जिल्ह्यात ‘या’ नऊ कारखान्यांकडून 9.35 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन

Agriculture News 20240430 170735 0000

सातारा प्रतिनिधी | यंदाच्या हंगामात सातारा जिल्ह्यातील १७ पैकी ९ कारखान्यांनी ९ कोटी ३५ लाख ४६ हजार लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. राज्यात यंदा उच्चांकी १०९ लाख टनांचे साखर उत्पादन झाले आहे. राज्यामध्ये इथेनॉल निर्मितीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे इथेनॉलची निर्मिती होते. जिल्ह्याचा विचार करता अजिंक्यतारा, सह्याद्री, किसनवीर भुईंज, जरंडेश्वर, स्वराज आणि खटाव-माण या कारखान्यांकडे … Read more

राज्य शासनाकडून GR जारी; जिल्ह्यातील आणखी 12 महसूल मंडलात दुष्काळ

Satara News 76 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे राज्य शासनाकडून दोन तालुके आणि त्यानंतर इतर तालुक्यांतील ६५ मंडलात दुष्काळ जाहीर करुन उपायोजनाचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी जिल्ह्यातील नवीन आणि पर्जन्यमापक न बसविलेल्या १२ मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. गेल्यावर्षी मात्र, पर्जन्यमान कमी झाले होते. जून ते सप्टेंबर या चार … Read more

सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांकडून कलम 36 लागू;नेमकं कारण काय?

Satara News 53 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दि. 19 रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मिरवणूक कोणत्या मार्गाने व कोणत्यावेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहे. त्याचे पालन व्हावे या करिता जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 … Read more

प्रजासत्ताकदिनी साताऱ्यातील 24 किल्ल्यांवर ‘हा’ महासंघ करणार ध्वजारोहण

Satara News 20240125 072249 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे निमित्त साधून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे यावर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील अजिंक्यताऱ्यासह २४ किल्ले निवडण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवराज्याभिषेक ही हिंदुस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठी आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. यावर्षी या घटनेला ३५० वर्षे … Read more

सातारा जिल्हा परिषद भरतीचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरु…; पहिल्या टप्प्यात 8 संवर्गासाठी झाली परीक्षा

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद वर्ग 3 ची नोकर भरती सुरू असून पहिल्या टप्प्यातील शेवटची परीक्षा लघुलेखक आणि लेखाच्या कनिष्ठ सहाय्यकांची झाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 8 संवर्गाच्या या परीक्षेनंतर आता उद्या दि. 15 आॅक्टोबरपासून परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषदेमधील वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. यामध्ये सातारा … Read more

जनसुरक्षा अभियानांतर्गत नागरिकांना विमा सुरक्षा द्या : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara Collector News

कराड प्रतिनिधी । प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष जनसुरक्षा मेळावा आयोजित करुन सर्व लोकांना या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनांमध्ये समाविष्ट करण्याचे काम सुरु आहे. जनसुरक्षा अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी नागरिकांना विमा सुरक्षा द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत तालुका … Read more

सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती होणार पेपरलेस

Satara ZP

कराड प्रतिनिधी | राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचे प्रयत्न राज्य शासनाच्यावतीने केले जात आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून महा ई- ग्राम संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहेे. या प्रणालीच्या वापरातून सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे निवडलेल्या ग्रामपंचायती पेपरलेस होणार आहे. सातारा जिल्ह्यातील पेपरलेस ग्रामपंचायतीसाठी निवड केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अकरा तालुक्यातील प्रतेकी 10 ग्रामपंचायतींना … Read more

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत; नीरा नदीच्या तिरावर पादुकांचे स्नान

Mauli palkhi Ceremony News

कराड प्रतिनिधी । टाळ मृदंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरेकडे प्रस्थान झाले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माऊलींच्या पादुकांचे नीरा दत्तघाटावर स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी माऊलीच्या पालखीचे प्रशासनाच्यावतीने … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात; जाणून घ्या वाहतुकीतील बदल

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla Traffic Changes

कराड प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आज रविवारी दि. 18 जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. तब्बल 5 दिवस पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात मुक्कामी असणार आहे. या सोहळयानिमित्त जिल्ह्यात वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे. पुणे … Read more

सातारा जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

Satara reservation draw program

कराड प्रतिनिधी । राज्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण काही ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत बाकी होती. दरम्यान, राज्यातील २ हजार २१६ ग्रामपंचायतींच्या सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. तर त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता ज्या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार आहे … Read more