना वसाहत येथील 17 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. 26 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याची सुमारास ही घटना घडली. सोहम दिनकर शेवाळे (वय 17) रा. कोटणीस हॉल समोर, कोयना वसाहत ता. कराड असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दिनकर रघुनाथ शेवाळे यांनी कराड शहर पोलिसात … Read more

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात गंभीर आजारांच्या 68 बालकांवर 72 यशस्वी शत्रक्रिया

Karad News 25 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल चिकित्सा सर्जन डॉ. पारस कोठारी यांच्यासह त्यांच्या 8 जणांच्या टीमकडून हरनिया, अपेंडिक्स आदिंसह जिभेवरील तसेच अंडाशयतील गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या 68 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेविकांच्यावतीने कराड तालुक्यातून 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर … Read more

शस्त्राच्या धाकाने खंडणी मागणाऱ्या गुंडास अटक, कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

Crime News 29 jpg

कराड प्रतिनिधी । विद्यानगर सैदापूर परीसरात धारधार शस्राचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या गुंडास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कुंदन जालिंदर कराडकर (रा. गजानन हौसिंग सोसायटी), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. कराड शहरालगतच्या विद्यानगर – सैदापूर उपनगरात एकजण हातात धारधार शत्र घेऊन दहशत माजवत … Read more