साताऱ्याच्या कासच्या कामाची पालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara kas News 20231108 131829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, सातारा नगरपालिका संचालनालयाच्या अधिकारी पल्लवी सोनवणे यांनी मंगळवारी या कामाच्या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली. तसेच सुरू असणारे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभिंयता दिलीप चिद्रे, … Read more

कास धरणाच्या नवीन जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरु

Kas News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला वरदायिनी ठरणाऱ्या कास धरणाच्या नवीन जलवाहिनीच्या कामास पालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. सध्या जलवाहिनी एकमेकांना जोडण्याचे काम सुरू असून पुढील आठवड्यात धरणातून बाहेर येणाऱ्या आऊटलेटला नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सातारा पालिकेच्या माध्यमातून कास धरणाची उंची वाढविण्यात आली असून पाणीसाठ्यात 0.1 टीएमसीवरून 0.5 टीएमसी इतकी वाढ झाली … Read more

साताऱ्यातील हद्दवाढीतील निकृष्ट कामे न थांबवल्यास ऐन दिवाळीस शिमगा आंदोलन करणार; सुशांत मोरेंचा इशारा

Satara Sushant More News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा नगरपालिकेची 40 वर्षानंतर हद्दवाढ झाली. या हद्दवाढीसाठी लोकप्रतिनिधींनी शाहूनगर, शाहुपुरी, विलासपूर या भागातील विकासकामांसाठी 48 कोटी रुपयांची कामे मंजूर करुन आणली. परंतु ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असून राजकीय दबावापोटी पालिका प्रशासन ठेकेदारांवर कारवाई करत नाही. त्यामुळे ही निकृष्ट सुरु असलेली कामे 8 नोव्हेंबरपर्यंत तातडीने थांबवावीत अन्यथा 9 नोव्हेंबरला पालिका कार्यालयासमोर … Read more

सातारा पालिकेची ईडी चौकशी व्हावी यासाठी खा. उदयनराजेंनी…; आ. शिवेंद्रराजेंचे महत्वाचे विधान

Shivendraraje Bhosale Udayanraje Bhosale News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील विकासकामावरून व पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून आता साताऱ्यातील दोन्ही राजे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, खा. उदयनराजे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत सातारा नगरपालिकेत पूर्वी आणि आत्ता ज्यांची सत्ता आहे त्यांची ईडीची चौकशी लावावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आ. शिवेद्रराजेंनी त्यांच्यावर पुन्हा निशाणा … Read more

साताऱ्यातील ‘या’ महत्वाच्या प्रश्नावरून शिवेंद्रराजेंनी थेट दिलं उदयनराजेंना आव्हान; म्हणाले की…

Shivendraraje Bhosale Udayanraje Bhosale News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या एका महत्वाच्या विषयावरून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील घरपट्टीबाबत सध्या मोठा नागरिकांमध्ये गोंधळ सुरू असून, नागरिकांवर अन्याय केला जात आहे. या प्रश्नावरून आता भाजप खासदार शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले आहे. “ज्यांनी पाच वर्षे सत्ता भोगली ती मंडळी आज कुठे गायब … Read more

सातारा पालिकेकडून शहरातील 13 गाळ्यांचे शटर ‘डाऊन’!

Satara News 20230915 094829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या परवानगीविना सदर बझार, जिल्हा रुग्णालय व नुतन प्रशासकीय इमारतीच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून 13 गाळे सुरु होते. या गाळ्यासंदर्भात पालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून संबंधित गाळे सील करण्यात आले. तसेच गोडोली येथील एक पत्र्याचे शेडदेखील पथकाने हटवून तेथील जागा मोकळी केली. सातारा शहर व परिसरात काही … Read more

साताऱ्यातील 14 कोटी 65 लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी : खा. उदयनराजे भोसले

Satara News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा नगरपरिषदेसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन सातारा शहराचा समतोल सर्वंकष विकास साधत विविधांगी सेवा-सुविधा सातारकरांना पुरवण्यावर सातारा विकास आघाडीचा भर राहीला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधुन एकूण 19 अशा सुमारे 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली असल्याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. . … Read more

सातारा नगरपालिकेकडून ‘उपयोगकर्ता शुल्का’ची आकारणी; नागरिकांमध्ये संताप

Satara News 20230915 094829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरातील रहिवाशांकडून अनेक प्रकरणी कर आकारणी केली जाते. त्यामध्ये स्वच्छता, पाणीपट्टी, घरपट्टी आदी कराच्या माध्यमातून आकारणी करून त्यांना सुविधादी दिली जाते. मात्र, आता पालिकेकडून एक नव्या कराच्या आकारणीस सुरुवात करण्यात आल्याचे दिसून आले आहे. वर्ष २०२३-२४ च्या करदेयक वितणामध्ये पालिकेने ‘उपयोगकर्ता शुल्क’ म्हणून नवीन कर आकारणी केली असून यामुळे … Read more

सातारच्या किल्ले अजिंक्यतारावरून कोसळला दगड; दरीमुळे टळली मोठी दुर्घटना

Satara Ajinkytara Fort News 20230924 202625 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेक महाकाय दगड धोकादायक स्थितीत उभे आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, हे दगड वसाहतींच्या दिशेने कोसळण्याचा धोका निर्माण होतो. दरम्यान, रविवारी दुपारी एक भला मोठा दगड किल्ल्यावरून वसाहतींच्या दिशेने कोसळला. उंचावरून आलेल्या या दगडाचा वेग जास्त असल्याने डोंगर उतारावरील 2 झाडे उन्मळून पडली. हा … Read more

सातारा पालिका झाली मालामाल : बॅनरबाजीतून मिळाले 16 लाखांचे उत्पन्न

Satara News 20230915 094829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील वाढत्या बॅनर बाजीमुळे सातारा पालिकेला तब्बल 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पालिकेने केवळ होर्डिंगच्या माध्यमातून 16 लाख 35 हजार रुपयाची उत्पन्न मिळवले आहे. तर विनापरवाना बॅनरला दंड केल्याने पालिकेच्या तिजोरीत 40 हजाराची भर पडली आहे. लाखोंचे उत्पन्न मिळवून पालिका मालामाल … Read more

कास योजनेच्या कामामुळे ‘या’ दोन दिवशी साताऱ्यातील पाणीपुरवठा राहणार बंद

Satara News 2 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कास योजनेच्‍या वाहिनीस लागलेली गळती काढण्‍याचे काम पालिकेच्‍यावतीने हाती घेण्‍यात येणार आहे. त्यामुळे सातारा शहरात गुरुवारी, दि. १७ आणि शुक्रवारी दि. १८ या दोन दिवशी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्‍याची माहिती पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कास योजनेच्‍या वाहिनीस आटाळी व कासाणी गावच्‍या हद्दीत … Read more

साताऱ्यात अतिक्रमणांवर ‘सार्वजनिक बांधकाम’चा हातोडा; 3 अतिक्रमणे जमीनदोस्त

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणाविरोधात पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी शहरातील आरटीओ चौकातील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करीत 3 बांधकामे जमीनदोस्त केली. सातारा शहरात पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविले पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साताच्यातील … Read more