जिल्ह्यात होणार आता दुसरे नवीन महाबळेश्वर; प्रारूप विकास योजनेला लवकरच होणार सुरुवात

Satara News 7

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा भीमा आणि कृष्णा नदींच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. हा जिल्हा विविध प्रकारच्या भूभागांनी बनलेला असून आल्हाददायक हवामान ,जंगले इ.चा परिणाम जिल्ह्याच्या भौतिक परिस्थितीवर बघावयास मिळतो. सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा ,शिखरे आणि उंच पठारांनी वेढलेला आहे. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणा शेजारीच … Read more

विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर कारवाई; प्रशासनाकडून बार सील

20240531 081319 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहे. अशातच आता अल्पवयीन मुलाच्या बापाला मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर येथील विशाल अग्रवाल याच्या MPG क्लब मधील अखेर गुरुवारी रात्री बार सील करण्यात आला. हा बार अनधिकृत असल्याचं समोर आल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा अग्रवाल कुटुंबीयांना मोठा … Read more

मोटारीतून करत होते चंदनाची तस्करी, महाबळेश्वर वन विभागाने सापळा रचून तस्करांना पकडले

20240530 210933 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर वनविभागाने तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर दोन चंदन तस्करांकडून चंदन जप्त केले. संशयितांच्या मोटारीची तपासणी करताना गाडीत चंदन आढळून आले. याप्रकरणी दोन चंदन तस्करांना वन विभागाने ताब्यात m घेतले आहे. अक्षय अर्जुन चव्हाण (वय २०, रा. फत्यापूर, ता. जि. सातारा) आणि आशिष विकास पवार (वय १६, रा. खतगुण, ता. खटाव), अशी त्यांची नावे … Read more

विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरातील ‘त्या’ बेकायदेशीर हॉटेल प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचे महत्वाचे आदेश; म्हणाले की,

Eknath Shinde News 20240530 121810 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी तीन दिवस मुक्कामी असून त्यांनी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी अग्रवाल यांच्या महाबळेश्वरमधील बेकायदेशीर हॉटेलबाबत प्रतिक्रिया दिली. अग्रवाल याचे बेकायदेशीर हॉटेल असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल … Read more

‘मिनी काश्मीर’मध्ये हुल्लडबाजांवर प्रशासनाचा राहणार ‘वॉच’; कारवाईसाठी विशेष पथकांची होणार नेमणूक

Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की पर्यटकांची पाऊले आपोआप धबधबे, निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कास, बामणोली, ठोसेघरसह महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. यामध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांचा देखील समावेश असतो. हुल्लडबाजांमुळे इतर पर्यटकांना मात्र, आनंद घेता येत नाही. याचा विचार करत जिल्हा प्रशासनाने आता पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या अतिउत्साही … Read more

विशाल अग्रवालचं महाबळेश्वर कनेक्शन; शासकीय भाड्याच्या जागेत उभारलं अनाधिकृत पंचतारांकित हाॅटेल

MPG Club News 1

सातारा प्रतिनिधी । पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने या दोघांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील विशाल अग्रवाल यांचं सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कनेक्शन असल्याची माहिती समोर आली असून विशाल अग्रवालने … Read more

चक्क उन्हाळ्यात ‘मिनी काश्मीर’ हरवलं धुक्यात, पर्यटक लुटताहेत थंडीचा आनंद

Mahabaleshwar News 20240526 215838 0000

सातारा प्रतिनिधी | संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट असून उन्हाचा पारा कमालीचा असताना महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अर्थात महाबळेश्वर मात्र धुक्यात हरवलंय. वातावरणातील बदलामुळे महाबळेश्वरात सकाळी आणि सायंकाळी धुक्याची दुलई पसरत आहे. अशा गुलाबी थंडीचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. वेण्णा लेकमधील नौका विहारासह विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने … Read more

महाबळेश्वरातील ग्रामीण रुग्णालयाच्या सोयी सुविधांसाठी निधी देण्यात येईल : राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais News 1

सातारा प्रतिनिधी । राज्यपाल रमेश बैस हे सध्या महाबळेश्वर दौऱ्यावर असून त्यांच्याकडून विविध गोष्टींचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान, त्यांनी नुकतीच महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देत तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी “आरोग्य सेवाही ईश्वर सेवा आहे. महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात गरजु व गरीब जनतेवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. या रुग्णालयाच्या सोयी सुविधा … Read more

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदतीसाठी सहकार्य करणार : राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais News

सातारा प्रतिनिधी । कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला आवश्यक असणाऱ्या मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्या प्रस्तावाची प्रत राज्यपाल कार्यालयास पाठविण्यात यावी. शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी दिली. महाबळेश्वर येथील राजभवनात राज्यपाल बैस यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कामकाज, अडीअडचणी याबाबत नुकताच आढावा घेतला. यावेळी राज्यपाल … Read more

जमीन घोटाळ्यात GST आयुक्त चंद्रकांत वळवीवर गुन्हा दाखल न झाल्यास झाडाणी ग्रामस्थ 10 जूनपासून उपोषणाला बसणार

Satara News

सातारा प्रतिनिधी | झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील वडिलोपार्जित जमिनी बळकवणाऱ्या अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी याच्यावर गुन्हा दाखल करून जमिनी परत कराव्यात, अन्यथा दि. १० जूनपासून माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्यासमवेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला आहे. झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खोपोली (जि.रायगड) येथे १९८० … Read more

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतला रेड क्रॉस सोसायटीच्या कार्याचा आढावा

Mahabaleshawar News

सातारा प्रतिनिधी । रेड क्रॉस सोसायटीच्या पाचगणी येथील रुग्णालयासाठी २८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रेड क्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांचे आभार मानले. महाबळेश्र्वर येथील राजभवन येथे आज रेड क्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींसोबत राज्यपाल बैस यांनी बैठक घेतली त्यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले. या बैठकीस राज्यपाल महोदयांच्या सहसचिव श्वेता सिंघल, … Read more

राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वरात आगमन

Ramesh Bais News 3

सातारा प्रतिनिधी । राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आज नुकतेच आगमन झाले. महाबळेश्वर येथे आगमन होताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्यावतीने राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपाल महोदय यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, सार्वजनिक … Read more