पिंपळोशी ग्रामपंचायतीवर पुन्हां एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा!; पालकमंत्री शंभूराज देसाईंना मोठा धक्का

Patan News jpg

पाटण प्रतिनिधी । पिंपळोशी ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाने पुन्हां एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. नाट्यमय राजकीय घडामोडींनतर पिंपळोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटणकर गटाच्या विशाल निकम यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व … Read more

पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना तात्काळ सुरू करा; पालकमंत्री देसाईंचे पाटणच्या मुख्याधिकाऱ्यांना निर्देश

Patan Shambhuraj Desai News jpg

कराड प्रतिनिधी । सध्याचा पाणीप्रश्न तात्काळ सोडविण्याकरिता नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेमधून पाटण नगरपंचायतीला 1 कोटी रुपये निधी मंजूर करणेत आलेला आहे. एका महिन्यात कामाची सुरवात करण्याचे व जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेला 60 लक्ष रुपयांचे जल शुद्धीकरण केंद्राचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटणच्या मुख्याधिकारी … Read more

कोयना धरण 89.49 टक्के भरले; 94.19 TMC जमा झाला पाणीसाठा

Patan Koyna News 20231006 095045 0000 1 jpg

पाटण प्रतिनिधी । गत आठवडाभरापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात तसेच कोयना धरणक्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचा पाणीसाठा 94.19 टीएमसीवर पोहोचला. तर धरण भरण्यासाठी आता 8 टीएमसीची पाण्याची गरज आहे. सातारा जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. दोन दिवसपासून … Read more

‘थांब, तुझा आता कार्यक्रमच करतो,’ असे म्हणत उपनगराध्यक्षासह दोघांकडून एकावर जीवघेणा हल्ला;

Patan Crime News 2 jpg

पाटण प्रतिनिधी । “थांब, तुझा आता कार्यक्रमच करतो,” असे म्हणत तिघांनी एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पाटण येथे आज गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाटण नगरपंचायतीचा उपनगराध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मारहाण प्रकरणातील तिघेजण फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 1) सागर दादासो पोतदार (वय ४०, रा. जुना स्टैंड, … Read more

लोकनेते देसाई कारखान्याचा कमी गाळप क्षमता असणार्‍या कारखान्यांच्या बरोबरीने दर; पालकमंत्र्यांचा दावा

Shambhuraj Desai News 20230923 173623 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | राज्यात 1250 मेट्रिक टन गाळप क्षमता असणार्‍या अनेक कारखान्यांच्या बरोबरीने दर देत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना राज्यात अग्रेसर ठरला असल्याचा दावा पालकमंत्री तथा कारखान्याचे मार्गदर्शक शंभूराज देसाई यांनी केला. तसेच राज्यातील सरकार हे साखर कारखानदारीच्या पाठीशी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. दौलतनगर (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याची 53 वी वार्षिक … Read more

सातारा जिल्ह्यातील 172 गावांत पूरप्रवण तर 124 गावांत दरड कोसळण्याचे ‘संकट’

Satara villages are prone to landslides

कराड प्रतिनिधी । राज्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून अनेक भागांना भेटी देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या सूचनेनंतर धोकादायक गावात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत ३६९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहेत. यानंतर आता प्रशासनाकडून जिल्ह्यातील संभाव्य पूरप्रवण १७२ आणि दरडप्रवण १२४ यादीच स्पष्ट केली … Read more

दरड प्रवन गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

satara collector Jitendra Dudi

सातारा प्रतिनिधी । दरड प्रवन गावातील नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांची पाहणी जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी केली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी सुनील गडे, तहसीलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी मिना साळुंखे यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित … Read more

Satara News : कोयना धरण परिसरात पावसाची जोरदार हजेरी; 7 TMC पाणी वाढले, अनेक रस्ते बंद

Koyana dam rain

सातारा प्रतिनिधी । सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडत असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा पावसाची कालपासून न थांबता पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने पुढील जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज दिवसातील 9 तासात 3. 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. पावसाने रौद्र रुप धारण केल्यामुळे वनविभागाने ओझर्डे धबधबा … Read more

सुसाट निघालेल्या दुचाकीवर बिबट्यानं घेतली झेप; पुढं घडलं असं काही…

Leopard Attacked

कराड प्रतिनिधी । बिबट्याकडून अनेकजणांवर हल्ले केल्याची घटना आपण अनेकदा ऐकली आणि पाहिलीही असेल. बिबट्या कधी चालताना पाठीमागून येऊन अचानक झडप घालतो तर कधी दबक्या पावलांनी जनावरांच्या गोठ्यात जाऊन शिकार करतो. अशा या बिबट्याने सुसाट निघालेल्या दुचाकीस्वारावर झडप घालून त्याला जखमी केल्याची घटना पाटण तालुक्यातील चोपदारवाडी ते सूर्यवंशीवाडी रस्त्यादरम्यान घडली आहे. या हल्ल्यात सोनईचीवाडी येथील … Read more

ठाकरेंकडून शिंदे गटात गेल्यावर काय काय मिळाले? मंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं

Shambhuraj Desai News (1)

कराड प्रतिनिधी । ठाकरे गटात असताना त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा असा जवळचा कुठलाच जिल्हा दिला नाही. मला जवळचा जिल्हा द्यायच्या ऐवजी त्यांनी सातारा जिल्ह्यातून उचलून ९०० कि मी लांब अशा सहा तालुक्याच्या वाशीम जिल्ह्यात नेऊन टाकलं. ३ आमदार व अर्धा खासदार असलेल्या वाशीम जिल्ह्याचं पाल्कमंत्रीपद मला दिलं. मात्र, मुख्यमंत्री … Read more

खवले मांजराच्या खवल्यांच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक;930 ग्रॅम खवले केले जप्त

20230629 114417 0000

कराड प्रतिनिधी | खवल्या मांजराच्या खवल्याच्या तस्करी प्रकरणी वन विभागाकडून दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 930 ग्रॅम खवले जप्त करण्यात आले असल्याची घटना लोटे, ता. रत्नागिरी व सातारा जिल्हा हद्दीत नुकतीच घडली. मिलिंद सावंत (रा. मालाड, ता. रत्नागिरी व मीना कोटिया (रा. लोटे ता. रत्नागिरी) असे यांना ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नाव … Read more

Satara News : भरधाव क्रुझर गाडी रस्त्याकडेच्या विहिरीत बुडाली; कराड चिपळूण रस्त्यावर मोठा अपघात

Satara News

कराड प्रतिनिधी । कराड – चिपळूण महामार्गावरील विहे (ता. पाटण) गावच्या हद्दीतील विहिरीत भरधाव क्रूझर गाडी कोसळून भीषण अपघात झाला आहे. संपूर्ण गाडी विहिरीत बुडाली असून सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रात्री ८ वाजेच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराडकडून मल्हारपेठकडे निघालेली भरधाव क्रूझर गाडी (MH-11 … Read more