पालच्या यात्रेत चोरटयांनी चार भाविकांचे दागिने केले लंपास

Pal Yatra News 1 jpg

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस काळ पार पडला. मात्र, यात्रेत चोरीच्या घटना देखील घडल्या. चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून हातोहात तब्बल ३ लाखांचे दागिने गायब करण्यात आले. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात अनोळखी पाचजणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

सदानंदाच्या यळकोटाने पालनगरी दुमदुमली, खंडोबा यात्रेला 6 लाखांवर भाविकांची उपस्थिती

Pal Yatra News 20240123 091155 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खंडोबाच्या नावानं चांगभलं… यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात पाल (ता. कराड) येथील मल्हारी म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली. खोबरे आणि भंडाऱ्यात पाल नगरी न्हाऊन निघाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस … Read more

पालमधील श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त ‘असे’ आहेत वाहतुकीत बदल

20240112 112623 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाल, ता. कराड येथे श्री खंडोबा देवाची यात्रा दि. २० ते दि.२८ जानेवारी २०२४ या कालावधीत भरणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून विविध ठिकाणाहून मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी खाजगी वाहनाने तसेच एस टी बसने येत असतात. यामुळे पाल गावात व उंब्रज शहरात मोठया प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत असते. या अनुषंगाने … Read more