कराड दक्षिण विधानसभेसाठी आज पृथ्वीराज चव्हाणांसह चौघांनी भरले अर्ज; 8 उमेदवारी अर्जांची विक्री

Karad News 12

कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास दि. २२ ऑक्टोबर रोजीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज २६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते तथा महा विकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह चार उमेदवारांनी ६ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. आज अखेर १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्र दाखल केलेली असल्याची … Read more

पाटणला शंभूराज देसाई, सत्यजित पाटणकर अन् हर्षद कदम भरणार उद्या उमेदवारी अर्ज

Patan News 2

पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान अर्ज भरण्याच्या सुरुवातीपासून दिग्गज मंडळींपैकी एकानेही आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. अर्ज भरण्यास दोन दिवस उरले असताना उद्या सोमवार दि. सोमवार, २८ रोजी महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटातून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsinh Patankar), महाविकांस आघाडीतून शिवसेना … Read more

फलटणला दीपक चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज; संजीवराजेंसह आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Phalatan News 20241026 083505 0000

सातारा प्रतिनिधी | हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून आमदार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, यांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी- बेडके, सह्याद्री कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास नाळे, नागराज जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते. … Read more

कराड दक्षिणसाठी चौथ्या दिवशी दोघांनी भरले उमेदवारी अर्ज; 5 नामनिर्देशन पत्रांची विक्री

Karad News 5 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होती. पण, गुरुवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. दरम्यान, आज शुक्रवारी चौथ्या दिवशी बहुजन समाज पक्षाकडून विद्याधर कृष्णा गायकवाड यांनी तर गणेश शिवाजी कापसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दीपक चव्हाण उमेदवारी अर्ज आज दाखल करणार

Dipak chavan News 20241025 080921 0000

सातारा प्रतिनिधी | महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातुन दीपक प्रल्हाद चव्हाण हे विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्यांदा आपला उमेदवारी अर्ज आज शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुरस्कृत राजे गटाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन … Read more

कराड दक्षिणेत ‘पृथ्वीराज’ अन् ‘अतुल’बाबांमध्ये होणार तगडी फाईट; डॉ. अतुल भोसलेंनी भरला उमेदवारी अर्ज

Karad News 20241024 133204 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, तो ढासळण्यासाठी महायुतीचे कराड दक्षिणचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी चांगलीच तयारी केली आहे. यावेळेस देखील विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. अतुल भोसले यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ. सुरेश भोसले, … Read more

विधानसभेसाठी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी 7 उमेदवारी अर्ज दाखल

Satara News 11

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ७अर्ज दाखल झाले. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी १, कोरेगावसाठी २ उमेदवारांचे ३, माणमधून १, कराड उत्तरमधून २ अशी एकूण ७ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास काल दि. 22 ऑक्टोबर … Read more

विधानसभेला पहिल्या दिवशी 6 अर्ज दाखल; फलटण, कोरेगावातून 2 तर कराड उत्तर अन् साताऱ्यातून एक अर्ज

Satara News 6 1

सातारा प्रतिनिधी । राज्यातील सर्व विधानसभा संघासाठी निवडणुकीसाठी काल मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली. काही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज खरेदी केले तर काहींनी प्रत्यक्ष भरले देखील. मात्र, यामध्ये चर्चेत राहिलेले इच्छुक उमेदवार अभिजित बिचुकले यांनी देखील काल आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासह पहिल्याच दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल झाले. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी दोन, कोरेगावसाठी दोन, … Read more

विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ; भाजप, वंचितने केले उमेदवार जाहीर

Satara News 20241021 210854 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेच्या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने मंगळवार (दि. 22) पासून सुरुवात होत आहे. गावोगावी प्रचाराचा धुरळा उडला आहे. आता मंगळवारपासून उमेदवांराना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. गुरुवारी (दि. 24) गुरुपुष्यामृत योग असून, अनेकांनी या मुहूर्तावर आपले अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनानेही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणारी गर्दी लक्षात घेऊन … Read more

सातारा मतदारसंघात 10 अपक्षांसह 16 उमेदवार निवडणूक रिंगणात

Satara News 20240423 065959 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातून पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 16 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तब्बल दहा अपक्षांचा समावेश आहे. या उमेदवारांना लागलीच निवडणूक चिन्हेही दिली गेली … Read more

सातारा लोकसभेच्या अर्ज छाननीमध्ये 21 वैध तर 3 नामनिर्देशनपत्र अवैध

Satara News 16 jpg

सातारा प्रतिनिधी । 45 सातारा लोकसभेसाठी एकूण 24 उमेदवारांनी 33 नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. आज झालेल्या छाननीमध्ये 21 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध तर 3 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. सातारा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी बहुजन समाज … Read more

सातारा लोकसभेसाठी शेवटच्या दिवशी 16 नामनिर्देशनपत्र दाखल; अर्जांची संख्या झाली 33

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । 45 सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस पार पडला. आज शेवटच्या दिवशी एकूण 16 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. तर आतापर्यंत एकूण जिल्ह्यातून 33 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी वैशाली शशिकांत शिंदे (रा. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव जि. सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, सिमा सुनिल पोतदार … Read more