देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमातून जिल्हा कारागृहात बंद्यांना समुपदेशन

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. बंद्यांच्या विचारामध्ये सकारत्मक घडविण्याच्या दृष्टीने आज अनोख्या पद्धतीचा उपक्रम साताऱ्यातील कारागृहात घेण्यात आला. भारतीय सेवक संगती सातारा संस्थेच्यावतीने कारागृहातील बंद्यांसाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समुपदेशन व सकारात्मक विचारांकडे पाऊल टाकून गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर होण्याच्या कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांच्या मनोरंजनास देखील … Read more

सातारा जिल्हा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Satara News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा कारागृहात ठेवण्यात आका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काल सोमवारी घडला. यामुळे एकच खळबळ उडाली. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा कारागृहातील कैद्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज राजू माने (रा. लश्मीटेकडी, सदरबझार, सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

जिल्हा कारागृहातील बंदीसाठी आयुष्मान भारत कार्डसह विविध उपक्रमांचे उद्घाटन

Satara News 62 jpg

सातारा प्रतिनिधी । समता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहामध्ये विविध कार्यक्रम तसेच शिबीर नुकतेच घेण्यात आले. कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक श्री अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड यांचे वाटप देखीलकरण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व कारागृह अधीक्षक … Read more

सातारा जिल्हा कारागृहात ‘किऑस्क’ सिस्टीमचे उद्घाटन

Satara News 2024 02 26T150345.548 jpg

सातारा प्रतिनिधी । जिल्हा कारागृहातील बंदींना त्यांची गुन्ह्यांबाबतची सर्वतोपरी माहिती मिळण्यासाठी “किऑस्क सिस्टीम” कारागृहात कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर किऑस्क सिस्टीमचे उद्घाटन सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश श्रीमती कमला बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. किऑस्क सिस्टीमद्वारे बंदींना ते कारागृहात कोणत्या गुन्ह्यात आले, त्यांना अटक केव्हा झाली, कारागृहात दाखल केव्हा झाले, त्यांच्यावर कोणत्या पोलीस स्टेशनचा गुन्हा … Read more