परतीच्या प्रवासातील माऊलीच्या पालखीचा शेवटचा मुक्काम आज पाडेगावमध्ये

Phalatan News 20240725 094040 0000

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातील सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे गुरुवार, दि. २५ रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाडेगाव माउलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. गुरूवार दि. २५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी पाडेगाव येथील माउली सभागृहात विसावत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत … Read more

फलटण येथील पालखीतळी स्वच्छता मोहिम; संजीवराजे नाईक निंबाळकरांनी घेतला सहभाग

Phalatan News 1

सातारा प्रतिनिधी । श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या फलटण येथील पालखीतळी आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ सातारा जिल्ह्या परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी निंबाळकर यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत स्वच्छता केली. यावेळी विविध पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजीवराजे … Read more

‘माऊली’च्या वारीत आरोग्य विभागाकडून 59 हजार वारकऱ्यांवर औषधोपचार!

Phaltan News 20240710 212942 0000

सातारा प्रतिनिधी | आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सातारा जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज आहे. वारीमार्गावर सातारा जिल्हा हद्दीत प्रत्येक एक किलोमीटरवर रुग्णवाहिका उभी आहे. तर जिल्ह्यातील चार दिवसांच्या मुक्कामात आतापर्यंत तब्बल ५९ हजार वारकऱ्यांवर आैषधोपचार करण्यात आले आहेत. तसेच १८९ जणांना दाखल करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज … Read more

माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी

Phalatan News 20240710 135033 0000

सातारा प्रतिनिधी | संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. फलटणमधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळा बरडच्या दिशेने सकाळी निघाली असता फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये वारीतील वाहने तात्काळ न सोडल्याने आळंदी संस्थान विश्वस्त व पोलिसांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार घडला. फलटण मधून सकाळी माऊलींची पालखी बरडच्या दिशेने मुक्कामासाठी जात असते. जाताना … Read more

माऊलींच्या पालखीचे फलटण तालुक्यात जल्लोषात स्वागत

Phalatan News 20240709 071417 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यामध्ये कापडगाव येथील सरहद्देच्या ओढ्यावर आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. लोणंद येथील अडीच दिवसांचा मुक्काम संपवून आज माऊलींच्या पालखीचे फलटण तालुक्यात आगमन झाले. माऊलींच्या पालखीचा मुक्काम सोमवारी तरडगाव येथे पार पडल्यानंतर आज पालखीचा मुक्काम फलटण … Read more

माऊलीची पालखी आज फलटण तालुक्यात होणार दाखल; चांदोबाचा लिंबमध्ये पार पडणार पहिले उभे रिंगण

Satara News 20240708 142012 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी दुसऱ्या दिवशीही रविवारी लोणंदनगरीत विसावला आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक लोणंदमध्ये जाऊन माउली चरणी नतमस्तक झाले. लोणंद येथील मुक्काम आटोपून सोहळा सोमवारी दुपारी तरडगावकडे मार्गस्थ झाल्यावर सरदेचा ओढा येथे फलटण तालुक्याच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर चांदोबाचा लिंब येथे वारीतील … Read more

पालखी सोहळ्यात जिल्ह्यातील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 1800 फिरती शौचालये उपलब्ध

Phalatan News 20240708 081902 0000

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात प्रशासनाकडून जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्चच्छता विभागाच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी अठराशे फिरती शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याठिकाणी वारकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात लाेणंद … Read more

जिल्हा प्रशासनाच्या संवाद वारी उपक्रमास वारकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

Phalatan News 20240708 073557 0000

सातारा प्रतिनिधी | शासनाच्या विविध योजनांची व जन कल्याणकारी योजनांची माहिती जन सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या संवाद वारी उपक्रमास वारकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. लोणंद, ता. खंडाळा येथे आजपासून संवाद वारी उपक्रमाचा जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमात चित्ररथ, पथनाट्य, कला पथक आणि प्रदर्शन या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती … Read more

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी किसन वीर साखर कारखान्याकडून पाण्याचा टँकरची सोय

Satara News 20240707 071356 0000

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतूने किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत … Read more

‘माऊली’च्या गजरात पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन

Satara News 20240706 171217 0000

सातारा प्रतिनिधी | ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे दुपारी आगमन झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी खासदार धैरशिल मोहिते – पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार संजय जगताप, पुण्याचे … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरीता सातारा पोलीस दल सज्ज

Satara News 20240705 181555 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या दि.०६/०७/२०२४ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. दि.११/०७/२०२४ रोजी कालावधीमध्ये सातारा जिल्हयातून लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या मार्गाने पालखी मार्गक्रमन होणार आहे. दि.०६/०७/२०२४ रोजी निरा पुल येथे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्हयात आगमन होणार असून नमुद पालखी सोहळ्यास सुमारे ५ ते ६ लाख वारकरी … Read more

माऊलीची संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करा : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Phalatan News 20240705 154027 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील तरडगाव येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाहणी केली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे पालखी तळावरुन प्रस्थान होताच दुसऱ्याच दिवशी तळांच्या स्वच्छतेच्या कामाला गतीने सुरुवात होऊन पूर्वीसारखी चकाचक होत आहेत; विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी याबद्दल यंत्रणेचे … Read more