उदयनराजेंनी केली कराडातील होणाऱ्या मोदींच्या सभास्थळाची पाहणी; ‘या’ ठिकाणी होणार भव्य सभा

Karad News 20240421 220326 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या कराड येथील सैदापुरातील नियोजित सभास्थळाची आज पाहणी केली. उदयनराजे भोसले यांनी कराड शहरासह विद्यानगर, सैदापूर परिसरातील मान्यवरांशी व नागरिकांशी यावेळी संवाद साधला. महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून सध्या जिल्हाभर प्रचार केला जात आहे. त्यांनी आज कराड येथे … Read more

Narendra Modi : कराडात तब्बल 20 एकरावर नरेंद्र मोदींची ‘या’ दिवशी होणार भव्य सभा

Narendra Modi News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याकडून जोरदारपणे प्रचार केला जात आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज्यातील भाजपमधील अनेक दिग्गज उपस्थिती लावणार असून त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची कराडमध्ये येत्या मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी भव्य जाहीर सभा आयोजित … Read more

कराडात बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

karad News 87 jpg

कराड प्रतिनिधी । राष्ट्रीय NGO महासंघ संबंध संस्था शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशनच्या वतीने बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा कराड येथे बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी सुपर मार्केट, शनिवार पेठ,नगर परिषद शाळा क्रं.७/१२ येथे दुपारी १२.४० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बिगर हुंडा सामूदायिक विवाह सोहळा आयोजित केला असल्याची माहिती शंभूरत्न … Read more

भुल न देता अन् कोणत्याही चिरफाडी शिवाय ह्रदय रूग्णावर जिल्ह्यातील पहिली ‌‘टावी‌’ शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. विजयसिंह पाटील

20240404 072833 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ आणि इंटरव्हेन्शल कार्डिओलॉजीस्ट डॉ. विजयसिंह पाटील यांच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये ह्रदय रूग्णावर ‌‘टावी‌’ (ट्रान्स कॅथॅटर अवॉर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट) ही गुंतागुंतीची जिल्ह्यातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. विशेष म्हणजे भूल न देता आणि कोणतीही चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती डॉ. विजयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत … Read more

महामार्गावरील पादचारी पूल ‘या’ दिवशी पाडणार; महामार्गावरील वाहतुकीत होणार मोठा बदल…

Karad News 21 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे बंगळुरू महामार्गावरील कराड येथील खरेदी-विक्री पेट्रोल पंपासमोरील पादचारी पूल बुधवारी रात्री पाडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. हा पादचारी पुल दोन टप्प्यात पाडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस तसेच कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी आज कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा या … Read more

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी कराड तालुक्यातील मराठा समाजबांधवांचा निर्धार

Karad News 20240301 094116 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांची गुरूवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मराठा बांधवांच्या वतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सगेसोयर्‍यांबाबत अध्यादेश काढण्याचे आश्वासन देऊन शासनाने मराठा समाजाची फसवणूकच केली असल्याची संतप्त भावना कराडमधील मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. सत्ताधार्‍यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून एक ते दोन उमेदवारी … Read more

कराडात आज पुन्हा ‘एक मराठा लाख मराठा’; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचा ‘जेल भरो’

Karad News 11 1 jpg

कराड प्रतिनिधी । मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या १७ नोव्हेंबर रोजीच्या सभेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर गुन्हा दाखल करून नोटीस काढण्यात आल्यामुळे मराठा बांधव गुरूवारी जमावाने पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक आणि गोपनीय विभागाच्या कर्मचाऱ्यांची काही समन्वयकांना बुधवारी रात्री दत्त चौकात गाठले. त्यांची मनधरणी … Read more

DYSP अमोल ठाकूर यांच्याकडून कराडच्या विसर्जनस्थळाची पाहणी; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

Karad DYSP Amoll Thakur News jpg

कराड प्रतिनिधी । लाडक्या गणपती बाप्पाचे उद्या गुरुवारी अनंत चतुर्थीदिवशी विसर्जन केले जाणार असल्याने कराड शहरात पोलिस, पालिका प्रशासनाकडून विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून सीसीटिव्ही कॅमेरेद्वारे घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवले जात आहे. या दरम्यान कराड येथील कृष्णा नदीपात्रालगत विसर्जनस्थळी आज दुपारी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी … Read more

कराड येथील डुबल घराण्यात बसतो फक्त दीड दिवसाचा गणपती; थेट युद्धाशी आहे कनेक्शन

karad dubal family ganpati

गणेशोत्सव विशेष । मित्रानो, सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरु असून जनतेमध्ये अत्यंत उत्साहाने आणि आनंदाचे वातावरण आहे. प्रामुख्याने १० दिवस गणपतीची स्थापना करून ११ व्या दिवशी आपण गणेश विसर्ज करतो. काही ठिकाणी ५ तर काही ठिकाणी दीड दिवसाचा गणपती बसवला जातो. कराड येथील डुबल घराण्यात सुद्धा वर्षानुवर्षे दीड दिवसाचा गणपती बसवला जातो आणि वाजतगाजत गणेशाचे विसर्जनही … Read more

रक्षाबंधन करून परतताना दुचाकी अपघातात चिमुकलीसह तिघे जखमी; NDRF चे जवान ठरले देवदूत

karad accident

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगलोर महामार्गावर कराडपासून काही अंतरावर असलेल्या वहागाव गावच्या हद्दीत रक्षाबंधन करून परतत असणाऱ्या दुचाकीचा रस्त्यावरील डिव्हाईडरला धडकल्याने अपघात झाला आहे. महामार्गावर ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने सिमेंटचे डिव्हाईडर ठेवल्याने दुचाकी धडकली. यामध्ये एक ५ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून एक स्त्री व एक पुरुष हे किरकोळ जखमी झाले आहेत. ते तालुक्यातील देवकरवाडी येथील … Read more

चांद्रयान 3 च्या यशात काले गावातील प्रवीणचाही हातभार; बजावली ‘ही’ मोठी भूमिका

pravin kumbhar ISRO

कराड प्रतिनिधी । २३ ऑगस्टला भारताने चांद्रयान 3 मोहीम फत्ते करून नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. भारताच्या या यशानंतर संपूर्ण देशात उत्साह साजरा केला जात असून भारतीय अंतराळ संशोधन केंद्र असलेल्या ISRO च्या शास्त्रज्ञांचा गौरव केला जातोय. चांद्रयान ३ च्या या देदीप्यपणा यशात कराड … Read more

सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय कराडच्या वतीने इस्रोतील वैज्ञानिकांना अनोखे अभिवादन

sarswati vidyalaya karad

कराड प्रतिनिधी । जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय,कराडच्या वतीने चांद्रयान-3 मोहिमेस मिळालेल्या सफलतेचे स्वागत करुन विद्यार्थ्यांनी इस्रोतील वैज्ञानिकांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. विद्यार्थांनी चंद्र, चांद्रयान-3 व इस्रो या अवकाश प्रक्षेपण केंद्राची प्रतिकृती व राष्ट्रध्वज साकारून ‘NOW INDIA ON MOON’ असे दर्शविले. याप्रसंगी इस्रोच्या चांद्रयान मोहिमेच्या संपूर्ण माहितीसह विद्यार्थांनी केलेल्या रचनेची माहिती समन्वयक … Read more