पांढरपाणीतील वन जमिनीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली बैठक; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Satara News 20240817 163436 0000

सातारा प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील पांढरपाणी येथील वन जमिनी ताब्यात घेण्याबाबत नुकतीच पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत वन विभाग व अन्य संबंधित यंत्रणांनी ग्रामस्थांना नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुर्गम भागात राहणारे अनेक ग्रामस्थ अशिक्षीत असतात. शासकीय यंत्रणांनी त्यांच्या गावात जावून त्या ठिकाणी शिबीरे लावावीत आणि लोकांचे प्रस्ताव … Read more

साताऱ्यात उद्या लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

Satara News 20240817 141154 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याने उल्लेखनिय काम केले आहे. या योजनेचे 5 लाख 21 हजार 83 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5 लाख 13 हजार 418 इतक्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रम उद्या रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12.15 … Read more

सातारा जिल्ह्यात अजूनही टॅंकर भागवतायत ‘इतक्या’ गावांची तहान

Khatav News 20240817 131445 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असलातरी काही भागात अजूनही पावसाची ओढ आहे. त्यामुळे माण तालुक्यातील १० गावे आणि ५६ वाड्या वस्त्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १८ हजार लोकांची तहान सध्या या टॅंकरवरच अवलंबून आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासूनच टॅंकरची … Read more

अटल भूजल योजनेचे केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात; खटाव तालुक्यातील ‘या’ गावाला दिली भेट

Khatav News 20240817 122128 0000

सातारा प्रतिनिधी | अटल भूजल योजने अंतर्गत खटाव तालुक्यातील येणाऱ्या निढळ गावांमध्ये अटल जलराष्ट्रीय व्यवस्थापन कक्षाचे डायरेक्ट अँड ओ एस डी सेक्रेटरी डॉ. राघव लांगर, डायरेक्टर राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष डॉ. उमेश बालपांडे तसेच कृषी तज्ञ पी. सी कुमावत यांनी गावांमध्ये क्षेत्रीय भेट दिली. यावेळी हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत … Read more

पाचगणीचे टेबल लँड पठार गेंद फुलांनी बहरले; रस्त्याकडेला पिवळ्या फुलांचे सौंदर्य

Satara News 20240817 111411 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर, पाचगणी परिसर ओळखला जातो. येथील पाचगणी परिसरातील निसर्ग श्रावणात चांगलाच हिरवाईने नटला असून पाचगणीच्या टेबल लँड पठारावर पांढर्‍याशुभ्र गेंद फुलांनी पठार फुलले आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठारानंतर पाचगणी भिलार परिसरात फ्लॉवर व्हॅली नव्याने उदयास येऊ लागली आहे. पाचगणी परिसरातील रस्तेदेखील मिकी माऊस लव्हेंडर व पांढर्‍याशुभ्र विविध … Read more

कृष्णा विश्व विद्यापीठ वैद्यकीय क्षेत्रासाठी दिशादर्शक : डॉ. लुईस बोर्बा

Karad News 20240817 091301 0000

कराड प्रतिनिधी | कृष्णा विश्व विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलमधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक व वैद्यकीय उपचार सुविधा पाहून मी आश्चर्यचकीत झालो आहे. हे विद्यापीठ वैद्यकीय अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, सर्जनस्‌ यांच्यासह एकूणच वैद्यकीय क्षेत्रासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोसर्जिकल सोसायटीज्‌चे अध्यक्ष डॉ. लुईस बोर्बा यांनी काढले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित ‘न्यूरोकॉन २०२४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी … Read more

कराड उत्तरमध्ये आम आदमी पार्टीची दमदार एन्ट्री! शेकडो कार्यकर्त्यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

Karad AAP News 20240817 081637 0000

कराड प्रतिनिधी | आम आदमी पार्टीने कराड उत्तर विधानसभा मतदार संघात दमदार एन्ट्री केली आहे. रहिमतपूर- देशमुखनगर (ता. कोरेगाव) येथील किरण पाटील आणि पंचक्रोशीतील त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य संघटक संदीप देसाई, राज्य सहसचिव अविनाश देशमुख आणि सातारा जिल्हाध्यक्ष ॲड. धीरजसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. रहिमतपूर हे … Read more

कराडच्या शुक्रवार पेठेतून प्रतिबंधित विमल, रजनीगंधा गुटख्यासह पावणे 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

Karad Crime News 20240817 070215 0000

कराड प्रतिनिधी | विमल आणि रजनीगंधा गुटख्याची चोरटी वाहतूक करण्याच्या इराद्याने आलेल्या संशयिताला पाठलाग करून पोलिसांनी पकडले. त्याच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये विमल आणि रजनीगंधा गुटखा आढळून आला. याप्रकरणी ४ लाखांचा गुटखा आणि कार, असा पावणे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अवैध गुटख्याची चोरटी वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश … Read more

राजेंद्रसिंह यादवांना मुख्यमंत्र्यांचं बळ, भुयारी गटर आणि पाणी पुरवठा योजनेसाठी 209 कोटींचा निधी मंजूर

Karad News 20240816 215905 0000

कराड प्रतिनिधी | कराडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भुयारी गटार योजना (मलनिःसारण प्रकल्प) व शहरासह वाढीव भागाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६० कोटींचा निधी राज्य नगरोत्थान महाभियानमधून मंजूर केला आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या अन्य योजनांमधून ४९ कोटी, असा असा एकूण २०९ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर करून आणण्यात यशवंत … Read more

कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचा महत्वाचा निर्णय; फक्त एक वेळच होणार लिलाव

Karad News 33

कराड प्रतिनिधी । कराडसह परिसरातील तालुक्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी आपला शेतीचा भाजीपाल्यासह इतर माल विक्रीसाठी कराड येथील स्वा. सै.शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये घेऊन येतात. या ठिकाणी मालाच्या लिलावाच्या वेळेबाबत शेतकऱ्यांकडून वेळोवेळी होत असलेल्या मागणीनुसार एक वेळ व खुली लिलाव पद्धत सुरू करण्याचा शुभारंभ आज शुक्रवारी करण्यात आला. शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश … Read more

स्वातंत्र्य दिनानिमित्त अलंकार उद्योग समुहाच्यावतीने 78 आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

Karad News 32

कराड प्रतिनिधी । स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कराड येथील अलंकार उद्योग समुहाच्यावतीने यंदा वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ७८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अलंकार उद्योग समुहाच्यावतीने अलंकार हॉटेलच्या प्रांगणात ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. कराड मिलिटरी हॉस्पिटलचे कमांडिंग ऑफिसर कर्नल (नि.) नितीन शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावेळी अलंकार उद्योग समुहाने ७५ … Read more

जिल्ह्यात तब्बल 8 लाख नागरिकांनी घेतलं आयुष्मान कार्ड; 5 लाखांवर मिळतायत मोफत उपचार

Satara News 74

सातारा प्रतिनिधी । आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी आयुष्मान भारत योजना राबवित आहे. ही योजना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या नावानेही ओळखली जाते. ही योजना आरोग्य विमा योजनाच आहे. लाभार्थ्यांना सरकारी किंवा सूचीबद्ध केलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा पुरवली जाते. मात्र, त्यासाठी संबंधिताकडे आयुष्मान कार्ड असणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यात तब्बल ८ लाख २ … Read more