जिल्ह्याला शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट; कोयना धरणाचे दरवाजे 9 फुटांवर स्थिर

Koyna Rain News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानेही शनिवारपर्यंत आॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे १२४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणसाठा ८६ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे ९ फुटांवर … Read more

मुसळधार पावसाचा इशारा; मूळगाव, निसरे फरशी, मेंढघर पूल पाण्याखाली

Patan Nisare News

पाटण प्रतिनिधी । गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू मुसळधार पावसाने पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. उरुल भागातील ठोमसे, बोडकेवाडी, मोरेवाडी, गणेवाडी, तांबेवाडी पाच गावांना जोडणाऱ्या दोन्ही पुलावर पाणी आल्यामुळे किमान ७ तास गावांचा संपर्क तुटला. उरुलच्या पश्चिमेकडील फणशी कारी ओढ्यावरील ठोमसे व लहान-मोठ्या वाड्यांकडे जाणाऱ्या दोन्ही पुलावर बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने … Read more

अतिवृष्टीमुळे कराड शहरासह ‘इतक्या’ गावात स्थलांतराची टांगती तलवार

Karad News 7

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटणला गेला आठवडाभरापासून मुसळधार पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे शेती, घरे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशीआलेली पिके नाहीशी होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोयना धरणातून पाणी सोडले जात असून धारण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ होत आहे. धरणातून … Read more

पावसाचा जोर पुन्हा वाढला; कोयना धरणात ‘एवढा’ TMC झाला पाणीसाठा

Koyna Rain News 20240726 215634 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाने कमी हजेरी लावली. मात्र, सायंकाळी पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळ कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणामध्ये ८२.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातुन कोयना नदीत उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता १० … Read more

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनास सज्ज राहण्याबाबत डॉ. अतुल भोसलेंच्या सूचना

karad News 6

कराड प्रतिनिधी । कराडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शहरात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. कराडमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. तसेच कोयना धरणातून विसर्ग सुरु असल्याने कराड परिसरात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार; कोयना धरणात 81.64 TMC पाणीसाठा

Patan News 3 1

पाटण प्रतिनिधी । गेल्या दोन आठवड्यापासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत त्यामुळे कोयना, केरा, काजळी, काफनासह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाटण तालुक्यातील अनेक पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दुपारी विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाणी साठ्यात येणाऱ्या … Read more

कृष्णेची पातळी 38 फुटांवर; कोयनेतून वाढीव विसर्गही स्थगित

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, आज हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सातार, कराडकरांना काहीच दिलासा मिळाला आहे. कोयना धरणातून १० हजार क्युसेकने वाढविण्यात येणारा विसर्गही स्थगित … Read more

कोयनानगरला सर्वाधिक 244 मिलीमीटर पाऊस; मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

Koyna Rain News 20240723 205805 0000

पाटण प्रतिनिधी | पश्चिम घाटक्षेत्रात आठवड्या भरापासून सुरु असलेल्या सलग पावसाने जलचित्रच पालटले आहे. आजवरच्या सरासरीपेक्षा हा पाऊस जवळपास १५ टक्क्यांनी ज्यादाचा राहताना, चिंताजनक जलसाठे तुलनेत समाधानकारक स्थितीत आहेत. पावसाने जनजीवन विस्कळले असून, रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. लोकांना नद्यांना पूर येण्याची धास्तीही लागून राहिली आहे. गेल्या २४ तासात कोयनानगरला सर्वाधिक २४४ मिलीमीटर पावसाची … Read more

मुख्यमंत्री शिंदेंनी कोयना जलाशयातून केला बोटीतून प्रवास; जावळीतील पर्यटनस्थळाच्या उभारणीबाबत केलं महत्वाचं विधान

Eknath shinde News jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कोयना जलाशयातून बोटीने प्रवास करत पाहणी केली. या पर्यटनस्थळामुळे जावली तालुक्यात स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यासह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. जावळी तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त … Read more