आमदार जयाभाऊंनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोरच बोलून दाखविला संकल्प

Man News 20240226 102604 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर) चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी थेट फडणवीस यांच्या समोर एक संकल्प केल्याचे बोलून दाखविले. जोवर माण -खटावच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचणार नाही, तोवर विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका … Read more

महाबळेश्वरातील विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Satara NEWS 20240224 101854 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे विभागीय नाट्य संमेलन महाबळेश्वरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री आज शनिवारी (दि. २४) सातारा आणि महाबळेश्वरच्या दौऱ्यावर येत आहेत. खासदार उदयनराजेंचे करणार अभिष्टचिंतन मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने दुपारी बाराच्या सुमारास साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर आगमन होणार … Read more

“प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी…”; लोकसभा उमेदवारीवरून उदयनराजेंचं महत्वाचं विधान

satara News 83 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. काही पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढण्याबाबत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महत्वाचे विधान केले आहे. “लोकसभा निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यात … Read more

झालो तर आमदार नाही तर खासदारच होणार;फलटणच्या मेळाव्यात महादेव जानकरांचा निर्धार

Mahadev Janakar News jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आज फलटणमध्ये विजय निर्धार सभा घेत भूमिका स्पष्ट कर विरोधकावर निशाण साधला. आजच्या मेळाव्यासाठी साडे तीन लाख रुपये गोळा झाले. आणि खर्च जेवणासह २ लाख १० हजार रुपये झाला. हाच कार्यक्रम जर भाजप किव्हा काँग्रेसला घ्यायचा असता तर १ कोट रुपये खर्च केले … Read more

‘रासप’चे महादेव जानकर ‘या’ मतदारसंघांतून लोकसभा निवडणूक लढवणार

Mahadev News 20240215 132649 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये खास करून माढा लोकसभा निवडणुकीसाठी अधिक चुरस पहायला मिळणार आहे. कारण या लोकसभा मतदार संघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी किंवा माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष जानकर या मतदारसंघातून शड्डू ठोकणार … Read more

खा. निंबाळकरांनी घेतली नड्डांची भेट; केली ‘या’ महत्वाच्या विषयांवर चर्चा

Satara News 42 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत अधिवेशनासाठी गेले आहेत. या दरम्यान, दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपच्या कार्यालयात पक्षाध्यक्ष नड्डा यांची नुकतीच भेट घेतली. तसेच त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची व प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी संसदेमध्ये व विकासकामांच्या मंजुरी व निधी … Read more

राष्ट्रवादीच्या विजय निश्चय मेळाव्यात पवार गटाच्या नेत्याकडून अजितदादांवर हल्लाबोल

b2ca3421 37f3 4756 9d12 f6499ba0f158 jpg

सातारा प्रतिनिधी | पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. २०१९ साली सोडून गेलेल्या लोकांच्या बाबतीत जे झालं तेच २०२४ साली त्यांच्या बाबतीत होणार आहे. ज्या लोकांना पवार साहेबांनी लाल दिवे दिले त्या लोकांनी नागपूरचे मांडलीकत्व पत्करले. असं म्हणत शरद पवार … Read more

लोक तुम्हाला कधी पोहचवतील, याचा नेम नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा

Patan News 20240206 084544 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | “परिस्थिती अवघड आहे. संकटाची आहे. आपलीच माणसं फुटल्यामुळं परिस्थिती जास्त गंभीर वाटायला लागली आहे. परंतु, जे गेलेले आहेत ते अडचणीमुळे गेलेले आहेत. त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या. आपण नीट राहुया. महाराष्ट्रातील लोकं फार पोहचलेली आहेत. कधी तुम्हाला आम्हाला पोहचवतील याचा नेम नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी … Read more

“आमचा खासदार असाच सर्वसामान्य असावा”; सातारा लोकसभेला सारंग पाटील यांना उमेदवारी?

Sarang Patil News jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हा हा राजकीयदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत या जिल्ह्याचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून सर्वच पक्ष आपापले उमेदवार उभे करण्यासाठी मोर्चे बांधणी करू लागले आहेत. जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुक लढण्यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार … Read more

BJP ने पाटणमध्ये केली ‘कमळ’ फुलवण्याची तयारी, विक्रमबाबांवर दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

Patan News 20240201 044830 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. काहींनी लोकसभेचे उमेदवार ठरवले असून त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात अगोदर अजित पवार गटाने जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी बारामतीच्या शिलेदराची निवड केली. त्यानंतर भाजपनेही फळतांसह जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडीला सुरुवात केली … Read more

रामराजे नाईक निंबाळकर लोकसभा निवडणुकीबाबत आज भूमिका स्पष्ट करणार? फलटणमध्ये घेणार कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक

Phaltan News 20240201 034058 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने फलटण तालुक्यातील राजे गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात आज दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस आ. रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गत काही महिन्यांपूर्वी आ. रामराजे … Read more

अजितदादांच्या पाठोपाठ आता जिल्ह्यात ‘भाजप’कडूनही पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या

Phaltan News 3 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या सातारा निरीक्षकपदी बारामतीचे किशोर मासाळ यांची निवड केली व त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. आता त्याच्या पाठोपाठ भाजपही तयारीला लागले असून भाजपच्या सोशल मीडिया आयटी सेलच्या … Read more