कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप; धरणात झाला ‘एवढा’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 7

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी अजून काही भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली असून धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण भरण्यासाठी अजून १८ … Read more

कोयना नदीत मच्छीमाराला सापडला 25 किलोचा ‘कटला’, खरेदीसाठी उडाली झुंबड

Karad News 19

कराड प्रतिनिधी । कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग पुर्णत: बंद करण्यात आला आहे. तसेच पावसाळ्यामुळे कोयना नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या फळ्याही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीतील पाणी पातळी कमालीची घटली आहे. अनेक महिन्यांनी मच्छिमारांना नदीत मासे सापडत आहेत. शनिवारी सकाळी तांबवे येथील एका मच्छिमाराला कोयना नदीच्या डोहात तब्बल २५ किलोचा कटला मासा सापडला. हा मासा … Read more

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग झाला सज्ज; कराड-पाटणला कृष्णा-कोयना नदीत नागरिकांना प्रशिक्षण

Satara News 6

सातारा प्रतिनिधी । हवामान खात्याने येत्या 10 किंवा 11 जून रोजी मुंबईत पाऊस सुरू होईल तर 15 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला आहे. यंदा 96 ते 106 टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे. पावसाळ्यात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. अशा काळात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कार्यवाही केली जाते. सध्या पावसाळा सुरू … Read more

पाटणचा आपत्ती व्यवस्थापन विभाग झाला सज्ज; स्थानिकांना दिले बोट चालवण्याचे प्रशिक्षण

Patan News 1

पाटण प्रतिनिधी । अतिवृष्टीच्या काळात पाटण तालुक्यात कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना, केरा नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली जाते. त्यामुळे पाटणमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरते. घरांना पाण्याचा वेढा पडल्याने अनेकजण घरातच अडकून पडतात. अनेकजण पुराच्या पाण्यात अशा परिस्थितीत लोकांना बाहेर काढताना प्रशासकीय यंत्रणेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पाटणमधील स्थानिकांना आपत्ती व्यवस्थापन … Read more

कोयना नदीत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला

Karad News 54 jpg

कराड प्रतिनिधी । कोयना नदीतील आगाशिवनगर हद्दीतील पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळ जाधव पानवठ्यावर पार्टीसाठी गेलेला एक इसम कोयना नदीपात्रात बुडल्याची घटना बुधवारी (दि. २८) ही घटना घडली होती. या बुडालेल्या इसमाच्या मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून केले जात होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास संबंधित इसमाचा मृतदेह पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळच नदीपात्रात तरंगताना आढळून आला. दादासाहेब आर्जून … Read more

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग; 66. 90 TMC पाणीसाठा

jpg 20230728 100949 0000

पाटण प्रतिनिधी | सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे धरणात गेल्या 24 तासात 2.6 टीएमसी इतका पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 66. 90 टीएमसी पाणीसाठा आहे. रात्री उशिरा 8.30 वाजता धरणाच्या पायथा विद्युत गृहातील 2 नंबरचे युनिट कार्यान्वित … Read more

कोयना नदी काठावरील ‘या’ गावच्या पाणवट्यावर मगरीचे दर्शन

Koyna River Crocodiles News

कराड प्रतिनिधी | कराड व पाटण तालुक्यातील कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढत होत आहे. दरम्यान, आज अचानक नदीकाठच्या गावात राहणाऱ्या काही ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाले आहे. निसरे ग्रामपंचायतीचा कर्मचारी शरद कोळी हा पाण्याच्या टाकीत टीसीएल टाकण्यासाठी गेला असताना त्याला नदीपात्राच्या कडेला मगर दिसल्याने त्याने याबाबत गावातील ग्रामस्थांना कलपणा दिली. नदीकाठच्या गावांमध्ये मगरीचे दर्शन होऊ लागल्यामुळे … Read more