कासकडे जाणाऱ्या मार्गावर भेगा पडल्याने 2 बस अडकल्‍या

Kas lake in Satara News

कराड प्रतिनिधी । सध्या महाबळेश्वर, पाटण तालुक्यात पाऊस कोसळत असल्यामुळे या ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत आहेत. तसेच तलावही भरल्याने त्या ठिकाणी पर्यटकांकडून गर्दी केली जात आहे. मात्र, पावसाळ्यात दरडी कोसळणे, भेगा पडणे आदी घटना घडत आहेत. अशीच घटना बुधवारी सकाळी घडली. साताऱ्याच्या कास पठाराकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेगा पडल्या आहेत. त्‍यामुळे या मार्गावरून … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर, कांदाटी खोऱ्यात रिमझिम पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून या क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालेला असून पूर्व भागात पावसाने चांगली उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत पडलेलय पावसामध्ये महाबळेश्वरने आज १ हजार मिलिमीटर पावसाचा … Read more

पाटणमधील नवजातील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा झाला प्रवाहित

Ozarde Waterfall News

कराड प्रतिनिधी । उशिरा का होईना पावसाळा सुरुवात झाली असल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अजून भरपूर पावसाची आवश्यकता आहे. पाऊस सुरु झाला की, काही दिवसात धबधबेही ओसंडून वाहू लागतात. अशाच एक पाटण तालुक्यातील कोयना भागातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत वाहू लागला आहे. पावसाळ्यात कोयनानगर परिसरातील वातावरण बघण्यासारखे असते. … Read more