देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; कार कालव्यात पलटी होऊन चारजण जागीच ठार, 7 गंभीर जखमी

Crime News 20241118 112759 0000

सातारा प्रतिनिधी | वाखरी- शिरढोण बायपास मार्गावर शिरढोणमध्ये कालव्यात भरधाव चारचाकी मोटार पलटी होऊन पवारवाडी (ता. फलटण) येथील चार जण जागीच ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. एकनाथ दत्तू निंबाळकर, शोभा धनाजी कान्हेरकर, विराज ऊर्फ रुद्र एकनाथ निंबाळकर व चालक सुदाम तानाजी नलवडे (सर्व रा. … Read more

शेतीपंपांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara News 20240913 152154 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण ग्रामीण भागामध्ये शेतीपंपांची चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून शेतीपंपांचे ६ गुन्हे उघडकीस आणून एकूण ४ लाख ४०रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे. ओंमकार संतोष मदने (रा. १७ फाटा, निमरे, ता. फलटण), विजय सुखदेव जाधव (रा. सुरवडी, ता. फलटण), ओंमकार शरद लोंढे (रा. … Read more

हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळली 4 लाखांची खंडणी, महिलेसह सात जणांना अटक

Crime News 20240903 075653 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून अपहरण करत ४ लाखांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेसह सात जणांना पोलिसांनी गजाआड केलं आहे. या टोळीने फलटण, लोणंद परिसरात आणखी गुन्हे केले असल्याचा पोलिसांना संशय आहे. हॉटेल व्यावसायिकाला केली मारहाण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा फलटणमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. गेल्या चार महिन्यांपासून … Read more

फलटणमध्ये डॉल्बीला बंदीच!; मंडळांना पोलिसांनी केलं महत्वाचं आवाहन

Phalatan News 20240902 153714 0000

सातारा प्रतिनिधी | येणाऱ्या गणेश उत्सव काळामध्ये डॉल्बी किंवा कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावण्यास शासनाच्या नियमानुसार बंदी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली. फलटण येथील नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सुनील महाडिक यांच्यासह महावितरण व नगरपरिषदेचे कर्मचारी व गणेश उत्सव मंडळाचे … Read more

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडून बहीण-भावाची हत्या : निंभोरे दुहेरी खुनाचा पोलिसांकडून छडा

20240525 213317 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेत फलटण पोलीसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत दुहेरी खुनाच्या गुन्ह्याचा 10 तासांच्या आत छडा लावत आरोपीस जेरबंद केले. सुमित तुकाराम शिंदे (वय २०) व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित … Read more

फलटण हादरलं : निंभोरेत सख्या बहीण-भावाचा खून, कारण अस्पष्ट

Crime News 1 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याला हादरवून सोडणारी अक घटना घडली आहे. तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून झाल्याची खळबळजनक घटना घडली असून सीताबाई शिंदे (वय ३२) व सुमित शिंदे (१५) असे खून झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून घटनेची माहिती … Read more

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार;18 चाकी कंटेनरची ट्रॅक्टर- ट्रॉली; कार,पिकअपला धडक

Crime News 20240427 145158 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोळकीकडून फलटण शहराकडे येणाऱ्या १८ चाकी कंटेनर चालकाने मद्यधुंद अवस्थेत कंटेनरने ट्रॅक्टर-ट्रॉली, कार, पिकअप गाड्यांना धडक देत फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याचे संरक्षण कठडे तोडले. कंटेनर अगदी पुतळ्याजवळ जाऊन थांबल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. फलटण शहरातील मध्यवर्ती क्रांतिसिंह नाना पाटील चौकात हा प्रकार घडल्याने दुपारी भर उन्हात अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. … Read more

आचारसंहिता लागू होताच पोलिसांनी काढला रूट मार्च

Phaltan News 20240318 101456 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच, पोलिसांनी शनिवारी (दि. 16) फलटण शहरात रूट मार्च काढण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरातील गजानन चौक, टोपी चौक, शंकर मार्केट, गणपती मंदिर, उमरेश्वर चौक, मलठण मशीद, पाचबत्ती चौक, आखरी रास्ता, टेंगूळ चौक, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब … Read more

गांजा विक्री प्रकरणी तिघांना अटक, पावणे सात लाखांचा गांजा जप्त

20240209 092806 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी पिंपरद (ता. फलटण) गावच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून ६ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा २५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील भांग्या पावरा (रा. रोहिणी, ता. शिरपूर, जि धुळे), उमेश भाईदास पावरा (रा. बोराडी, ता. शिरपूर, … Read more

विषारी औषध पाजून सासरच्यांकडून सुनेला जिवे मारण्याचा प्रयत्न

Crime News 26 jpg

सातारा प्रतिनिधी । लग्नामध्ये राहिलेले १० तोळे सोन्याचे दागिने दिले नाही, या कारणावरून फलटण तालुक्यातील मुंजवडी येथील विवाहितेला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पती, नणंद, सासू आणि सासऱ्याविरूद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लग्नामध्ये राहिलेले १० तोळे सोन्याचे दागिने दिले नाही तसेच … Read more

चुलत्याच्या खून प्रकरणी पुतण्यांना जन्मठेप, प्रत्येकी 3 लाखांचा दंड; भाऊ-भावजय निर्दोष

Crime News 20240124 211053 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे समाईक जमीन वाटून देत नसलेल्या कारणावरून चुलत्याचा खून केल्याप्रकरणी दोषी धरून मृताच्या दोन पुतण्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ३ लाख रुपये दंड सातारा न्यायालयाच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी ठोठावला. अनिकेत हणमंत सोनवलकर आणि शंभुराज हणमंत सोनवलकर, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. मयताचा … Read more

पोक्सो खटल्यातील आरोपीस 3 वर्ष सक्तमजुरीसह 1.5 हजार रुपये दंडाची शिक्षा

Crime News 20240123 111952 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरून विषेश जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के.व्ही. बोरा यांनी आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तानाजी दौलत भगत (वय ५८, रा. पिंप्रद ता. फलटण, जि. सातारा), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी तानाजी दौलत भगत याने … Read more