वाहने आडवून लूटमार करणारी टोळी जेरबंद; टोळीत कराड, माणमधील आरोपींचा समावेश

Phaltan News 20241114 202855 0000

सातारा प्रतिनिधी | मोहोळ पोलीस ठाणेकडील डीबी पथकाला बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर योग्य ती कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यातील स्टाफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड, माण … Read more

पुणे, सातारा जिल्ह्यातील मंदिरातील देवांच्या मुर्ती चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 20240919 171947 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील मंदीरातील देवांच्या मुर्ती चोरणारी टोळी सुपे (ता.बारामती) येथील पोलीसांनी मोठ्या शिताफीने, सिनेमा स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतली. यामध्ये एका अल्पवयीनचा समावेश आहे. टोळीकडून सुमारे १०७ वर्षापूर्वीची पुरातन धातूची पानेश्वराची मुर्ती, देवीचा मुखवटा, १५ घंटा, मुकूट, समई, पंचार्ती, मंदीरातील अन्य धातूच्या वस्तू असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपी … Read more

माण तालुक्यात तृतीयपंथीयाचा खून, हातावर गोंदलेल्या नावावरून सहा तासात संशयितास अटक

Satara Crime News 20240915 082805 0000

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील तृतीयपंथीयाचा गळा आवळून खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात गुन्याचा छडा लावला. माण तालुक्यातील तृतीयपंथीयाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या सहा तासात उघडकीस आला आहे. म्हसवड पोलिसांनी मृताच्या हातावरील गोंदलेल्या नावावरून संशयिताला बेड्या ठोकल्या. राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे, असं खून झालेल्या … Read more

डॉल्बी, लेझर लाइट लावल्यास गणेश मंडळांवर होणार कारवाई

Wai News 20240902 090914 0000

सातारा प्रतिनिधी | वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांनी नियम पाळून उत्सव साजरा करावा. डॉल्बी आणि लेझर लाइटचा वापर करून आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढणार्‍या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिला. वाई पोलीस ठाण्याच्या आवारात नुकतीच गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक … Read more

भर पावसात ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तिघांवर गुन्हा दाखल

Satara News 20240805 082702 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयात पर्यटन स्थळावर घडत असलेल्या अपघाताच्या घटना विचारात घेता खबरदारी म्हणून पर्यटनाला बंदी असतानाही ठोसेघर, ता. सातारा येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अभिजित मानसिंग देशमुख (वय … Read more

माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी

Phalatan News 20240710 135033 0000

सातारा प्रतिनिधी | संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. फलटणमधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळा बरडच्या दिशेने सकाळी निघाली असता फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये वारीतील वाहने तात्काळ न सोडल्याने आळंदी संस्थान विश्वस्त व पोलिसांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार घडला. फलटण मधून सकाळी माऊलींची पालखी बरडच्या दिशेने मुक्कामासाठी जात असते. जाताना … Read more

निवडणूक बंदोबस्तावरील पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसला कराडनजीक भीषण अपघात, 12 किरकोळ तर 3 पोलीस गंभीर जखमी

Karad News 20240508 163213 0000

कराड प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपवून परत जाताना पोलिसांच्या खासगी ट्रॅव्हल्सला गुहागर-विजापूर महामार्गावर कराडनजीक भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याकडेच्या पडक्या घराला धडकली. या अपघातात बसमध्ये पुढे बसलेले तीन पोलीस गंभीर तर अन्य १२ पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना कराडमधील सहयाद्रि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्व … Read more

पोलिस सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्ह्यातील माया मोरे यांना पदक

Maya More

सातारा – पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुंबईतील पोलीस उपायुक्त (एसीपी) माया मोरे यांचा समावेश असून त्यांना प्रसंशनीय कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. माया मोरे या मोरेवाडी-कुठरे (ता. पाटण) येथील असून आरेवाडी (ता. कराड) हे त्यांचे माहेर आहे. पदक जाहीर झाल्यााबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा … Read more

Crime News : कराड येथे शिंदे डॉक्टरांच्या बंगल्यात 46 लाखांचा दरोडा; मध्यरात्री नक्की काय घडलं? CCTV पहा

Crime News

कराड प्रतिनिधी (Crime News) । मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्री घरफोडी आणि दरोडा अशा घटना घडत असल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काल रात्री कराड शहरातील डॉक्टर शिंदे यांच्या बंगल्यावर दरोडा पडल्याची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी तब्बल ४६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. आता या घटनेचे सीसीटिव्ह फुटेज समोर आले असून … Read more