छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या; नातेवाईकांनी मृतदेह घेऊन गाठले पोलीस ठाणे अन् घडलं असं काही…

Shirwal News jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील एका 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने युवकाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून घरामधील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला. या घटनेनंतर खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली. विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाईट नोटमध्ये युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर नातेवाईकांनी व सांगवी ग्रामस्थांनी विद्यार्थिनीचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन थेट शिरवळ पोलीस ठाणे गाठले. व संबंधित … Read more

खंडाळ्यातील रास्तारोको प्रकरणी 200 आंदोलकांवर गुन्हा

Crime News 20231204 101806 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे सातारा जिल्हयातील खंडाळा येथे दि. 1 रोजी मोर्चा काढून पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी आता 200 हून अधिक आंदोलकांवर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलिसांनी दिलेले आदेश न मानता आणि जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करून … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात पुन्हा खोळंबली 4 तास वाहतूक

Khabataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळ ट्रक बंद पडल्यामुळे सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक तब्बल ४ तास खोळंबली होती. एक माल ट्रक गुरुवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटातील सहाव्या वळणावरून दत्त मंदिर परिसरातून निघाला होता. … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या सातारा जिल्हा प्रमुखाचे फडणवीसांना साकडे; थेट केली ‘ही’ महत्वाची मागणी

Eknath Shinde Devendra Fadanvis News 20231103 171957 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते व सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच एक महत्वाची मागणी केली. खंडाळा तालुका वाढत्या औद्योगीकरणाला विजेचा अपुरा पुरवठा अडथळा ठरला आहे. यावर तोडगा काढून भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी जाधव यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. यावर फडणवीसांनी देखील हा … Read more

साताऱ्यातील रिअल इस्टेट एजंटचा खून करून मृतदेह पूरला; 2 महिन्यानंतर उघडकीस आली घटना

Satara Police News

सातारा प्रतिनिधी | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एका एजंटचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी माहिती घेवून काही जणांची धरपकड केली. तसेच सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हे कृत्य झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

माहिती न देणं पडलं महागात; ग्रामविकास अधिकाऱ्यास 25 हजारांचा दंड

Shirval Grampachayat News 20231008 095519 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एखादा प्रशासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आल्यास तो कामावर असताना त्याला त्याच्याकडे माहिती मागायला आल्यास ती देणे आवश्यक असते. मात्र, अनेकवेळा काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लोकांना माहितीच दिली जात नाही. नंतर त्याचा चांगला परिणाम त्या अधिकारी, कर्मचाऱ्यास सहन करावा लागतो. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये घडली. येथील ग्रामविकास अधिकारी … Read more

सराईत गुन्हेगार सातारा जिल्हयातून हद्दपार!; शिरवळ पोलीसांची कारवाई

Shirval Crime News 20230918 103108 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असलेल्या 26 वर्षीय युवकाला शिरवळ पोलीस ठाणे कडुन पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करून उपविभागीय अधिकारी वाई यांनी सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील भोर व पुरंधर या 2 तालुक्यातुन 2 वर्ष कालावधी करीता हद्दपार केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक सातारा समीर … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ गावातील 25 तरुणांकडून झाडावर बसून उपोषण; नेमकं कारण काय?

Khandala Taluka News 20230907 161458 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आतापर्यंत आपण अनेक प्रकारची आंदोलने अहिरे, ता. खंडाळा येथील कंपन्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावातील पारावर असणाऱ्या झाडावर चढून आंदोलन सुरू केले आहे. या झाडावर सुमारे 20 ते 25 तरुणांकडून उपोषण करण्यात आले. जोपर्यंत प्रशासन येत नाही व आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार तरुणांनी केला … Read more

काॅपर फाॅईल्स चोरीचा गुन्हा पोलिसांकडून 2 दिवसात उघड; 4 जणांना अटक

Shirwal Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रात्रीच्या वेळेस एका कंपनीतून तब्बल 10 लाख 58 हजार 400 रुपयांच्या किमतीच्या तांब्याच्या फाॅईल्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर शिरवळ पोलिसांनी दोनच दिवसांत या घटनेतील आरोपींचा शोध घेवून चौघांना ताब्यात घेतले आहे. अविनाश दिपक मछले ऊर्फ कोकाटे … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी बोगद्यातील वाहतूक 2 तासांसाठी बंद; नेमकं कारण काय?

Pune-Bangalore Highway Khambataki Tunnel News

सातारा प्रतिनिधी । सातारा – पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात स्विफ्ट कारच्या (MH-01 -BG-7760) बोनेटवर गुरुवारी लोखंडी अँगल आदळल्याची घटना गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर वाहनचालकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या पार्श्वभूमीवर खंबाटकी बोगद्याचे दुरुस्तीचे कामकाज आज दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेत केले जाणार आहे. तरी खंबाटकी बोगदा मार्गे सातारा बाजुकडून … Read more

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत 6 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पैशांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Crime News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात सध्या चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरे बुद्रुक येथील मधुकर कापसे यांच्या घराचे कुलूप तोडून रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरातील 6 तोळे सोने व 15 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील पिंपरे बुद्रुक हद्दीतील … Read more

एकास धडक दिलेली कार अचानक कोसळली कालव्यात; पुढं घडलं असं काही…

Dhoom Canal Car News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या महामार्गावर चार चाकी वाहनांचे अपघात होण्याच्या घटना वाढत आहे. दरम्यान, आज पुणे- सातारा महामार्गावर खंडाळा तालुका हद्दीत एका भरधाव वेगाने पुण्याहून सातारच्या दिशेकडे निघालेल्या कारने एका युवकाला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार धोम कालव्यात जाऊन कोसळली. यावेळी स्थानिकांनी प्रसंगावधान राखत कालव्यातील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाणाऱ्या कारमधील लोकांना वाचविले तर कारच्या … Read more