कराड – पाटण मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘रास्तारोको’; ST Bus अडवत केले ठिय्या आंदोलन

karad patan raod students

कराड प्रतिनिधी | कराड- पाटण मार्गावर सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 7:30 या वेळेत एसटी बसेस थांबत नसल्याने आक्रमक झालेल्या महाविद्यालय मधील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आज सकाळी सुपने येथे एसटी बस रोखून धरत ठिय्या आंदोलन केले. यावेळी सुपने ग्रामपंचायत व विद्यार्थी यांच्याशी दुपारी एसटी अधिकारी यांची बैठक लावण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. कराड … Read more

महागाई, शेतकरी धोरणांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; कराडमध्ये आज युवा आक्रोश मशाल मोर्चा

congress protest karad

कराड प्रतिनिधी । बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षा घोटाळा, शेतकरी विरोधी धोरणांविरोधात शुक्रवारी महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या उपस्थितीत कराड शहरात युवा आक्रोश मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत हे कराडमध्ये दाखल झाले आहेत. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सोबत ते … Read more

इनरव्हील क्लबतर्फे उद्या अंगणवाडी सेविकांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबीर

Innerwheel Club

कराड प्रतिनिधी । इनरव्हील क्लबच्या वतीने आणि कृष्णा हॉस्पिटलच्या सहकार्याने शुक्रवार, दि. 25 ऑगस्ट रोजी अंगणवाडी सेविकांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तसेच ईसीजी तपासणी आयोजित करण्यात आली आहे. सदर तपासणी कार्वे-गोळेश्वर रोडवरील सिद्धार्थ मंगल कार्यालयात करण्यात येणार असून आशा सेविकांनी तपासणी करून घ्यावी. या शिबिरात सुमारे 700 अंगणवाडी सेविका तपासणीसाठी येणार आहेत. स्वतः डॉ. सुरेश भोसले, नर्सिग … Read more

कराड विमानतळाऐवजी पुसेगावात विमानतळ उभारा; श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Karad Airport

सातारा प्रतिनिधी । कराडच्या विमानतळ (Kaard Airport) विस्ताराऐवजी पुसेगाव (Pusegaon) येथे विमानतळ उभारावे या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हा परिषद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, विमानतळ विस्तार विरोधी कृती समितीचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, बागायती जमीन वाचलीच पाहिजे, भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा … Read more

उत्कृष्ट कार्याबाबत कराडचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांचा कोल्हापुरात वन विभागातर्फे सन्मान

Forest Department Wildlife Warden Rohan Bhate jpg

कराड प्रतिनिधी । वन क्षेत्रातील गुन्हे उघडकीस आणणे व वनसंरक्षण, वनसंवर्धन, जनजागरण यामध्ये कराडचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मंगळवारी स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात वन विभागाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरात मंगळवारी वन विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिन व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्र मधील … Read more

इर्शाळवाडीहून NDRF ची टीम थेट कराडात दाखल

NDRF Team Karad News

कराड प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इर्शाळ गडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडली. या ठिकाणचे बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर NDRF ची टीम आज बुधवारी दुपारी 3 वाजता कराडात दाखल झाली. सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली … Read more

कराडकरांचा स्वच्छतेचा संस्कार कौतुकास्पद : प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड 

Bapuji Salunkhe College News

कराड प्रतिनिधी । प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेबरोबर स्वतःच्या सीमित परिसराची स्वच्छता बाळगली तर काय होऊ शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कराड शहर होय. स्वच्छ शहराचा देश पातळीवर मिळालेला पुरस्कार ही त्याचीच पोचपावती आहे. आता एवढ्यावर थांबून चालणार नाही तर स्वच्छतेचा बालसंस्कारच आता रुजविणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही साळुंखे महाविद्यालयाच्या माध्यमातून कराड शहरात येत्या वर्षभरासाठी प्लास्टिक निर्मूलनाचा … Read more

कराडमध्ये शरद पवार अन् पृथ्वीराजबाबांचा ‘प्रीतिसंगम’

Sharad Pawar Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | संतोष गुरवसातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला तसाच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघही काँग्रेसचा बालेकिल्ला होय. या दोन्ही बालेकिल्ल्याचे शिलेदार आज कराडला एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. शरद पवार आज कराडात दाखल होताच राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी एकत्रिपणे त्यांचे स्वागत केले. यावेळी वयाच्या 83 … Read more

Karad News : मी साहेबांसोबतच… कराडात ठिकठिकाणी बॅनरबाजी

sharad pawar banners in karad

कराड । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह पक्षातून बंडखोरी केली आणि शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाले. येव्हडच नव्हे तर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केला आहे. पक्षात उभी फूट पडली असून आमदारांची विभागणी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील कराड तालुक्यात आमदार बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांकडून आम्ही शरद पवार … Read more

राजकीय भूकंपानंतर शरद पवार उद्या कराडात; स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी करणार अभिवादन

sharad pawar in karad

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे उद्या सातारा व कराड दौऱ्यावर येत आहेत. उद्या ठीक 10 वाजता कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी … Read more

एकनाथ शिंदे यांचे सैन्य भाडोत्री,BJP ला बाहेरुन घ्यावा लागतोय गद्दार मुख्यमंत्री; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut News

कराड प्रतिनिधी । रशियात ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांनी नेमलेले भाडोत्री सैन्य उलटले आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य भाजपाचे भाडोत्री सैन्य असून, हे सैन्य भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही. कारण शिंदे यांचे सैन्य भाडोत्री आहे. आणि भाजपलाही अशा बाहेरून गद्दार मुख्यमंत्र्यांना घ्यावं लागतंय, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

शंभूराज देसाई मालकमंत्री की पालकमंत्री? संजय राऊतांनी डागली तोफ

shambhuraj desai sanjay raut

कराड । शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे पालकमंत्री आहेत कि मालकमंत्री? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार निशाणा साधला आहे . तसेच येत्या निवडणुकीत तुम्ही पराभूत होणारच आहात असा इशाराही त्यांनी दिला. संजय राऊत आज कराड आणि पाटण दौऱ्यावर असून कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. … Read more