मतदान करतानाच हृदयविकाराचा धक्का, मतदाराचा जागीच मृत्यू, सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना

Satara News 77

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी दुपारपर्यंत चुरशीची मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असताना जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. मतदान करतानाच एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही घटना घडलीघडली असून शाम धायगुडे (वय 67) वर्षे असे म्रुत्यु झालेल्या मतदाराचे … Read more

शिरवळात विवाहितेने घरातच साडीने गळफास घेत संपवले जीवन; पती, सासू, पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल

Crime News 20241106 083519 0000

सातारा प्रतिनिधी | शिरवळ ता. खंडाळा येथील सटवाई कॉलनीतील विवाहितेने घरातच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. मोमीना शाहरुख पठाण (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त तसेच हुंड्याकरिता जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू व पतीचा मित्र या तिघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील मोमीना शेख … Read more

राज्य उत्पादन शुल्कची अवैध दारु वाहतुकीवर कारवाई; वाहनासह 7 लाख 86 हजार मुद्देमाल जप्त

Crime News 3

सातारा प्रतिनिधी । आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु विक्री व वाहतूकीवर गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाच्या वतीने आज खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावचे हद्दीत बेकायदेशीर दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी पुणे कडून साताराच्या दिशेने येणारी बेकायदेशीर देशी / विदेशी दारु व बिअरची वाहतूक पकडून दोघांना अटक करीत वाहनासह एकूण ७ … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रोकड, मद्य, वाहनांसह 1 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त, 45 जणांवर गुन्हा नोंद

crime News 20241103 093040 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील शिरवळ हद्दीत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगाराचा अड्डा पोलिसांनी उध्दवस्त केला. पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारून जुगाराच्या साहित्यासह रोकड, विदेशी दारू, दुचाकी, … Read more

खंडाळ्यात भूमी अभिलेख उपअधीक्षकांना 75 हजारांची लाच घेताना ACB कडून अटक

Khandala Crime News 20241023 084409 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक ऊर्मिला अशोक गलांडे (वय ४७, रा. समर्थ प्लाझा, पुणे) व युवा रोजगार कौशल्य योजनेतील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी ऊर्फ साक्षी शिवाजी उमाप (वय २८, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांच्यावर मंगळवारी साताऱ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून धडक कारवाई करत ७५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. त्यांच्यावर खंडाळा पोलिसात … Read more

बनावट ॲपच्या माध्यमातून तरुणाला 13 लाख रुपयांचा गंडा

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या पळशी येथील एका युवकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता ॲप डाउनलोड करायला लावले. अशा प्रकारे सायबर चोरट्यांनी एका युवकास तब्बल १३ लाख ३९ हजार ७७० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे घडली आहे. पंकज महादेव चव्हाण, असे गंडा घातलेल्या तरुणाचे नाव आहे. माहिती … Read more

शहीद जवान अमर पवार यांच्यावर बावडामध्ये आज अंत्यसंस्कार

Satara News 20241021 080036 0000

सातारा प्रतिनिधी | छत्तीसगड येथे नारायणपूर विभागातील नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत भूसुरुंगाचा स्फोट होऊन खंडाळ्यातील जवान अमर पवार हे शहीद झाले. त्यांचे पार्थिव येण्यास उशीर झाल्याने सोमवारी सकाळी 10 वाजता बावडा येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. खंडाळा तालुक्यातील बावडा येथील अमर पवार हे छत्तीसगड मधील नारायणपूर कॅम्पमध्ये असताना त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. यावेळी … Read more

साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण, माओवाद्यांशी लढताना आयडी स्फोटात शहीद

Satara News 20241019 212229 0000

सातारा प्रतिनिधी | छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना आज घडली आहे. शहीद जवानामध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बावडा येथील सुपुत्र अमर शामराव पवार यांचा समावेश आहे. त्यांच्या मृत्युच्या बातमीनंतर बावडा गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, छत्तीसगड या ठिकाणी नारायणपूर जिल्ह्यात ओरचा भागातून माओवाद्यांच्या विरोधात जंगलात अभियान राबवण्यासाठी डीआरजी … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर चालत्या कारने घेतला पेट; पारगाव खंडाळा हद्दीत अपघात

Car News 20241007 082318 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव खंडाळा गावच्या हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारने अचानक पेट घेतला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. रविवार रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- बेंगलोर महामार्गावरून काही जण कारने निघाले होते. त्यावेळी त्यांची कार पारगाव खंडाळा गावच्या … Read more

राष्ट्रध्वजाचा अपमान प्रकरणी केसुर्डीतील कंपनी व्यवस्थापकांसह दोघांना न्यायालयाने ठरवले दोषी

Crime News 20241002 074207 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स या आंतरराष्ट्रीय कंपनीमधील एका कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले. तर प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आठ दिवस साधी कैद सुनावली. केसुर्डी येथे थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. ३ मार्च … Read more

खंडाळा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ; सत्ताधारी-विरोधक एकमेकांना भिडले

Khanadala News 20240930 095201 0000

सातारा प्रतिनिधी | “आमचा कारखाना आम्हाला कधी मिळणार?”, असा सवाल उपस्थित करीत विरोधकांनी सत्ताधारी गटाला खंडाळा साखर कारखान्याच्या भागीदारी कराराची मुदत १८ वर्षाने वाढवल्याने वार्षिक सभेत धारेवर धरले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांची खडाजंगी झाली. दरम्यान “खंडाळा कारखान्यावरील कर्ज ज्या दिवशी फिटेल त्याच दिवशी हा करार संपुष्टात येईल”, असे सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर देखील गोंधळ कायम … Read more

पाडेगावात वसतिगृहातील खिडकीला दोरी बांधून 11 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Crime News 20240927 101915 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील समता कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीतील विद्यार्थ्यांने वसतिगृहातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास घडली. देवराज प्रशांत धोतरे (वय १६, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पाडेगाव (ता. … Read more