कास पठार ते कास धरण रस्त्यावर पाणीच पाणी; वाहनधारकांची कसरत

Satara News 7

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा शहरात पावसाची संततधार सुरु असून शहरालगत असलेल्या बामणोली परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना वाहने चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. अशात कास पठार ते कास धरण रस्ता मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला असल्याने त्यासाठी सातारा नगरपालिकेने तयार केलेला नवीन कच्चा पर्यायी रस्ताही पाणी साचून खचला आहे. … Read more

कास धरणाच्या पाणी पातळीत 5 फुटांनी झाली वाढ

Kas News 20240702 085412 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या पश्चिमेस कास धरणात मान्सूनपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस ४५ फूट पाणीसाठा शिल्लक राहिला होता. सध्या परिसरात मान्सूनची जोरदार हजेरी असल्याने मागील पंधरवड्यात पाणीपातळीत एका फुटाने तर चालू आठवड्यात संततधारेसह अधूनमधून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पाणीपातळीत चार फूट वाढ होऊन एकूण ५० फूट पाणीसाठा धरणात झाला आहे. कास धरणातून सातारा शहराला पाणीपुरवठा … Read more

कास तलावात जाणारा दोन टन कचरा सातारकरांच्या शेकडो हातांनी रोखला!

Kas News 20240611 205439 0000

सातारा प्रतिनिधी | ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’, असा जयघोष करत आज सातारा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सातारकर नागरिकांनी सुमारे दोन टन प्लास्टिक कचरा कास तलावाच्या पाण्यात जाण्यापासून रोखण्यात यश मिळवले. दोन तास शेकडो हातांनी कचरा गोळा करून कासचा परिसर स्वच्छ केला. कास तलाव हा सातारकरांचा मानबिंदू आहे. मात्र, प्लास्टिक कचरा टाकून पर्यावरणाला आणि कासच्या जलाशयाला प्रदूषित … Read more

जिल्ह्यातील कासवर उद्या 5 तासांची ‘प्लास्टिकमुक्त कास’ विशेष मोहीम

Kas News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याला पाणी पुरवठा करत असलेल्या कास तलावाभोवती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचला आहे. यामुळे सातारकरांना नळाद्वारे प्रदूषित पाणी पुरवठा होत आहे. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी सातारा पालिका व हरित सातारा ग्रुप यांच्या वतीने उद्या, रविवार, दि. ९ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत ‘प्लास्टिकमुक्त कास’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. … Read more

दिल्लीचे पथक साताऱ्यात; पथकातील महिला अधिकाऱ्यांनी दिवसभर केली कास धरणाच्या कामाची पाहणी

Kas News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला कास धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा हा केला जातो. या धरणाच्या उंचीची आणि पाइपलाईनच्या कामासाठी केंद्र शासनाच्या अमृत २ या योजनेतून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून युध्दपातळीवर काम सुरु असून या केंद्राच्या पथकाने काल कास येथे जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पथकातील महिला अधिकाऱ्यांना कास … Read more

साताऱ्याचा पाणीपुरवठा सोमवार, मंगळवारी राहणार बंद; नेमकं कारण काय?

Satara News 20240511 120059 0000

सातारा प्रतिनिधी | एन उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या राज्यात सर्वत्र भासत असताना सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. सोमवार (दि. १३) व मंगळवारी (दि. १४) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.या कामासाठी वेळ लागणार … Read more

कासच्या मुख्य जलवाहिनीला कासाणीमध्ये लागली गळती

Kas News 20240424 132934 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कास तलावाच्या जलवाहिनीला कासाणी गावाजवळ गळती लागली आहे. पाणीपुरवठा खंडित न करता, ही गळती काढण्याचा निर्णय सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. गळती काढण्याचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. सातारा शहराला प्रामुख्याने कास, शहापूर योजना आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. कास तलावाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे … Read more

साताऱ्यात पाण्याबाबत पालिकेकडून जुना निर्णय रद्द, असे आहे नवीन वेळापत्रक

Satara News 61 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील काही नागरिकांनी पाण्यासाठी मोकळे हंडे घेऊन रास्ता रोको देखील केला होता. यानंतर पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत कास व शहापूर योजनेतील उपलब्ध पाणीसाठ्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. सातारा पालिकेने दोन्ही योजनांच्या पाणीपुरवठ्यात कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी … Read more

कास धरणामुळे सातारकरांचा काय फायदा होणार?; खा. उदयनराजेंनी दिलं ‘हे’ उत्तर

Satara News 20231128 141154 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पुढील पन्नास वर्षांचा विचार करून कास धरणाची उंची वाढविण्यात आली आहे. धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या धरणामुळे शहराच्या विकासाचा वेग निश्चितच वाढेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, दुसऱ्या … Read more

‘कास’च्या मुख्य जल वाहिनीला गळती, साताऱ्याचा पाणीपुरवठा ‘इतके’ दिवस बंद राहणार

Satara Kas News 20231122 090700 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कास पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला कासाणी व आटाळी येथे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे पालिकेकडून उद्या गुरुवार, दि. २३ रोजीपासून गळती काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे गुरुवार व शुक्रवारी कास योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कास ही सर्वात जुनी पाणीयोजना असून, या योजनेतून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या … Read more

साताऱ्याच्या कासच्या कामाची पालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara kas News 20231108 131829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, सातारा नगरपालिका संचालनालयाच्या अधिकारी पल्लवी सोनवणे यांनी मंगळवारी या कामाच्या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली. तसेच सुरू असणारे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभिंयता दिलीप चिद्रे, … Read more

कास धरणाच्या नवीन जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरु

Kas News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला वरदायिनी ठरणाऱ्या कास धरणाच्या नवीन जलवाहिनीच्या कामास पालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. सध्या जलवाहिनी एकमेकांना जोडण्याचे काम सुरू असून पुढील आठवड्यात धरणातून बाहेर येणाऱ्या आऊटलेटला नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सातारा पालिकेच्या माध्यमातून कास धरणाची उंची वाढविण्यात आली असून पाणीसाठ्यात 0.1 टीएमसीवरून 0.5 टीएमसी इतकी वाढ झाली … Read more