मोकाट रेड्यांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांनी डागली ठाकरे-राऊतांवर टीकेची तोफ

Karad News 20240117 162234 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मुंबईत झालेल्या महा पत्रकार परिषदेचा उल्लेख टाळून कराडमधील कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची योजना इथल्या कार्यक्रमात असेल तर सांगा, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे – राऊतांचा समाचार घेतला. फडणवीसांची ठाकरे-राऊतांवर टोलेबाजी कराड येथे एका … Read more

कराडात शिवसेना खा. संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर सडकून टीका

Sanjay Raut News 20240115 080630 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीचे गुलाम असून त्यांची दीड वर्षे दिल्लीत मुजरा करण्यात गेली असल्याची सडकून टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांच्या निधनानंतर श्रीनिवास पाटील यांचे सांत्वन करण्यासाठी खा. राऊत कराडला आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. … Read more

ठाकरेंकडून शिंदे गटात गेल्यावर काय काय मिळाले? मंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं

Shambhuraj Desai News (1)

कराड प्रतिनिधी । ठाकरे गटात असताना त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा असा जवळचा कुठलाच जिल्हा दिला नाही. मला जवळचा जिल्हा द्यायच्या ऐवजी त्यांनी सातारा जिल्ह्यातून उचलून ९०० कि मी लांब अशा सहा तालुक्याच्या वाशीम जिल्ह्यात नेऊन टाकलं. ३ आमदार व अर्धा खासदार असलेल्या वाशीम जिल्ह्याचं पाल्कमंत्रीपद मला दिलं. मात्र, मुख्यमंत्री … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना ठाकरे गटाचा धक्का !

jpg 20230625 164411 0000

कराड प्रतिनिधी । आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्षाकडून तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कराडात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक व कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या कॉलेजमध्ये सदिच्छा भेट दिली. तसेच इंद्रजित गुजर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत कमराबंद चर्चा केल्यानंतर गुजर ठाकरे गटात लवकरच … Read more

एकनाथ शिंदे यांचे सैन्य भाडोत्री,BJP ला बाहेरुन घ्यावा लागतोय गद्दार मुख्यमंत्री; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut News

कराड प्रतिनिधी । रशियात ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांनी नेमलेले भाडोत्री सैन्य उलटले आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य भाजपाचे भाडोत्री सैन्य असून, हे सैन्य भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही. कारण शिंदे यांचे सैन्य भाडोत्री आहे. आणि भाजपलाही अशा बाहेरून गद्दार मुख्यमंत्र्यांना घ्यावं लागतंय, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

शंभूराज देसाई मालकमंत्री की पालकमंत्री? संजय राऊतांनी डागली तोफ

shambhuraj desai sanjay raut

कराड । शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे पालकमंत्री आहेत कि मालकमंत्री? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार निशाणा साधला आहे . तसेच येत्या निवडणुकीत तुम्ही पराभूत होणारच आहात असा इशाराही त्यांनी दिला. संजय राऊत आज कराड आणि पाटण दौऱ्यावर असून कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. … Read more