सातारा जिल्ह्यात मतदानाचा वाढला वेग…; ‘या’ ठिकाणी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान

IMG 20241120 WA0014

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला असून सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात चांगले मतदान पार पडले आहे. यामध्ये २५५ फलटण : 17.98, २५६ वाई : 18.55, २५७ कोरेगाव : 21.24, २५८ माण : … Read more

उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर शंभुराज देसाई चांगले भडकले; म्हणाले, “ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय त्यांनी…”

Patan News 8

पाटण प्रतिनिधी । आज पाटण येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे उमेदवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेमुळे शंभुराज देसाई चांगलेच भडकले. त्यांनीही उद्धव ठाकरे यांना लगेच प्रत्युत्तर दिले. “मी माझी पत्नी प्राप्तिकर भरतो, त्यामुळे कुठल्याही आणि कसल्याही चौकशीला सामोरं जाण्यास मी तयार आहे. मी मुख्यमंत्री … Read more

“जो करेल मला मंत्री, त्याचा होणार मी वाजंत्री”; पाटणमध्ये उद्धव ठाकरेंचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल

Patan News 7

पाटण प्रतिनिधी । “शिवसेना म्हणजे काय गांडुळांची औलाद आहे? असं तुम्हाला वाटतं. म्हणजे शिवसेनेनं मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत. आता गद्दारांबरोबर जाऊन मंत्री होणार म्हणून तिकडे. जो करेल मला मंत्री, त्याचा होणार मी वाजंत्री. बस वाजंत्री वाजवत. “पाटणमध्ये एक गद्दार आहे. तो राज्यातील मंत्री लुटमार मंत्री आहे. त्याने मंत्री असताना सरकारी पैशांचा वापर कसा केला हे … Read more

साताऱ्यातील पाटणमध्ये आज उध्दव ठाकरेंची तर कराड उत्तरमध्ये योगींची तोफ धडाडणार

Karad News 20241117 085349 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात रविवारी स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. पाटण विधानसभा मतदार संघात उध्दव ठाकरे तर कराड उत्तरमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. पाटण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) नेते उध्दव ठाकरे आणि कराड उत्तरमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे रविवारी जाहीर सभा घेणार आहेत. … Read more

लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांना किती फायद्याची अन् तोटीची?; साताऱ्यात शरद पवारांचे महत्वाचे विधान

Satara Sharad Pawar News

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर टीका केली. “लोकांना खूश करण्यासाठी त्यांनी लोकांना आनंदी ठेवणारी योजना आणली, लोकांना पैसे दिले. योजना किती दिवस टिकणार याची माहिती द्यायला हवी होती. आज निवडणुका काढायच्या ही त्यांची मानसिकता आहे. लाडकी बहीण योजनेतून महिन्याला पैसे देऊन … Read more

अजितदादांची उद्या फलटणमध्ये सभा; नेमकं काय बोलणार?

Ajit Pawar News 20241116 090717 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उद्या फलटण दौऱ्यावर येत आहेत. उद्या, रविवार, दि. 17 रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. … Read more

कराड उत्तरेत पालीचा खंडोबा कुणाला पावणार? सहाव्यांदा रिंगणात उतरलेल्या बाळासाहेबांसमोर ‘मनोधैर्य’चे तगडे आव्हान

Political News 1

कराड प्रतिनिधी । सध्या २०२४ मधील विधानसभा निवडणूक हि अटीतटीची असून सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघात नऊ आमदार निवडणूक लढवत असून निवडणुकीत कुणाच्या अंगांवर विजयाचा गुलाल पडणार आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून बाळासाहेब पाटील सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत तर, त्यांच्या … Read more

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या बॅगा, साहित्याची कराड विमानतळावर तपासणी, नेमकं काय घडलं?

Karad News 19

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आता अखेरचा टप्पा सुरू झाल्यामुळे स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका सुरू आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांच्या विमानांची तसेच बॅगांची कराड विमानतळावर कसून तपासणी करण्यात आली. अंबाबाईच्या दर्शनाने प्रचाराची सुरुवात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पश्चिम … Read more

बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवार मैदानात; सातारा जिल्ह्यात 2 दिवसांत घेणार तब्बल पाच सभा

Sharad Pawar News

सातारा प्रतिनिधी । महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माण, फलटण, वाई, कराड उत्तर आणि कोरेगाव हे पाच मतदारसंघ लढवत आहे. मागील वेळी सहा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार होते, तर एका ठिकाणी अपक्षाला पाठिंबा होता. दरम्यान, खासदार शरद पवार हे शेवटच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यात सभा घेणार आहेत. यामध्ये त्यांचा एक दिवस मुक्काम असून, दोन दिवसांत … Read more

जिल्ह्यात नेत्यांच्या धडाडणार तोफा; पवार, ठाकरे, गांधींसह गडकरी, योगी, फडणवीसांची सभा

Satara News 20241114 100447 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सातारा जिल्ह्यातील चुरशीच्या लढती होणाऱ्या मतदारसंघांत दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभातून तोफा धडाडणार आहेत. यामध्ये महायुतीकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, तर महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, अमोल कोल्हे … Read more

लाडक्या बहिणींना अभिजित बिचुकले देणार 25 लाख रुपये; जाहीरनामा केला प्रसिद्ध!

Abhijit Bichukale News 20241114 080416 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलीच रंगत आली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. अशातच साताऱ्यातून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीतही नशीब आजमावत आहे. आज बिचकुलेनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी, त्याने उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यावरही टीका केली. तसंच महिलांना 25 लाख रुपये १ टक्के … Read more

विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’; नेत्यांवर मनधरणीची वेळ

Satara News 29

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचारसभा, रॅली, पदयात्रा, बैठकांचा धडाका सुरू आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस उरले असून राजकीय पक्षांना प्रचारासाठी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांसाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्व व्यवस्था करून मेजवानी द्यावी लागत आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत प्रचंड चुरशीने प्रचार यंत्रणा राबवली जाऊ लागली … Read more