शशिकांत शिंदे वयाने मोठे पण विचाराने बालिश; नरेंद्र पाटील यांची घणाघाती टीका

Narendra Patil News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । “लोकसभा निवडणुकीवर लक्ष द्यायचं की स्वतःच उघड व्हायचं, हे शशिकांत शिंदे यांनी एकदाचे ठरवावे, ते वयाने मोठे असले तरी विचाराने बालिश आहेत,” अशी घणाघाती टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्याच्या अनुषंगाने नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदेंवर काही दिवसांपूर्वी … Read more

4 हजार कोटींचा घोटाळा सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्ती घेईन; शशिकांत शिंदेंचे थेट आव्हान

Satara News 2024 04 16T162521.317 jpg

सातारा प्रतिनिधी । महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या 4 हजार कोटी रुपयांच्या घोटाळयाविषयी भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 2014 मध्ये शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडावर 466 गाळ्यांचे विनापरवाना बांधकाम आणि परस्पर विक्री करून 4 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात … Read more

नरेंद्र पाटलांच्या टीकेवर शशिकांत शिंदेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले की, उद्याच मी…

Satara News 2024 04 15T191233.385 jpg

सातारा प्रतिनिधी । महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेंनी (Shashikant Shinde) आज शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. “आज नरेंद्र पाटील यांनी माझ्यावर जी काही टीका केली. त्यांच्या टीका, आरोपांवर मी काही बोलणार … Read more

साताऱ्याच्या ‘तुतारी’च्या उमेदवाराकडून ‘मुतारी’चा घोटाळा; कराडात माथाडी नेते नरेंद्र पाटलांचा शिंदेंवर हल्लाबोल

Satara Political News 3 jpg

कराड प्रतिनिधी । महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेंनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, काल त्यांच्यावर कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला. महेश शिंदेच्या आरोपानंतर आता माथाडी नेते नरेंद्र पाटील … Read more

Udayanraje Bhosale : उदयनराजे शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत ठाण मांडून; इकडं नरेंद्र पाटलांनी भाजपकडं मागितलं तिकीट

Narendra Patil News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असलेले माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे सध्या दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. उदयनराजेंचा दिल्लीतील आजचा तिसरा दिवस असून आज त्यांची भेट अमित शाह यांच्याशी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, इकडे साताऱ्यात वेगळ्याच घडामोडी घडत आहेत. 2019 लोकसभेला शिवसेनेच्या … Read more

तुमची शेपटी कोणत्या प्राण्याची जाहीर करा : नरेंद्र पाटलांचा भुजबळांवर निशाणा

Narendra Patil News jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणाबाबत लढणारे मनोज जरांगे – पाटील यांच्याकडून राज्यभरात दौरे केले जात आहेत. तसेच ठिकठिकाणी सभा घेत आरक्षणाबाबत मागणी केली जात आहे. या दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यावेळी जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने त्यावर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छगन … Read more