कडाक्याच्या थंडीमुळे जिल्हा गारठला, शेकोट्यांभोवती रंगू लागल्यात राजकीय चर्चा

Satara News 81

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापले होते. आता मतदान झाल्याने मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना जिल्ह्यात थंडी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरू लागला असून हवेत गारठा वाढल्याने उबीसाठी जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी, कष्टकरी वर्गाला थंडीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या शेकोट्यात राजकीय गप्पा चांगल्याच … Read more

निवडणूक कर्तव्य बजावून घरी जाताना दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवलं, तलाठी जागीच ठार

Crime News 11

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची ड्युटी संपवून घरी निघालेल्या महसूल कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात गंभीररित्या जखमी झालेल्या तलाठ्याचा जागीच मृत्यू झाला. रोहित कदम, असं मृत तलाठ्याचं नाव आहे. सातारा पुणे महामार्गावर उडतारे (ता. वाई) गावच्या हद्दीत हा अपघात झाला. मतपेट्या निवडणूक कर्मचारी म्हणून होती नेमणूक रोहित कदम हे तलाठी होते. … Read more

कराड दक्षिणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सहा मतदान केंद्राच्या टीमचा सन्मान

Karad News 46

कराड प्रतिनिधी । 260, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 342 बुथपैकी सर्व कामकाज आटोपून सर्व मतदान साहित्य जमा करण्यासाठी शासकीय धान्य गोदाम कराड येथे दाखल झालेल्या पहिल्या ६ मतदान केंद्रांचा निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या सर्व टीमनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी … Read more

दत्त जयंतीनिमित्त शिर्डी ते कराड साई पालखी सोहळा, 29 नोव्हेंबरला शिर्डीहून होणार प्रस्थान

Karad News 45

कराड प्रतिनिधी । कराड येथील श्री. साईबाबा पालखी सोहळा समितीच्यावतीने श्री. दत्त जयंती उत्सवानिमित्त शिर्डी ते कराड साई पालखी सोहळा दि. २९ नोव्हेंबर ते दि. १४ डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे. शुक्रवारी, दि. २९ सकाळी साडेआठ वाजता श्री. दत्त मंदिर- लेंडीबाग, शिर्डी येथून साईबाबा पालखीचे कराडकडे प्रस्थान होईल. पालखी सोहळाल्या शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

विनोद तावडे यांच्या माध्यमातून महायुतीला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र : शंभूराज देसाई

Shambhuraj Deasi News 20241121 102107 0000

कराड प्रतिनिधी | भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी मंगळवारी संध्याकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये नोटा वाटप नाट्य घडले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले होते. तब्बल साडेचार तास त्यांनी भाजप नेत्यांची कोंडी केल्याची घटना घडली. या प्रकरणी मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. … Read more

पाण्याचा अंदाज न आल्याने मराठवाडीच्या जलाशयात मुलाचा बुडून मृत्यू

Crime News 20241121 091457 0000

पाटण प्रतिनिधी | मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील उमरकांचन गावाजवळ घडली. ओंकार रमेश भिंगारदेवे (वय १७) असे बुडून मृत्यू झालेल्या मृत मुलाचे नाव आहे. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ओंकार भिंगारदेवे काही मुलांसमवेत मंगळवारी दुपारी गावाजवळच्या वांग … Read more

विधानसभेसाठी जिल्ह्यात 70 टक्क्यापेक्षा जास्त मतदान; पहा कोणत्या मतदार संघात किती झाले मतदान

Satara News 20241121 082841 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात बुधवारी शांततेत पार पडली. जिल्ह्यात सरासरी अंदाजे 70 टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत यावर्षी सर्वात जास्त मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. संपूर्ण जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. … Read more

फलटण मतदारसंघात एकुण 71.05% मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Phalatan News 20241120 210911 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली आहे. यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेटी मध्ये बंद झाले अर्थात ईव्हीएम मध्ये लॉक झाले आहे. दरम्यान, दिवसभरात फलटण मतदारसंघात एकुण 71.05% मतदान पार पडले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 3 लाख 39 हजार 662 मतदारांपैकी एकूण 2 लाख 41 हजार 329 … Read more

रागाच्या भरात ‘त्यानं’ ग्रामपंचायतीची घंटागाडीच दिली पेटवून; पुढं घडलं असं काही…

Crime News 10

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आज चुरशीची मतदान पार पडले. दरम्यान, मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली. मात्र, तालुक्यात जाळपोळीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दमदाटी करत एकाने ग्रामपंचायतीची घंटागाडी पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना उंडाळेत घडली. दरम्यान, नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग विझवून पुढील अनर्थ टाळला. या … Read more

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वेब कॅमेराच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर

Satara News 80

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे मतदान पार पडले. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदान चांगल्या प्रकारे पार पडले. दरम्यान, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वेब कॅमेराच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली होती. फलटण – कोरेगाव विधानसभा निवडणूक कार्यालयामध्ये … Read more

सातारा जिल्ह्यात शेवटच्या टप्प्या अगोदर 5 वाजेपर्यंत झाले ‘इतके’ टक्के मतदान

Satara News 79

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे मतदान पार पडले. मात्र, जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात एक दुःखद घडणार घडली. मतदाराचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. जिल्ह्यात शेवटच्या टप्प्या अगोदर मतदान ६१.२९ % मतदान पार पडले. सातारा जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत सुरुवातीला चांगले मतदान झाले. … Read more

मतदान करतानाच हृदयविकाराचा धक्का, मतदाराचा जागीच मृत्यू, सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना

Satara News 77

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी दुपारपर्यंत चुरशीची मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असताना जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. मतदान करतानाच एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही घटना घडलीघडली असून शाम धायगुडे (वय 67) वर्षे असे म्रुत्यु झालेल्या मतदाराचे … Read more