मराठा बांधवांनी रोखला विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग, अर्धातास वाहतूक ठप्प

KARAD NEWS 20240224 121459 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कराड तालुक्यात मराठा बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोकणचे प्रवेशद्वार असणारा विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग मराठा बांधवांनी आज सुमारे अर्धा तास रोखून धरला. यामुळे या महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना … Read more

मुख्यमंत्री शिंदेंना कराड तालुका मराठा बांधवांनी लिहलं पत्र; नेमकं कारण काय?

Karad News 28 jpg

कराड प्रतिनिधी । उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पाटण दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमनातरी शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर असून पाटणला येत असल्याने यावेळी त्यांनी पाच मिनिटे वेळ द्यावा, अशी विनंती करणारे पत्र कराड तालुका सकल मराठा बांधवांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला कुणबी आरक्षण … Read more

मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी ‘रासप’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 20240116 111429 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून मुख्यमंत्र्याकडे मागणी केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसी कोट्यातून देऊ नये, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस डॉ. रमाकांत साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात त्यांनी … Read more

मराठा क्रांती मोर्चाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे फलटणला आज उद्घाटन

Phalatan News 20240107 120537 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा क्रांती मोर्चाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन फलटण येथे आज दि. 7 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात दुपारी 4 वाजता शोभायात्रेने होणार आहे. उद्घाटनानंतर 5.30 वाजता शिवशाहीर संतोष साळुंखे (लातूर) यांचा पोवाडा होणार आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील मार्गदर्शन करणार आहेत. फलटण येथील रिंग रोडवरील डी. एड्. चौकात … Read more

जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव काढणार सातारा- मुंबई पायी मोर्चा

Satara News 21 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून दुसऱ्या टप्प्यातील साखळी उपोषण सुरू आहे. हे उपोषण मंगळवार, दि. २६ रोजी स्थगित करण्यात येणार आहे. यानंतर आरक्षणाची पुढील दिशा जानेवारी महिन्यात ठरणार असून मुंबई येथे सर्व मराठा बांधवांचे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केल्या जाणाऱ्या उपोषणस्थळी … Read more

फलटण मराठा क्रांती मोर्चाचे उद्यापासून तहसील कार्यालयाबाहेर साखळी उपोषण

Pahalatan News jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव एकवटले आहेत. दरम्यान, जरांगे- पाटील यांच्या पाठींब्यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीने उद्या बुधवार, दि. २५ ऑक्टोंबर पासूनफलटण तहसील कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करण्याचा निर्णय सकल मराठा समाज फलटण तालुका यांच्यावतीने घेण्यात आला आहे. फलटण येथील मराठा क्रांती मोर्चाच्या बांधवांच्या … Read more

कराड मराठा क्रांती मोर्चातील सहभागी 200 गावाचा चक्री उपोषणाबाबत मोठा निर्णय

Maratha Kranti Morcha Karad News 20230906 120557 0000 jpg

कराड प्रतिनिधी | ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजालाआरक्षण मिळावे या मागणीसाठी कराड तालुक्यातील 200गावांचे आज बुधवारपासून सुरू होणारे चक्री उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून आजपासून चक्री उपोषण जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील दुर्दैवी घटनेच्यापार्श्वभूमीवर कराड शहरात मागील दोन दिवसांपासून तणावपूर्ण … Read more

‘मराठा क्रांती’च्या आंदोलकांचा पोलिसांनी महामार्गवरच अडवला मोर्चा; पुढं घडलं असं काही…

Satara Maratha Kranti Morcha 20230905 133807 0000 1 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना येथे मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वाई येथून साताऱ्याकडे पायी निघालेला मराठा समाजाच्या बांधवांचा मोर्चा पाचवड,ता. वाई येथील महामार्गावर पोलिसांनी अडवला. यावेळी आंदोलक व पोलिसांच्यात शाब्दिक वादावादी झाली. मात्र, काही वेळेनंतर तणाव मावळला. जालना येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज वाई ते सातारा, असा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पायी मोर्चाचे आयोजन करण्यात … Read more

मराठा क्रांती मोर्चाच्या चक्काजाममध्ये फलटणकर बांधवांचं ठरलं ! मतदानाबाबत घेतला मोठा निर्णय

Phalatan News 20230904 205330 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अंतरवाली सराटी, ता. अंबड जि. जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज सातारा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आला. याला फलटण येथेही मोठा प्रतिसाद मिळाला. येथील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे तब्बल 2 तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी फलटणकरांनीही शंभर टक्के दुकाने बंद ठेवत … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा अवतरला ‘एक मराठा, लाख मराठा’; मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Maratha Kranti Morcha News 20230904 144823 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना येथील आंदोलन करत असलेल्या मराठा समाज बांधवांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली. मराठा क्रांतीच्या हाकेला संपूर्ण जिल्हा धावून गेला. जिल्ह्यात सातारा, कराड, पाटणसह फलटण येथील विविध व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत पाठींबा दिला. या आजच्या बंदमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक … Read more

सातारा जिल्हा उद्या बंद; मराठा क्रांती मोर्चाने केले ‘हे’ आवाहन

Satara News 20230903 215007 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली आहे. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर … Read more