कोरेगावात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

Koregaon News 1

सातारा प्रतिनिधी । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे घडला. या प्रकाराच्या निषेधार्थ आज कोरेगावात महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पटोलेंच्या प्रतिमेस जोडे मारले. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निषेधार्थ राज्यभर महायुतीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या … Read more

पाण्याच्या टँकरबाबत आ. दीपक चव्हाण यांच्या महत्वाच्या सूचना; म्हणाले की,

Water Tanker News 1

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच तालुक्याच्या उत्तर भागातील पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार दीपक चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत पिण्याच्या पाण्याच्या टँकरबाबत अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील २६ गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला असला तरी प्रशासनाने ज्या-ज्या गावात पाण्याचे … Read more

एकंबे परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाणार!

Water News 20240520 084117 0000

सातारा प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतीनिष्ठ गाव म्हणून एकंबे गावची ओळख आहे. या नावलौकिक असलेल्या एकंबे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभाग निश्चितपणे प्रयत्न करेल. त्यातून परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल, असा विश्वास सीएसआर विभाग प्रमुख डॉ. लीना देशपांडे यांनी व्यक्त केला. भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागामार्फत एकंबे येथे डोंगर पायथ्याला … Read more

कोरेगाव ST आगारातील वर्कशॉप कर्मचाऱ्यांनी घेतली मतदानाची शपथ

Koregaon News 20240422 082102 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सर्वसामान्य समाजाशी थेट जोडलेल्या एसटी कोरेगाव आगारामध्ये आज मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी कोरेगाव आगारातील वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाची शपथ घेतली आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्धार केला. यावेळी वर्कशॉप विभागाचे प्रमुख शुभम ढाणे ,वर्कशॉप मधील कर्मचारी तसेच जनजागृती पथकाचे प्रमुख यशेंद्र क्षीरसागर, पथकाचे सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते. यावेळी या … Read more

सातारा कधी वाकत नाही अन् तुतारीशिवाय इथं काही वाजणारच नाही’ : खासदार श्रीनिवास पाटील

Srinivas Patil News 20240403 171746 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हयातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वातावरणात महायुती आणि महाविकास आघाडीकरून पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे घेतले जात आहेत. अशात नुकताच कोरेगाव तालुक्यात वडाचीवाडी येथे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यात खासदार श्रीनिवास पाटील यांनी चांगलेच दमदार भाषण केले. “सातारा कधी वाकत नाही. त्यामुळे येथे तुतारीशिवाय काही … Read more

कोरेगावात उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना पकडले

Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । ठेकेदाराकडून कामांची मंजुरी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना, कोरेगाव उपविभाग कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता मदन रामदास कडाळे (वय 46 रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. सध्या रा. तामजाईनगर सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात … Read more

फ्रान्सच्या अभ्यासिकेने दिली जिल्ह्यातील दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या गावाला भेट

Satara News 74 jpg

सातारा प्रतिनिधी । एकीकडे जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील काही गावात व वाड्या वस्त्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. तर दुसरीकडे दुष्काळाशी पाणी टंचाईशी दोन हात करत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून पाण्याचे संचयन करणारी गावे देखील आहेत. या गावांना सध्या परदेशातीलअभ्यासकांनी नुकतीच भेट दिली आहे. फ्रान्स येथून … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी रस्त्यावर उतरणाऱ्या आ. शिंदेंना मराठा संघर्ष समितीच्या समन्वयकांनी भरवला पेढा

Satara News 2024 01 31T153155.651 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य पिंजून काढत सरकारला आरक्षण प्रश्नि निर्णय घेण्यास भाग पाडले. जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विविध स्तरावर प्रामाणिक प्रयत्न केले. विधानसभेत, विधानभवनात प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, मनोज जरांगे … Read more

आदित्य ठाकरे हे शोले चित्रपटातील ‘असरानी’; शिंदे गटाच्या आमदाराची टीका

Mahesh Shinde News 20240110 184102 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिवेनेचे युवानेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सातारा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, त्यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. शोले मधील आसरानी सुद्धा सगळीकडे फिरायचा आणि म्हणायचा आधे इधर आधे उधर बाकी मेरे पीछे आओ त्यामुळे ते पीछे कोण आहे का बघायला फिरत असतील, अशी … Read more

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्ह्यात आजपासून अनोखं अभियान सुरू

Satara News 20240101 135545 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने जिल्ह्यात आजपासून दि. 1 जानेवारी पासून जनसंपर्क अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानात शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल, अशी माहिती माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात बर्गे यांनी म्हटले आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा … Read more

हिवरेतील शाळकरी मुलाला सख्या बापानेच संपवलं

Crime News 12 jpg

सातारा प्रतिनिधी । स्वतःला दुर्धर आजार झाल्याच्या संशयाच्या भीतीनंतर आपल्या पश्चात मुलालाही दुर्धर आजार होईल, मग त्याचा सांभाळ कोण करणार?, त्याचे हाल होतील, या विचारातून पोटच्या पोराचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून स्वतः बापानेच खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत बापानेच मंगळवारी दुपारी पोलिसांत कबुली दिली. हिवरेतील खून प्रकरणाचा छडा अवघ्या दोन दिवसांत लावण्यात स्थानिक गुन्हे … Read more

कुटुंब साखर झोपेत असताना चोरटयांनी मारला 13 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Vathar Station Police Station News jpg

सातारा प्रतिनिधी । कुटुंब साखर झोपेत असताना चोरटयांनी गुपचूप घरात प्रवेश करून तब्बल १३ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे घरातील महिलेसमोर हा प्रकार घडला. नांदवळ, ता. कोरेगाव येथील एक घरातघडलेल्या चोरीच्या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदवळ येथील अमोल पवार, त्यांची पत्नी प्रियंका आणि वडील … Read more