फलटणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रामराजेंची खोचक टीका; म्हणाले की…

Phaltan News 20240322 065801 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | नरेंद्र मोदी, अमित शहा आम्हाला माहिती नाहीत. आम्ही तेवढे मोठे पण नाही. आमचं देणं घेणं अजितदादांशी आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी रणजितसिंह निंबाळकरांनाच मुख्यमंत्री करा, अशी खोचक टीका आमदार रामराजे नाईक-निंबाळकरांनी कोळकी (ता. फलटण) येथील मेळाव्यात केली. मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही भावनेच्या भरात तुतारी धरु, मशाल धरु, शिट्टी … Read more

खासदार उदयनराजे अचानक दिल्लीला रवाना, उमेदवारीचा गुंता सुटणार?

Satara News 20240321 064244 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा गुंता सुटायला तयार नाही. तो गुंता सोडवण्यासाठी आणि उमेदवारीच्या संदर्भात निर्णायक चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीला रवाना झाले आहेत. राजे समर्थकांचे फोन अचानक आऊट ऑफ कव्हरेज लागू लागल्याने राजांच्या दिल्लीवारीच्या शक्यतेला पुष्टी मिळाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा लोकसभेत पुढच्या दाराने सभागृहात पोहोचण्याचा चंग बांधला आहे. … Read more

Udayanraje Bhosale : मंत्री गिरीश महाजनांनी घेतली खा.उदयनराजेंची भेट; जलमंदिर पॅलेसमध्ये केली कमराबंद चर्चा

Satara News 2024 03 18T130508.915 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहे. अशातच सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच भाजपच्या उमेदवार यादीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे नाव नसल्यामुळे उदयनराजे नाराज तर नाहीत ना? अशी चर्चा सध्या सुरु आहे. अशात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात उदयनराजेंची … Read more

Ramraje Naik Nimbalkar : सातारा लोकसभेची जागा अजितदादा गटाकडे; रामराजे नाईक निंबाळकरांना उमेदवारी निश्चित?

Satara News 2024 03 15T202717.634 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत निर्णय होत नव्हता. महायुतीतील तिन्ही पक्षांचे एकमत न झाल्यामुळे जागावाटपाची बोलणी लांबली असली तरी भाजपने आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांच्या उमेदवार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या दरम्यान, आज अजित पवार गटाने मागणी … Read more

पाटणच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, कितीही आरोप केले तरी मी…

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पणासह पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आयोजित सभाईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मी राज्याचा चिफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री म्हणून नाही तर कॉमन मॅन म्ह्णून काम करत आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या राखणारा मी … Read more

साताऱ्यात वाघ यांचे उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत महत्वाचे विधान तर सुळेंवर घणाघाती टीका

Satara News 69 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने काल महिला दिनानिमित्त ‘महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी “जेव्हापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, हे माहिती झाले, तेव्हापासून राज्यातील मोठ्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडले आहे,” अशी टीका खा. सुळे यांच्यावर केली तर “उदयनराजेंना … Read more

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा जिल्हा दौरा, उद्या ‘या’ कार्यक्रमांना लावणार हजेरी

Madha Lok Sabha 2024 20240308 084809 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, राज्यात लोकसभेचा जागा वाटपाचा घोळ अजूनही मिटता- मिटेना असा झाला आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा मानला जाणारा सातारा जिल्हा हा आपल्याकडे कसा येईल यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून सातारच्या जागेबाबत ते … Read more

सोशल मीडियावर झळकले अजितदादा गटाचे नितीन पाटलांचे बॅनर

Satara News 20240305 073728 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाला मिळाल्याची चर्चा साताऱ्यात सुरू झाली आहे. तसेच भावी खासदार म्हणून लोकसभेसाठी अजितदादा गटातून इच्छुक असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचे भावी खासदार म्हणून बॅनरही सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. अजितदादा गटाला जागा मिळाल्याची चर्चा सातारा लोकसभेची जागा महायुतीत … Read more

साताऱ्यात RPI च्या आठवलेंचे खा. उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत महत्वाचे विधान

Satara News 2024 03 02T174004.987 jpg

सातारा प्रतिनिधी । आज साताऱ्यात आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत महत्वाचे विधान केले. राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक मोठे नेते महायुतीत येत आहेत. पक्ष फुटत चालला आहे. त्यामुळे राहूल गांधी यांनी भारत जोडण्याचे सोडून स्वत:चा … Read more

कराडात चित्रा वाघ कडाडल्या, संदेशखालीतील घटनेचा निषेध करत ठाकरेंसह राठोडांवर साधला निशाणा

Karad News 53 jpg

कराड प्रतिनिधी । आज संपुर्ण राज्यभरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून संदेशखालीतल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. याला पाठिंबा म्हणून आज कराड भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने येथील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी चालता-बोलता नरक बनलीय. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जींसारखी … Read more

आमदार जयाभाऊंनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोरच बोलून दाखविला संकल्प

Man News 20240226 102604 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर) चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी थेट फडणवीस यांच्या समोर एक संकल्प केल्याचे बोलून दाखविले. जोवर माण -खटावच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचणार नाही, तोवर विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका … Read more

महाबळेश्वरातील विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Satara NEWS 20240224 101854 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे विभागीय नाट्य संमेलन महाबळेश्वरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री आज शनिवारी (दि. २४) सातारा आणि महाबळेश्वरच्या दौऱ्यावर येत आहेत. खासदार उदयनराजेंचे करणार अभिष्टचिंतन मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने दुपारी बाराच्या सुमारास साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर आगमन होणार … Read more