सांगली अन् सातारासह ‘ही’ 4 स्थानके आरडीएक्सने उडविण्याची धमकी; बॉम्बशोध पथकाकडून कसून तपासणी

Crime News 4

सातारा प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर स्थानके आरडीएक्सने उडविण्याची धमकी देण्यात आल्याची घटना काल सोमवारी रात्री घडली. या प्रकारानंतर बॉम्बशोध पथकाने सांगली व मिरज स्थानकांत कसून तपासणी केली असून रेल्वे स्थानकांत बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री … Read more

जिल्ह्याधिकारी डुडींच्या पाणी सोडण्याबाबत सूचना; सांगलीसह कराड तालुक्यातील ‘या’ गावाचा पाणी प्रश्न लागणार मार्गी

Satara News 56 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कृष्णा कालव्यात पाणी सोडण्याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले होते. त्यांच्या पत्रातील मागणीनुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कराड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. सातारा … Read more

कोयना धरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा सांगलीकरांनी आंदोलन करून केला निषेध

Sangali News jpg

सातारा प्रतिनिधी । कृष्णा नदी अखंडित वाहणारी नदी असताना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नदी कोरडी पडत आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी कोयना धरणाचे अधिकारी सध्या सांगलीचे पाणी रोखत आहेत, असा आरोप करत संतप्त आंदोलकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सांगलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची टीका देखील आंदोलकांनी केली. सांगली येथील नागरिक … Read more

कोयनेतील विजेचे 12 TMC पाणी जिल्ह्याला द्या, सांगली जलसंपदा विभागाचा शासनाला प्रस्ताव

Koyna News jpg

सातारा प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व यातील सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवली आहे. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी सांगली जलसंपदा विभागाच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे. मे महिन्यापर्यंत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जादा पाण्याची सांगली जिल्ह्यासाठी गरज आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामधील पाणीसाठा, एकूण वार्षिक पाणी वापराचे … Read more

टेंभू सुधारित योजनेमुळे 41 हजार 003 हेक्टर क्षेत्राला पाणी; सातारासह ‘या’ जिल्ह्यातील गावांना होणार फायदा

Tembu Revised Scheme News jpg

सातारा प्रतिनिधी । आशिया खंडातील सर्वात पहिली जलउपसा सिंचन योजना टेंभू उपसा सिंचन योजना हा प्रकल्प 1996 साली सुरू झाला. महत्वकांशी असलेल्या या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ७ हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाकडून हिवाळी अधिवेशनावेळी गुरुवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांमधील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र … Read more

सांगलीकरांच्या मागणीनंतर कोयना धरणातून 1050 क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू

Koyna News 20231027 152849 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचा समजला जातो. पण, यंदा पर्जन्यमान कमी राहिल्यामुळे अनेक गावात पाणी टंचाई भासत आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यंदा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण भरले नसले तरी सांगली पाटबंधारे विभागाकडूनही मागणी झाल्याने धरणातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग आज दुपारी एक वाजता सुरू करण्यात आला आहे. … Read more

Satara News : सिंचनासाठी पुन्हा कोयनेतून सांगलीला सोडले पाणी; धरणातून ‘इतक्या’ पाण्याचा विसर्ग

Koyna Dam

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी फारच कमी प्रमाणात पाऊस झाला असल्याने बळीराजा चिंतातूर आहे. पावसाअभावी यंदा कोयना भरले नसलेतरी सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी मागणी असल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. तर धरणात सध्या ९१ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे … Read more

कुख्यात गुंडाचा झोपेतच झाला गेम!! सच्या टारझनवर कोयत्याने सपासप वार; एकास अटक

Gangster Murder News

कराड प्रतिनिधी | आपल्या दहशतीने लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या व पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड सचिन पांडुरंग जाधव उर्फ सच्या टारझन (वय ४४, रा. पारगाव खंडाळा, जि. सातारा) याचा कोयत्याने वार करून खून करण्यात असल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित हल्लेखोर गणेश विनोद मोरे (वय १९, रा.आहिल्यानगर, कुपवाड) याला कुपवाड एमआयडीसी … Read more