दुष्काळाचे सावट दूर झाले, कोयना धरण ‘इतके’ टक्के भरले

Koyna News 20240918 152452 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागासह सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे कोयना धरणात चांगला पाणीसाठा झाला असून धरणातील पाणीसाठा 104.60 टीएमसीवर गेला आहे. तर धरणात 99.48 टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून जूनपर्यंत चांगला पाऊस झाला. तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात … Read more

कोयनानगर भूकंपाने हादरला; रात्री बसला 2.5 रिश्टर स्केलचा धक्का

Koyna News 20240911 071629 0000

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला. रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का कोयना धरण परिसरात बसला. परिसराला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून 8.8 किलोमीटर हेळवाक गावाच्या 6 कि.मी अंतरावर होता. या भूकंपानंतर घरातील नागरिकांमध्ये क्षणार्धात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, … Read more

कोयना धरण भरलं ‘इतके’ टक्के; नवजातही पडला चांगला मिलिमीटर पाऊस

Koyna News 20240909 084930 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. रविवारी कराड तालुक्यातही पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे कोयना धरण 99.13 टक्के भरले असून धरणात 104.38 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सद्या कोयना धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 11 हजार 394 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात … Read more

पाटण तालुक्यात पावसाची उघडीप; कोयना धरणात ‘इतका’ झाला पाणीसाठा

Koyna News 20240908 123552 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर मंदावला असून, तालुक्याच्या पूर्व भागात आज दिवसभर पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे, तर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असल्याने शनिवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटावर खाली आणण्यात आले असून कोयना धरणात एकूण पाणीसाठा १०४.२८ टीएमसी झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून सध्या … Read more

कोयना धरणातून 50 हजार 442 क्युसेक्स विसर्ग

Koyna News 20240906 075144 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर कोयना धरण १०० टक्के भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाचे गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सहा वक्र दरवाजे ५ फूट ६ इंच फुटांपर्यंत उघडून धरणातून ५० हजार ४४२ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सद्या कोयना धरण पायथा … Read more

कोयना धरणाचे दरवाजे 4 फुटांनी उघडले, 40 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडलं

Koyna News 20240905 101227 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला. तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. सर्वच धरणे ८० टक्क्यांवर भरली. पूर्व भागात मागील वर्षभर दुष्काळ होता. सततच्या पावसामुळे तलाव आणि धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक … Read more

तीन महिन्यांत कोयना धरणातून ‘इतके’ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

Koyna News 20240903 183816 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाच्या तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत भलेही पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत पाऊस जादा पाण्याची आवकही झाली असली तरी चार जलविद्युत प्रकल्पातून 505.003 दशलक्ष युनिट इतकीच आतापर्यंत वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीवापर कमी झाल्याने तब्बल 159.231 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाल्याची तांत्रिक आकडेवारी आहे. जलवर्षात आत्तापर्यंत तीन महिन्यात कोयना जलविद्युत प्रकल्पात … Read more

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले कोयना धरणावर जलपूजन

Koyna News 20240831 185812 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणात १०० टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज जलपूजन आणि ओटी भरण करण्यात आले. कोयना धरण स्थळी झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, तहसीलदार अनंत गुरव,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता … Read more

कोयना धरणातील पाणीसाठ्याची ‘शंभरी!’; आवक वाढल्यानं धरणाचे दरवाजे सव्वा फुटाने उघडले

Patan News 20240829 083919 0000

पाटण प्रतिनिधी | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं दमदार पुनरागमन केलंय. कोयना धरणातील पाणीसाठा १०० टीएमसी झाला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नुकतेच धरणाचे सहा दरवाजे सव्वा फुटाने उघडण्यात आले आहेत. कोयना धरण पाणलोट पावसानं दमदार कमबॅक केलं आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा १०० टीएमसी झाला आहे. दरम्यान, पाण्याची आवक वाढत असल्यानं धरणाचे सहा वक्र दरवाजे … Read more

कोयनेसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा

Patan News 12

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुन्हा पाऊस सुरू झाला असून सोमवार आणि मंगळवारी पाटण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. आज मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या तालुक्यातील मल्हारपेठ, निसरे भागात पावसाने चांगली हजेरी लावली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याचीही आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 90.89 टीएमसीवर गेला आहे. सातारा … Read more

कोयना धरणातून आज सायंकाळी पाणी सोडणार, नेमकं कारण काय?

Patan Koyna Dam News

कराड प्रतिनिधी | जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडला तर उर्वरित जिल्ह्यात पावसाने पुर्णतः विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारली. त्यामुळे धरणातील आवक पूर्णपणे थांबली. धरणात सध्या ९०.६७ टीएमसी पाणीसाठा आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त लेझरच्या माध्यमातून धरणाच्या भिंतीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. त्यासाठी आज सायंकाळी ७ वा कोयना धरणाचे वक्र दरवाजे … Read more

कोयना धरण भरलं ‘इतके’ टक्के; स्वातंत्र्यदिनानिमित्त धरणावर लेझर शोतून साकारला तिरंगा

Koyna Dam News 10

पाटण प्रतिनिधी । पाटण आणि कराड तालुक्यात पावसाने उघडीप दिली असून कोयना पाणलोट क्षेत्रात आज बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 90.67 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, उद्या स्वातंत्र्यदिन असल्याने यानिमित्त ओयना धरणावर आकर्षक लेझर शोमधून तिरंगा साकारण्यात आलेला आहे. सध्या छोट्या नद्या, ओढे, नाल्यांमधून प्रतिसेकंद सरासरी फक्त 1 हजार 234 क्युसेक्स पाण्याची आवक कोयना धरणात … Read more