पावसाच्या उघडीपीमुळे खरिपाच्या आंतरमशागतीची कामे सुरू; कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा

Koyna News 5 1

कराड प्रतिनिधी । गेली महिनाभर सातत्याने पडत असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खरिपाच्या व इतर पिकांच्या शेतीतील आंतरमशागतीच्या कामासाठी शेतकरी बाहेर पडला आहे. पाटण आणि कराड तालुक्यातील शेतशिवारे शेतकऱ्यांनी फुलली आहेत. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली असून धरणात 90.14 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. जूनमधील पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरूवात … Read more

कास परिसरातील डोंगरमाथ्यावर वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस; शेतकरी हतबल

Agriculture News 1

सातारा प्रतिनिधी । वादळी वारा, मुसळधार पावसाची पर्वा न करता शहराच्या पश्चिमेकडील कास परिसरातील शेतकऱ्यांकडून भातशेती केली जाते. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील भागातील जंगली प्राण्यांकडून भातशेतीचे व नाचणीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी हतबल झाले असून त्यांनी नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घातले आहे. साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या कास परिसरातील … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कृषी विभागाकडून अन्नधान्य, कडधान्यसह 11 पिकासाठी पीक स्पर्धचे आयोजन

Agriculture News

सातारा प्रतिनिधी । कृषि विभागामार्फत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप हंगाम सन २०२४-२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ख. ज्वारी, बाजरी, मका नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकासाठी पीक स्पर्धा घेण्यात येणार आहे. पीक स्पर्धेतील पिके – खरीप पिके भात, ख. ज्वारी, … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतके’ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडून, ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट

Satara News 91 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही दुष्काळाचा फटका बसलेला आहे. कारण म्हणजे गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्याचा परिणाम आता रब्बी पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात फक्त 81 टक्के पेरणी झालेली असून सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. विशेष म्हणजे ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे. सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यास दोन … Read more

सातारा जिल्ह्यात रब्बीची ‘इतक्या’ टक्के झाली पेरणी

Rabi Season Agriculture News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकऱ्यांना जास्त उत्पादन घेता आले नाही. या पर्जन्यमानाच्या कमतरतेचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ६० टक्के म्हणजे सव्वा लाख हेक्टर इतक्या क्षेत्रात पेरणी झालेली असून गतवर्षी नोव्हेंबरअखेर ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन … Read more

साताऱ्यासह कराड, पाटणला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकरी हवालदिल

Karad Rain News jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु असताना आज पहाटे साताऱ्यासह कराड, पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामामधील सुरू असलेल्या पीक काढणीच्या कामात व्यत्य आला असून ऊस तोडीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर शेतकऱ्यांच्या पिकांनाही या … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतकी’ टक्के झाली खरिपाची पेरणी

Agriculture News 1

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच २७ जुलैपर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. पावसाळा सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून खरिपाची पेरणी देखील करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात खरिपाचे लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख 86 हजार 973 हेक्टर आहे. यापैकी 2 … Read more