कोयना धरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा सांगलीकरांनी आंदोलन करून केला निषेध

Sangali News jpg

सातारा प्रतिनिधी । कृष्णा नदी अखंडित वाहणारी नदी असताना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नदी कोरडी पडत आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी कोयना धरणाचे अधिकारी सध्या सांगलीचे पाणी रोखत आहेत, असा आरोप करत संतप्त आंदोलकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सांगलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची टीका देखील आंदोलकांनी केली. सांगली येथील नागरिक … Read more

साताऱ्यात सत्वशीला भाभींचा रूद्रावतार, अधिकाऱ्यांना म्हणाल्या, Bring The Saline Here, Do It, Move..

Satara News 78 jpg

सातारा प्रतिनिधी | विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा परिषदेसमोर नऊ दिवसांपासून ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण (भाभी) या आंदोलनस्थळी आल्या होत्या. संघटनेच्या राज्यध्यक्षा सुनीता आमटे यांची प्रकृती खालावल्याचे पाहून त्या शासकीय अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. सलाईन इथे घेऊन या, तातडीने जा, अशा कडक … Read more

‘उबाठा’ची शिवसेना जिल्हयातील आनेवाडी टोलनाक्यावर करणार आंदोलन…

Satara News 20240113 235510 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावरील टोल वसुलीच्या मुद्यावरून सातारा जिल्ह्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले. टोल नाक्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी उबाठा गटाचे पदाधिकारी सोमवार दि. 15 रोजी आनेवाडी टोलनाक्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत टोलमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, … Read more

मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Satara News 20240109 213841 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मानधनवाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आदी मागण्यांसाठी मागील एक महिन्यापासून संप सुरू केला असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन केले. यावेळी कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही असा नारा देत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (सीटू) वतीने हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा काॅ. … Read more

ऊस दरासाठी रयत क्रांती संघटना शुक्रवारी करणार आंदोलन : सचिन नलवडे

Karad News 20231122 164023 0000 jpg

कराड प्रतिनिधी | यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल 3500 व मागील वर्षीचे दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी कराड तालुक्यातील बनवडी फाटा येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशा्ध्यक्ष तथा ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ … Read more

शालेय गणवेश घालून RPI कार्यकर्त्यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन…

Satara RPI News 20231003 225840 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा बंद करण्याचा नुकताच निर्णय शासनाने घेतला आहे. तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्याचा गणवेश घालून जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांनी समक्ष निवेदन स्वीकारावे, असा … Read more

काळया फिती लावून सामाजिक संघटनांकडून पुसेसावळीतील घटनेचा निषेध; प्रशासनास थेट दिला ‘हा’ इशारा

Pusesavali Crime News 20230912 000424 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेसावळीतील घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांच्या मूक मोर्चाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी या संघटनांच्या प्रतिनिधींनी तोंडाला काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच निवासी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी 2 ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही झाली नाही तर त्याच दिवशी तीव्र आंदोलन करणार असल्याचा … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा अवतरला ‘एक मराठा, लाख मराठा’; मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Maratha Kranti Morcha News 20230904 144823 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना येथील आंदोलन करत असलेल्या मराठा समाज बांधवांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली. मराठा क्रांतीच्या हाकेला संपूर्ण जिल्हा धावून गेला. जिल्ह्यात सातारा, कराड, पाटणसह फलटण येथील विविध व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत पाठींबा दिला. या आजच्या बंदमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक … Read more

साताऱ्यातील पोवई नाक्यावर मराठा क्रांती मोर्चातर्फे निदर्शने; रास्ता रोको करत घोषणाबाजी

Satara News 20230903 114623 0000 2 jpg

सातारा प्रतिनिधी | जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे सातारा जिल्ह्यातही असंतोषाचा भडका उडाला आहे. या घटनेचा निषेध करीत सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी शनिवारी तीव्र आंदोलने करण्यात आली. दरम्यान, सातारा येथील पोवई नाक्यावर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विवेकानंद बाबर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी‘मिंधे सरकार’ विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, सोमवारी (दि. 4 … Read more

कराडात मराठा क्रांती मोर्चाकडून जालनातील लाठीचार्जच्या घटनेचा निषेध

Karad News 20230902 151918 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद शनिवारी कराड येथे उमटले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शनिवारी कराडच्या दत्त चौकात निषेध नोंदविण्यात आला. 15 सप्टेंबरपर्यंत संबंधितावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत गृहमंत्र्यांनी … Read more

कराडात पत्रकारांवरील हल्ले विरोधात अखिल मराठी पत्रकार संघाचे निषेध आंदोलन

20230817 235738 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍या निषेधार्थ राज्यातील बहुतांशी पत्रकार संघटनानी आज ठिकठिकाणी याबाबतचा निषेध नोंदवत आंदोलने केली. सातारा जिल्हा अखिल मराठी पत्रकार संघाच्या वतीने देखील आज कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे याना याबाबत निषेध व्यक्त करणारे निवेदन … Read more

सातारा जिल्ह्यात आज पत्रकरांच्यावतीने पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

Jarnalist News 20230817 091258 0000 jpg

कराड प्रतिनिधी । पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍या निषेधार्थ सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आज, गुरुवार, दि. १७ ऑगस्‍ट रोजी दुपारी १२ वाजता सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर तसेच तालुका स्‍तरावर त्‍या त्‍या सर्व तहसील कार्यालयांसमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करुन … Read more