जिल्ह्यात जगातील सर्वात उंच उडणारा ‘पटेरी हंस’ दाखल, ‘या’ तलावात मिळतायत पहायला

Khatav News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील अनेक तलावांमध्ये दरवर्षी हजारो पक्षी येतात. यामध्ये खासकरून हिमालय पर्वत ओलांडून स्थलांतरित करणाऱ्या पक्षांपैकी ‘पट्टेरी हंस’ या पक्ष्याची संख्या जास्त पहायला मिळते. यंदाच्या वर्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून खटाव तालुक्यातील मायणी समूह पक्षी संवर्धन असलेल्या येरळवाडी येथील तलावामध्ये दाखल झाला आहे. हा ‘पट्टेरी हंस’ जगातील सर्वात जास्त उंच उडणाऱ्या … Read more

ZP शाळेचा विद्यार्थी अमेय फडतरेची ‘इस्रो’च्या सहलीसाठी निवड

Satara News 26 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यमातून अनेक गोष्टींची मिळावी, हा मुख्य उद्देश सहलीमागचा असतो. येत्या १४ फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंगळूर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO) अभ्यास सहलीसाठी जिल्हा परिषद … Read more

जिल्ह्यातील येरळवाडी धरणात परदेशी पाहुण्यांचे आगमन; लेसर फ्लेमिंगो, स्टार्क पक्ष्यांच्या रांगा

Satara News 2024 01 31T185735.832 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्या ठिकाणी परदेशी पक्षी त्यांच्या हंगामात येतात. असेच एक ठिकाण म्हणजे खटाव तालुक्यातील येरळवाडी धरण होय. या ठिकाणी वीस टक्केच मृत पाणीसाठा उरला असताना ऐन गुलाबी थंडीत धरणात लेसर फ्लेमिंगो आणि स्टार्क पक्षी या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. या हालचालीमुळे मोठे फ्लेमिंगो (ग्रेटर) पक्ष्यांचे कमी पाण्यात … Read more

जिल्ह्यात पाण्याअभावी गावागावात दुष्काळी परिस्थिती, टँकरने केला जातोय पाणीपुरवठा

Satara News 98 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने ८१ गावे २९१ वाड्यांना ८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३५ गावे २४१ वाड्यांना ४२ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या … Read more

पुसेगावात 4 वर्षांनंतर खिल्लार जनावरांचा बाजार

Pusegaon News 20240111 132348 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेदरम्यान भरणारा बैल बाजार लम्पी आणि इतर आजारांच्या सावटामुळे चार वर्षे भरला नव्हता. राज्यातील शेतकरी आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लोकांसाठी पर्वणी ठरणार आहे. पुसेगावच्या बैल बाजाराला ७५ वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी येणारे बैल हे उत्कृष्ट दर्जाचे असतात, अशी ख्याती आहे. बाजारात जातिवंत पशुधनाची संख्या उल्लेखनीय असते. त्यामुळे महाराष्ट्रासह … Read more

‘रयत क्रांति’च्या आंदोलनाची दखल; बोंबाळवाडी तलावात पाणी

20240111 122143 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील बोबाळवाडी तलावामध्ये पाणी शिल्लक नसल्याने शामगाव परिसरातील शेतकऱ्यांची पिके वाळत चालली होती. चार दिवसांपूर्वी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली शामगाव मधील शेतकऱ्यांनी टेंभू उपसा प्रकल्प अभियंता राजन रेड्डीयार व अभियंता दादा नरवडे यांना निवेदन देत पाणी सोडण्याचा इशारा दिला. त्यानंतर टेंभू प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी तलावामध्ये … Read more

वडूजला आज पाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन

Vaduj News 20240111 115205 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वडुज येथील नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे आज दि. ११ रोजी सायंकाळी 5 वाजता येथील बाजार पटांगणात भूमिपूजन समारंभ होणार आहे. आज होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाजप आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून केंद्र शासन पुरस्कृत अमृत २० या योजने अंतर्गत शहराला ४६ कोटी ६७ लाख रूपये खर्चाची पाणी … Read more

रहाटणीत शेतकऱ्याने 40 गुंठ्यात घेतले 129 टन उसाचे उत्पन्न

20240108 180020 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील रहाटणी येथील प्रगतीशील शेतकरी व पोलीस पाटील देवीदास थोरात यांनी ४० गुंठ्यामध्ये १२९ टन एवढे आडसाली लागणी ऊसाचे विक्रमी उत्पन्न काढले आहे. या गावातील सर्वांत जास्त उत्पन्न या शेतकऱ्याने काढले आहे. या परिसरातील गावाना उरमोडी पोटपाटाच्या पाण्याचे वरदान लाभले आहे. यामुळे या परिसरात पाण्याची कमतरता पडत नाही. तरीसुद्धा आधुनिक पद्धतीने … Read more

हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुसेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ

Satara News 20240107 131929 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या 76 व्या पुण्यस्मरणानिमित्त वार्षिक यात्रेस शनिवारी पालखी व मानाचा झेंड्याच्या भव्य मिरवणुकीने भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली. शनिवार, दि 6 ते मंगळवार, दि. 16 या कालावधीत शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात आणि सातारा-पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरण्यास सुरूवात झाली आहे. पुसेगाव यात्रेस दरवर्षी महाराष्ट्र, … Read more

वाळू चोरीप्रकरणी पोलिसांनी केली दोघांना अटक; 8 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 20240104 105105 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जयरामस्वामी वडगाव येथे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांवर औंध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालक व मालक यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील डंपर व वाळू असा सुमारे 8 लाख 20 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

कोटपा कायद्यांतर्गत वडूजमधील 14 टपऱ्यांवर कारवाई

Crime News 17 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा रुग्णालयांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्यावतीने (एनटीपीसी) ‘कोटपा’ कायद्यानुसार कारवी केली जात आहे. या कारवाई अंतर्गत नुकतीच वडूज येथील १४ टपऱ्यांवर धडक मोहीम राबवित ७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई व व्यापार वाणिज्य उत्पादन आणि नियमन) कायदा २००३ अर्थात … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा आढळला पहिला रुग्ण

Satara News 13 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या आरोग्य विभागाकडून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. ताप थंडीसह खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून अशा रुग्णावर उपचार देखील केले जात आहेत. अशात कोरोनाचे रुग्ण देखील इतर जिल्ह्यात आढळत असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे … Read more