महायुतीकडून कराड उत्तरसाठी मनोज घोरपडेंना उमेदवारी जाहीर; उद्याच भरणार अर्ज

Karad News 20241027 214007 0000

कराड प्रतिनिधी | जिल्ह्यातील बहुचर्चित कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कराड उत्तरचे निवडणुक प्रमुख मनोज घोरपडे या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अखेर आज यश आले असून शनिवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोजदादा घोरपडे यांच्या … Read more

महादेव जानकर महायुतीतून बाहेर; सातारा जिल्ह्यात ‘या’ मतदार संघात दिले उमेदवार

Mahadev Janakar News 20241027 071302 0000

राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेकांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व राजकीय नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशातचं आता राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील सातारा आणि कराड उत्तर या दोन … Read more

सत्यजितसिंह पाटणकर हाच आपला पक्ष अन् उमेदवार; पाटणच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार

Patan News 20241025 070956 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर नाराज असलेल्या शरदचंद्र पवार गटाचे नेते सत्यजित पाटणकर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान पाटणकर यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते जाणली. यावेळी १९८३ मध्ये झालेल्या अन्यायानंतर पाटणच्या स्वाभिमानी जनतेने उठाव करून … Read more

नेत्यांच्या फोडाफोडीबद्दल शरद पवारांना नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे; उदयनराजेंचा खोचक टोला

Karad News 20241024 193353 0000

कराड प्रतिनिधी | नेत्यांच्या फोडाफोडीबद्दल शरद पवारांना नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, अशी खोचक टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या सोयीपसाठी जे इकडे तिकडे गेले असतील, त्यांना लोक माफ करणार नाहीत, असंही उदयनराजे म्हणाले. दुष्काळी भागातीय योजना कोणाच्या काळात … Read more

कराड दक्षिणेत ‘पृथ्वीराज’ अन् ‘अतुल’बाबांमध्ये होणार तगडी फाईट; डॉ. अतुल भोसलेंनी भरला उमेदवारी अर्ज

Karad News 20241024 133204 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, तो ढासळण्यासाठी महायुतीचे कराड दक्षिणचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी चांगलीच तयारी केली आहे. यावेळेस देखील विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. अतुल भोसले यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ. सुरेश भोसले, … Read more

फलटणमध्ये भाजपला धक्का; माजी नगरसेवक भरत बेडकेसह अजिंक्य बेडके पुन्हा राजेगटात

Phalatan News 20241024 103631 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा फलटणमधील उद्योजक भरत दत्ताजीराव बेडके व त्यांचे चिरंजीव अजिंक्य बेडके यांनी राजेगटप्रणित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मागील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी पुन्हा माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची बुधवारी सकाळी भेट घेतली. दरम्यान, त्यांनी चर्चा केल्यानंतर सातारा जिल्हा … Read more

भाजपची पहिली यादी जाहीर; साताऱ्यातून शिवेंद्रराजे, माणमधून जयकुमार गोरे तर कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसलेंना उमेदवारी

BJP News 1

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आज भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपच्या या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून या कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर साताराजिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, माणमधून जयकुमार … Read more

…तर पश्चिम महाराष्ट्रात 58 जागा स्वबळावर लढवणार; साताऱ्यात आरपीआय गटाच्या नेत्यानं दिला थेट इशारा

Satara News 18

सातारा प्रतिनिधी । महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कार्यकर्त्यांच्या सन्मानाची वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते. महायुती सरकारने मागासवर्गीय समाजाचा निधी अन्यत्र वळवला आहे. त्यामुळे आमचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आदेश दिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागा स्वबळावर लढवण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांनी दिला आहे. साताऱ्यात रिपाइंच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची … Read more

माणचा कोण मानकरी ठरणार? जयकुमार गोरेंविरोधात वस्ताद देणार ‘तगडा’ उमेदवार

Man News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसघांत कोण होणार आमदार अशी चर्चा सुरु आहे तशी सर्वाधिक उमेदवार ज्या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्या माण खटाव विधानसभा मतदारसंघात देखील अशीच चर्चा आहे. या विधानसभा मतदार संघात भाजपकडून (BJP) राजकारणातील डावपेच खेळण्यात पैलवान समजल्या जाणाऱ्या आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी दंड थोपटले आहेत. 2019 च्या हाय … Read more

दरेगावी आलेल्या मुख्यमंत्री शिंदेंचा ‘मविआ’ला टोला; म्हणाले, त्यांनी अगोदर मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा…

Satara News 20241018 221809 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी काल रात्री आले होते. आज मुंबईकडे जात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री निवडीच्या चर्चेवरून महाविकास आघाडीला टोला लगावला. “महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन वादविवाद सुरु आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचा उमेदवार ठरविण्यापेक्षा विरोधीपक्षनेते पदाचा उमेदवार ठरविणे गरजेचे आहे. कारण आघाडीतील नेत्यांच्या तंगड्यात … Read more

जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; ते तर पक्षाचे अध्यक्ष…

Karad News 84

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत मोठं विधान केलं. “विधानसभेसाठी जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. “जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत’.” असे पवार यांनी यावेळी म्हंटले. प्रदेशाध्यक्ष … Read more

परिवर्तन महाशक्ती आघाडी 6 ठिकाणी लढणार निवडणूक; साताऱ्यात राजू शेट्टींनी घेतली पत्रकार परिषद

Political News 3

सातारा प्रतिनिधी । स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना व कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येत नुकतीच परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे. या तिसऱ्या आघाडीने राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीमध्ये रणशिंग फुंकले आहे. सर्वसामान्यांच्या विकासाचे प्रश्न घेऊन आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव हे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन सातारा जिल्ह्यात ही तिसरी आघाडी सहा … Read more