पोलीस निरीक्षकांनी संभ्रम दूर केल्याने मराठा बांधवांचा जेलभरो स्थगित

Karad News 15 jpg

कराड प्रतिनिधी । मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर गुन्हा दाखल करून नोटीस काढण्यात आल्यामुळे गुरूवारी जमावाने पोलीस ठाण्यात जाऊन जेलभरो करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी मराठा बांधवांची सर्किट हाऊस मध्ये चर्चा करून कारवाईच्या संदर्भातील संभ्रम दूर केल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी जेल भरोचा निर्णय स्थगित केला. मराठा क्रांती मोर्चा … Read more

जरांगेंच्या सभेनंतर कराडमधील 14 जणांवर 2 दिवसांनी गुन्हा दाखल, नोटीस दिली एका महिन्यानंतर

Crime News 20231226 094246 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची १७ नोव्हेंबर रोजी कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मध्यरात्री सभा झाली. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांवर गुन्हा दाखल केला. परंतु त्याची नोटीस तब्बल एक महिन्याने पाठवली आहे. नोटीसीत अनेक अटी-शर्ती टाकल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. 14 जणांवर गुन्हा दाखल मनोज … Read more

कुणबी दाखल्याबाबत मराठा समन्वयकांनी घेतली पाटणच्या तहसीलदारांची भेट, केली महत्वाची मागणी

Patan News jpg

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नोंदी या पाटण तालुक्यात सापडल्या आहेत. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. अशा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी मराठा समाजाचे राज्य समन्वयक राजेंद्र निकम यांनी तहसीलदार रमेश पाटील यांच्याकडे केली आहे. पाटण तालुक्यातील सकल मराठा समाज समन्वयकांनी तहसीलदार रमेश पाटील यांची नुकतीच भेट घेतली. … Read more

जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव काढणार सातारा- मुंबई पायी मोर्चा

Satara News 21 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून दुसऱ्या टप्प्यातील साखळी उपोषण सुरू आहे. हे उपोषण मंगळवार, दि. २६ रोजी स्थगित करण्यात येणार आहे. यानंतर आरक्षणाची पुढील दिशा जानेवारी महिन्यात ठरणार असून मुंबई येथे सर्व मराठा बांधवांचे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केल्या जाणाऱ्या उपोषणस्थळी … Read more

खा. उदयनराजेंसह रणजित नाईक-निंबाळकरांकडून मोदींची भेट; केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

Satara News 5 1 jpg

सातारा प्रतिनिधी । आरक्षणाच्या प्रश्नावर नवी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर भाजपाचे राज्यसभा खा. उदयनराजे भोसले आणि माढाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच धनगर समाजाच्या मागणीनुसार त्यांचे आरक्षण बदलून देण्याची मागणी दोघांनी केली आहे. आरक्षणावर भोसले-निंबाळकरांची … Read more

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अधिवेशनात शिवेंद्रसिंहराजे झाले आक्रमक; म्हणाले की,

MLA Shivendrasinharaje Bhosale

सातारा प्रतिनिधी । आजपर्यंत मराठा समाजात अनेक मोठे नेते झाले. पण, समाज मोठा असल्याने त्याचा केवळ राजकीय कारणांसाठी वापर झाला. त्यामुळे हा समाज मागे पडायला लागला आहे. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे”, अशी आक्रमक भूमिका सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडली. नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन सध्या चर्चा सुरु … Read more

कुणबी दाखल्यांच्या अडचणी सुटणार; मराठ्यांचे राज्यातील पहिले जनसंपर्क कार्यालय कराडात सुरु

Karad Kunbi Certificate PRO Office News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीची मोहीम वेगाने सुरू आहे. महसूल दप्तरांची तपासणी करून कुणबी नोंदी तपासल्या जात आहेत. कुणबी नोंदींसंदर्भात लोकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर व्हावी आणि कुणबी दाखले काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती मिळावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी कराडमधील कराड अर्बन बॅंकेच्या तळभाग शाखेच्या खालील बाजूस जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. … Read more

कराड तालुक्यातील पहिल्या कुणबी दाखल्याचं प्रांत-तहसीलदारांच्या हस्ते वितरण

Karad News 20231204 233312 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरात कुणबीच्या नोंदी तपासणीला सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळी कराड तालुक्यातील पहिल्या कुणबी दाखल्याचं वितरण प्रांताधिकारी अतुल मेहेत्रे आणि तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते अमित जाधव (तासवडे) यांना करण्यात आलं. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. अमित जाधव यांना कुणबी दाखला वितरित … Read more

मराठा आरक्षणाबाबत ‘उपरा’कार लक्ष्मण मानेंचं मोठं विधान; म्हणाले की…

20231128 161514 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे. ओबीसी समाजाला ज्या सवलती मिळतात, त्या मराठा समाजालाही मिळाल्या पाहिजेत. हवे तर त्यांच्यात अ आणि ब असे गट बनवा. त्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा उठवून पन्नास टक्क्यांपुढे न्यावी. पंतप्रधानांनी यासंदर्भात संसदेत विधेयक मांडून मंजूर करून घेतले पाहिजे. जनतेचे सर्वोच्च सभागृह संसदेने पारित केलेला कायदा सर्वोच्च … Read more

सातारा जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Satara News 5 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाबाबत मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी काल सातारा जिल्ह्यात तीन ठिकाणी सभा घेतली. मात्र, जरांगे-पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेनंतर त्यांचा राज्यभरात ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. याचेच पडसाद काल सातारा जिल्ह्यातही जाणवले. सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुली येथे शनिवारी सायंकाळी मराठा समाजातील तरुणांनी एकत्र येत छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे … Read more

भुजबळांकडून केल्या जात असलेल्या विरोधामागे बोलवता धनी दुसराच कोणीतरी….; आ. भास्करराव जाधव

Bhaskarrao Jadhav News jpg

सातारा प्रतिनिधी | जालना येथे ओबीसी- भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मोठ्या जोशात मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आणि आव्हानात्मक भाषेत टीका हे सर्व लक्षात घेता त्यांना कोणीतरी जातीय दंगली घडविण्यासाठी उचकवत आहे काय? हे विचारण्याची वेळ आली आहे. भाजपचा एखादा वरिष्ठ नेता, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, ओबीसी नेते … Read more

तुमची शेपटी कोणत्या प्राण्याची जाहीर करा : नरेंद्र पाटलांचा भुजबळांवर निशाणा

Narendra Patil News jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणाबाबत लढणारे मनोज जरांगे – पाटील यांच्याकडून राज्यभरात दौरे केले जात आहेत. तसेच ठिकठिकाणी सभा घेत आरक्षणाबाबत मागणी केली जात आहे. या दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यावेळी जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने त्यावर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छगन … Read more