सातारा जिल्ह्यातून 1400 मुली, महिला बेपत्ता; आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुली किंवा महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पहायला मिळत आहे. वृत्तपत्रांमध्ये दररोज मुली अथवा महिला बेपत्ता झाल्याच्या बातम्या येत असतात. मिळालेल्या महितीनुसार आज अखेर आपल्या सातारा जिल्ह्यामधून सुमारे १४०० मुली, महिला बेपत्ता झाल्या असल्याचे समजत आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. बेपत्ता महिला, … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : प्रतिबंधात्मक कारवाईसाठी सातारा पोलिस ॲक्शन मोडवर

Satara News 2024 03 18T161715.724 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला आहे. यासाठी त्यांच्याकडून तब्बल 4 हजार 500 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. निवडणूक काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी … Read more

महामार्गावरील पादचारी पूल ‘या’ दिवशी पाडणार; महामार्गावरील वाहतुकीत होणार मोठा बदल…

Karad News 21 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे बंगळुरू महामार्गावरील कराड येथील खरेदी-विक्री पेट्रोल पंपासमोरील पादचारी पूल बुधवारी रात्री पाडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. हा पादचारी पुल दोन टप्प्यात पाडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस तसेच कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी आज कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा या … Read more

चौघांची टोळी 2 वर्षांसाठी तडीपार, जिल्ह्यातील तडीपारांची संख्या पोहचली 90 वर

Wai News jpg

सातारा प्रतिनिधी । वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी करुन खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी, शिवीगाळ दमदाटीसारखे सातत्याने गुन्हे करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२२ पासून आज अखेर जिल्ह्यातील ९० जण तडीपार झाले आहेत. अक्षय गोरख माळी, सनी ऊर्फ राहुल सुरेश जाधव, सारंग ज्ञानेश्वर माने, आणि वसंत ताराचंद … Read more

घाटजाईदेवी पालखीसाठी आज आणि उद्या वाहतूक मार्गात बदल

Satara News 2024 03 05T141919.894 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील घाटघाई देवीची आज आणि उद्या यात्रा होत आहे. दरम्यान, पाचगणी बसस्थानक ते घाटजाई मंदिर परिसरात भव्य पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या बुधवार, दि. 6 या कालावधीत सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी … Read more

जुनी जिल्हा लोकल बोर्ड इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित होणार : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 2024 03 04T184950.956 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद परिसरातील जुनी जिल्हा लोकल बोर्ड इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या वारसा स्थळाच्या कामाचे आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, रविराज देसाई, जयराज देसाई, … Read more

सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांकडून कलम 36 लागू;नेमकं कारण काय?

Satara News 53 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दि. 19 रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मिरवणूक कोणत्या मार्गाने व कोणत्यावेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहे. त्याचे पालन व्हावे या करिता जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 … Read more

पार्सलमधील साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक; 41 मोबाईलसह पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News 37 jpg

सातारा प्रतिनिधी | शिरवळ (ता. खंडाळा) हद्दीतील इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सर्व्हिर्सेस प्रा.लि. या कपंनीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या पार्सलमधील महागड्या मोबाईलसह अन्य साहित्याची चोरी झाली होती. कर्मचारीच या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार निघाला असून पोलिसांनी कार्यालयीन कर्मचारी आणि वाहन चालकास अटक केली आहे. चोरीस गेलेल्या एकूण १२ लाख २० हजार रूपयांच्या मुद्देमालापैकी ६ लाख ७० हजार रूपये किंमतीचे ४१ … Read more

सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई, PickPocketing करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

Crime News 36 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील बस स्थानक परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवून प्रवाश्यांचे सोन्याचे दागिणे, साहित्य याची चोरी करणाऱ्या टोळींवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या टोळीतील तीन सदस्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 32 लाख 6 हजार 700 रुपये किमतीचे 50.1 तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत केले आहेत. रुपाली अर्जुन सकट (रा. जयसिंगपूर), गीता … Read more

एसपी साहेबांनी केला पाचगणी पोलिसांचा साताऱ्यात गौरव

Satara News 24 1 jpg

सातारा प्रतिनिधी । नोव्हेंबर महिन्यामध्ये पाचगणी पोलिस ठाण्याने उत्कृष्ट काम करून दुसऱ्यांदा दोषसिद्धी प्राप्त करीत अव्वल दर्जाचे काम केले. याबद्दल पाचगणी पोलिस ठाण्याचे प्रभारी तथा पोलिस निरीक्षक राजेश माने व त्यांच्यासह अंमलदारांचा सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रत्येक महिन्यात जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख हे जिल्ह्यातील सर्वच … Read more

जिल्ह्यात हाॅटेल्स, ढाब्याच्या वेळेबाबत पोलिसांचा मोठा निर्णय; आता ‘ही’ वेळ होताच होणार शटर डाऊन

Satara News 11 1 jpg

सातारा प्रतिनिधी । रात्रीच्या वेळी हाॅटेल्स, ढाबे निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू राहण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. याचा विचार करुन पोलिस अधीक्षका समीर शेख यांनी रात्री १० पर्यंत खाद्यपदार्थ पुरविण्यास तर ११ : ३० वाजेपर्यंत आस्थापना बंद करण्याचा मोठा निर्णय जारी केला आहे. यामुळे यापुढे संबंधितांना वेळ पाळावी लागणार आहे. अन्यथा … Read more

ढोल-ताशांच्या गजरात प्रतापगडावर साजरा झाला शिवप्रताप दिन सोहळा

Satara News 4 1 jpg

सातारा प्रतिनिधी । ढोल – ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडसी खेळांची अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिके अशा अलोट उत्साहात आज मंगळवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर … Read more