कोरेगाव हद्दीत एसटी बसच्या धडकेत चिमुरडा ठार; बसचालकावर गुन्हा

Crime News 7

सातारा प्रतिनिधी । सातारा – पुसेगाव मार्गावर कोरेगाव तालुक्यातील गोळेवाडी गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर भरधाव एस.टी.ने चार वर्षांच्या चिमुरड्याला पाठीमागून धडक दिली. यात हा चिमुरडा ठार झाला. श्रवण प्रसाद गोळे (वय ४, रा. सद्‌गुरूनगर, कोरेगाव) असे त्याचे नाव आहे. अपघाताची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. रविवारी रात्री पुसेगाव-सातारा ही बस (क्रमांक एम. एच. २० … Read more

मद्यधुंद कार चालकाने कोरेगावच्या कोलवडीत तिघांना उडवले; अपघातात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

Crime News 17

सातारा प्रतिनिधी । भरधाव वेगात मद्यधुंद कारचालकाने 12 वर्षीय मुलीला उडवले. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला तर कारचालकाने पुढे जाऊन दुचाकीवरील दोघांना उडवले. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड पळशी दरम्यान कोलवडी गावात खंडाळा शिरूर राज्यमार्गावर सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलीस … Read more

सत्ताधाऱ्यांचा राज्य लुटण्याचा नवा डाव; खेडच्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांची टीका

Satara News 2024 10 06T120754.393

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे कोरेगावात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेनंतर खेड येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. “राज्य वाचवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना बाहेर घालवण्याची सुरुवात कोरेगावातून करावी लागेल. सध्या राज्य लुटण्याचा पण सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मागतील … Read more

बोरगावचे सुपुत्र शहीद जवान तुषार घाडगे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Satara News 72

सातारा प्रतिनिधी । कोरेगांव तालुक्यातील बोरगांव गावचे सुपुत्र व भारतीय सैन्यदलातील जवान तुषार राजेंद्र घाडगे यांना अरुणाचल प्रदेश येथे देशसेवा बजावत मंगळवारी वीरमरण आले. त्यानंतर वीर जवान तुषार घाडगे यांच्यावर बोरगाव येथील जन्मगावी आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथे तुषार घाडगे यांचा जन्म झाला. प्राथमिक … Read more

कोरेगाव मतदारसंघातील निवडणूक ही लोकशाही विरोधात हुकुमशाही अशीच होईल; शशिकांत शिंदेंचा इशारा

Shshikant Shinde News 20240802 083549 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया सुरू असून विरोधकांकडून नावे रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीचा हा सरळ-सरळ खूनच आहे. यामध्ये अधिकारीही दबावाखाली काम करतात. त्यामुळे प्रांत कार्यालयात जाऊन जाब विचारणार आहे. त्याचबरोबर कोरेगाव मतदारसंघातील निवडणूक ही लोकशाही विरोधात हुकुमशाही अशीच होईल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे … Read more

कोरेगाव तालुक्यातील ‘या’ 2 गावातील ग्रामस्थ झाले आक्रमक; थेट रेल्वे मार्गावर येत केलं ठिय्या आंदोलन

Koregaon News

सातारा प्रतिनिधी । सध्या रेल्वेच्या दुहेरीकरणावेळी करण्यात येणारी रेल्वे लाईनची काठी ठिकाणची कामे शेतकऱ्यांना त्रास देणारी ठरत आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडून आंदोलने देखील केली जात आहेत. अशीच घटना आज कोरेगाव तालुक्यातील बिचुकले आणि देऊर गाव परिसरात घडली. या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग अंडरपास करूनही भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला असून या ठिकाणी रस्ता … Read more

मोलकरणीचे काम मिळवून चोरी करणाऱ्या कोरेगावमधील महिलेस येरवडा पोलिसांकडून अटक

Crime News 20240612 080450 0000

सातारा प्रतिनिधी | घरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणाऱ्या एका महिलेला येरवडा तपास पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेली महिला ही कोरेगाव तालुक्यातील आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दि.२८/०५/२०२४ रोजी घरातील मोलकरीण हि फिर्यादी यांचे कपाटातून १३ लाख ३६ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करुन … Read more

घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करुन 53 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे हस्तगत

Crime News 4

सातारा प्रतिनिधी । घरफोडी करून दागिन्यांची चोरी केलेल्या इसमांस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केले. तसेच इसमांकडून ५३ हजार रुपये किमतीची एक सोन्याची चेन, चादीची चेन, पायातील चांदीचे पैंजण असे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये १) अशोक शिंदे (वय १९, रा. डवर वस्ती, कोरेगाव), दुसरा विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत. … Read more

जिल्ह्याला पावसाने झोडपले; दुष्काळी भागात ओढ्यांना पाणी; पिके भुईसपाट तर घरावरील पत्र्यांची भिंगरी

Satara News 20240609 072409 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून शनिवारी साताऱ्यासह पश्चिम भागात अनेक ठिकाणी धुवाॅंधार पाऊस कोसळला. तर पूर्व दुष्काळी भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यात कोरेगाव, कराड तालुक्यात देखील पिकांचे व दुकानांचे नुकसान झाले. कोरेगाव तर दुकानावरील पत्रे भिंग्रीसारखे उडून गेले. तर वादळी … Read more

लोणंद- सातारा रेल्वे मार्गावरील ‘हे’ रेल्वे फाटक सोमवारपासून 3 दिवस राहणार बंद; नेमकं कारण काय?

Railway Department News

सातारा प्रतिनिधी । सातारा महामार्गावरील कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे सोमवारपासून (दि. ३) पासून तीन दिवसांसाठी बंद करण्यात येत आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबत वाठार स्टेशन येथील रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोणंद- सातारा रेल्वे मार्गावरील देऊर रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे रेल्वे रुळाच्या दुहेरीकरण व दुरुस्तीसाठी तसेच निरीक्षणासाठी … Read more

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का? जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची ACB विभागाकडून चौकशी सुरू

Ajit Pawar News

सातारा प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अडचणीत आणणारी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा राज्य सरकारकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत विभागाकडून या कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर चौकशी सुरु जरंडेश्वर साखर … Read more

चार मोरांची शिकार करणारा वन विभागाच्या ताब्यात

Satara News 20240524 090546 0000

सातारा प्रतिनिधी | चार मोरांची शिकार करून वाहतूक करणाऱ्यास कर्मा वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे घडली आहे. संबंधित शिकाऱ्याकडून मोर मारण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. कर्मा परशा काळे (रा. बोरगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगावचे वनक्षेत्रपाल वैभव घार्गे … Read more