पाटण मतदार संघातील कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरु करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 79

सातारा प्रतिनिधी । पाटण मतदार संघातील विविध विकास कामांना तसेच प्रकल्पांना शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. आचार संहितेच्या पूर्वी मंजूर कामांची निविदा तात्काळ काढून कामे लवकरात लवकर सुरु करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा पालकमंत्री देसाई यांनी आज घेतला. या आढावा बैठकीला … Read more

जनता दरबारात प्राप्त अर्जांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा व तात्काळ निपटारा करावा : पालकमंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj News 20240910 122648 0000

पाटण प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जागेवरच सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात प्राप्त अर्जांवर सकारात्मक निर्णय घेऊन अर्जदारांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाने करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. दौलतनगर तालुका पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. याप्रसंगी मुख्य … Read more

पोलिसांची हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई; पाटणमध्ये 11 गुन्हे दाखल

Patan News 2 2

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याचे उंचावरून पडणारे धबधबे, ओढे-नाले आणि धरणामुळे मनमोहक हिरवाई पाहण्याचा अनुभव पर्यटकांना मिळतो. त्यामुळे दर पावसाळ्यात हजारो पर्यटक पाटण तालुक्यात चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावतात. त्यातच हुल्लडबाज, मद्यपी, पर्यटकांची संख्या सार्वधिक असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याते धबधब्यावर सहलीसाठी येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी पाटण … Read more

पाटण तालुक्यात NDRF ची टीम दाखल; दरडग्रस्त, पूरग्रस्त गावांना दिली भेट

Patan News 9

पाटण प्रतिनिधी । मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन अर्लट झाले असून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन विभागास सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एनडीआरएफ टीम रविवारी दाखल झाली आहे. दरम्यान, या टीमने अतिवृष्टी, भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी … Read more

काळवीटाच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या चौघांना सापळा रचून पकडले, सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाचा तस्करीत सहभाग

Crime News 20240614 064901 0000

पाटण प्रतिनिधी | काळवीटाच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या चौघांना वन विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून काळवीटाची चार शिंगे आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पाटणमधील सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाकडून काळवीटाची शिंगे आणली असल्याची कबुली संशयितांनी दिल्यामुळे त्याचाही तस्करीत सहभाग असल्याचा संशय वन विभागाला आहे. कराड-पाटण मार्गावर सापळा रचून संशयितांना पकडले वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्याकडून … Read more

पाटणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री देसाईंचं मंत्रीपदाबाबत मोठं विधान; मुख्यमंत्री शिंदेकडे करणार ‘ही’ महत्वाची मागणी

Patan News 20240608 210409 0000

पाटण प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे प्रत्यक्षात शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. घटलेले मताधिक्य ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. यामुळे मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचे मोठे विधान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. … Read more

पुनर्वसन कामांबाबत पालकमंत्री देसाईंनी प्रशासनास दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Shambhuraj Desai News

सातारा प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी, (जिंती), काहीर, या अतिवृष्टीमुळे भूस्खलन बाधित गावांच्या पुनर्वसनास शासनाने मान्यता दिली आहे. या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाअंतर्गत बाधित कुटुंबाना द्यावयाची प्रस्तावित असलेली 558 घरकुले व इतर सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ही कामे गतीने आणि दर्जेदारपूर्ण करा, असे निर्देश … Read more

…तर सातारा जिल्ह्यात मोदी अन् पवारांची एकाच दिवशी झाली असती विराट सभा

Satara District Political News 20240424 185836 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आखाड्यात प्रचारासाठी दिग्गज नेत्यांनी आपले दंड थोपटले आहे. शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यात तीन सभा होत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात सभा आयोजित केल्या असून त्यांची सातारा जिल्ह्यातील कराड येथे सभा होत आहे. यात विशेष म्हणजे दि. 30 एप्रिल रोजी … Read more

पाटणच्या जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

satara news 2024 03 05T184558.565 jpg

सातारा प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवून हा जनता दरबार विविध विभाग प्रमुखांनी समन्वयातून यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण तालुक्यात होणाऱ्या जनता दरबार तयारी विषयी आढावा बैठक आज … Read more

BJP ने पाटणमध्ये केली ‘कमळ’ फुलवण्याची तयारी, विक्रमबाबांवर दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

Patan News 20240201 044830 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. काहींनी लोकसभेचे उमेदवार ठरवले असून त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात अगोदर अजित पवार गटाने जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी बारामतीच्या शिलेदराची निवड केली. त्यानंतर भाजपनेही फळतांसह जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडीला सुरुवात केली … Read more

पाटणला कुणबी नोंदीची शोधमोहीम झाली आता होणार वितरण

Patan News 20240123 100205 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सध्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरागे पाटील मोठ्या संख्येने मराठा बांधवासह मुंबईच्या दिशेने जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील समजायचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. संपूर्ण राज्यात 23 जानेवारी पासून सर्वेक्षण सुरू होत आहे. पाटण तालुक्यात देखील या सर्वेक्षणाची पूर्वतयारी करण्यात आलेली असून प्रगणक व पर्यवेक्षक यांचे … Read more

वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांच्या ‘या’ प्रश्नासाठी प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदार सांगली जिल्ह्यात…

Wang Marathwadi Project News jpg

पाटण प्रतिनिधी । वांग – मराठवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे सुमारे १२ ते १५ वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यात शिवाजीनगर तोंडोली, नेवरी तसेच विटा तालुक्यात कार्वे, माऊली, कलंबी आदी ठिकाणी पुनर्वसन झाले होते. त्या ठिकाणी सदर प्रकल्पग्रस्त कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या पाटण तालुक्यातील गावात त्यांची मतदार यादीत नावे तशीच आहेत. ती नावे कमी करण्यासाठी … Read more