विश्रांतीनंतर जिल्ह्यात पाऊस झाला सक्रिय; ढगांच्या गडगडाटासह मुसळधारपणे लावली हजेरी

Satara News 20240817 185353 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अनेक दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. दरम्यान, जिल्ह्यात आज खऱ्या अर्थाने शनिवारी पाऊस पुन्हा सक्रीय झाला. शुक्रवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात धो-धो पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. तर सातारा शहरात आठवड्यानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. आॅगस्ट उजाडल्यानंतर पावसाचा जोर … Read more

सातारा जिल्ह्याला आज यलो अलर्ट; कोयना धरणात पाणीसाठा किती?

Koyna News 20240807 090400 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर रात्रीपासून पुन्हा सुरु झाला आहे. तर उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे काल बंद करण्यात आलेले असून आज बुधवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 86.78 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण परिसरात पावसाचा … Read more

जावळीच्या रांजणीवर भूस्खलनाचा धोका, घोटेघर-सुलेवाडीतील डोंगराला मोठमोठ्या भेगा

Satara News 20240730 102139 0000

सातारा प्रतिनिधी । सध्या पावसाची संततधार कायम असून जमीन घसरण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. जसजसे पावसाचे प्रमाण वाढत आहे, तसतसे पावसाचे पाणी या भेगांमध्ये जाऊन या भेगा रुंदावत चालल्या आहेत. डोंगरात रुंदावत चाललेल्या या भेगांमुळे २५ ते ३० एकराचा डोंगरच रांजणी गावाच्या दिशेने घसरत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगरावर असलेल्या सुलेवाडी लोकवस्तीतील लोक भीतीच्या छायेखाली … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाचा लपंडाव; कोयना धरणात किती पाणीसाठा?

Koyna Dam News 3

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात कोयना पाणलोट क्षेत्रात आज पावसाने कमी हजेरी लावली. मात्र, संततधारेमुळे धरण पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची अवाक झाली आहे. सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला तरी कोयना धरणात आज सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 84.99 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाण्याची अवाक झाल्याने धरण 80.75 टक्के भरले आहे. सातारा जिल्ह्यात शुक्रवार … Read more

मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाच्या तोंडावरच रुतला ट्रक, स्टेशनला जाणारा रस्ता बंद

Karad News 20240728 082235 0000

कराड प्रतिनिधी | पावसामुळे कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे हद्दीत असलेल्या रेल्वे पुलाच्या अंडरपास बोगद्यात पाणी साचल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना चिखलाचा राडारोडा झाला आहे. त्यातच सकाळी पुलाच्या तोंडावरच ट्रक रुतल्याने नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन ग्रामस्थांचा रस्ता सहा तास बंद झाल्याने वाहनांची ये- जा पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. रस्ता … Read more

पावसाचा जोर ओसरला; ब्रिटिशकालीन खोडशी धरणातील पाणीसाठा 4 फुटांनी झाला कमी

khodashi dam News 20240727 202200 0000

कराड प्रतिनिधी | कराडजवळ कृष्णा नदीवर असलेले ब्रिटिशकालीन खोडशी धरण दमदार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र, कालपासून पावसाने उघडीप दिल्याने बंधाऱ्यातील पाणीपातळी चार फुटांनी कमी झाली आहे. खोडशी येथील ब्रिटिशकालीन बंधारा गेल्या महिनाभरापासून ओसंडून वाहत आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत असल्या त्यामुळे पर्यटकांची वर्दळ देखील वाढली आहे. कृष्णा नदीवर १८६४ मध्ये बांधले … Read more

कोयना धरणाचे दरवाजे आज 1 फूट 6 इंचाने उघडणार, पाणलोट क्षेत्रात झाला विक्रमी 707 मिलीमीटर पाऊस

Koyna Dam News 1

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी दुपारी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडले जाणार आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात येणार आहेत. … Read more

कोयना धरणात ‘इतका’ TMC झाला पाणीसाठा

Koyna Dam Rain News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत असून २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळला असून रविवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार नवजा येथे 127 तर कोयनानगरला 107 मिलीमीटरची नोंद झाली. तसेच महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत या ठिकाणी सर्वाधिक 158 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात पाणीसाठ्यात वाढ … Read more

कोयना पाणलोटात मुसळधार पाऊस; धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 20240720 093323 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु असून, धरण निम्म्याने भरण्याच्या मार्गावर आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पाऊस कायम आहे. कोयनेचा जलसाठा साडेतीन टीएमसीने वाढून 50.76 टीएमसी तर 48.23 टक्के पाणीसाठा झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या नऊ तासांत कोयना धरणक्षेत्रात १६५ मिलीमीटर (साडेसहा इंच) एकूण २,२८८ मिलीमीटर (वार्षिक … Read more

कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 7

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी 24 तासांत नवजाला सर्वाधिक 2 हजार 454 मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात 44.06 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत … Read more

पावसाची उघडीप मात्र, खरीप हंगामातील पिके जोमात; धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan News 12

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाच्या काहीशा विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना धरणातील आवकही कमी झाली असलीतरी पाणीसाठा ४२ टीएमसीवर पोहोचला आहे. पावसाने उघडीप दिली … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार, 24 तासात विक्रमी 560 मिलीमीटर पावसाची नोंद

Patan News 7

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून मागील चोवीस तासात विक्रमी ५६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आज देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीवर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचं धुमशान जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाचं धुमशान सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस … Read more