टेंभू उपसा सिंचन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? : डाॅ. भारत पाटणकरांचा सवाल

Dr. Bharat Patankar 20230906 202745 0000 jpg

कराड प्रतिनिधी | टेंभू प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला मिळत नसल्याने प्रकल्प बाधीत शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची कराड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सवाल करत प्रशासनावर निशाणा साधला. टेंभू उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन 20 वर्ष झाली तरी देखील भूसंपादन होऊन काही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना अद्यापही … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात राजस्थानी जातीच्या गीर गायीच्या 2 वासरांचा मृत्यू

Karad News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील काही गावात अजूनही बिबटे आढळून येत असल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. अधूनमधून बिबट्याकडून कधी शेळ्यांवर तर कधी कुत्र्यांवर हल्ले केले जात आहेत. महाराष्ट्रातील कराड तालुक्यातील या बिबट्याकडून राजस्थानच्या गीर जातीच्या गाईंच्या वासरावर हल्ल केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारासकराड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत MIDC परिसरात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

तांबवे गावच्या सरपंच, उपसरपंचाचे सदस्यत्व रद्द करा !ग्रामपंचायत सदस्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

Tambave Village News

कराड प्रतिनिधी । स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी अशी कराड तालुक्यातील तांबवे या गावाची ओळख आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून अनेक घडामोडी घडल्या. मात्र, आता तांबवे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते म्हणजे तांबवे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाच्या एका प्रकरणामुळे. तांबवे ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे, विठोबा पवार व अन्य सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नुकताच एक … Read more

14 वर्षांनंतरही कराडच्या ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधवांच्या कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा प्रश्न अधांतरीच

Karad News 5

कराड प्रतिनिधी । सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात अनेक प्रश्न विरोधक सत्ताधाऱ्यांना विचारत असून त्याची ते उत्तरे देत आहेत. आतापर्यंत अधिवेशनात कराडचा विमानतळ, एसटी बसस्थानक प्रलंबित काम आदींचे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. मात्र, ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा विषय काही अधिवेशनात उपस्थित केला गेलेला नाही. त्यामुळे 14 वर्षांनंतरही या ऑलिम्पवीराच्या … Read more

पाणी टंचाईग्रस्त भागात तातडीने उपाययोजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत खंडाळा, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा या पाच तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. तसेच माण, खटाव, फलटण, कोरगाव, वाई, कराड या सहा तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. या गावात विहीर अधिग्रहण करण्याच्या अधिकाराला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यानी … Read more

कराड तालुक्यात तब्बल ‘इतक्या’ हजार हेक्टरवर पेरण्या रखडल्या

Farmers

कराड प्रतिनिधी । जुलै महिना सुरु झाला तरी पावसाच्या केवळ हलक्याशा श्री कोसळत आहे. तर गेल्या दोन दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा आभाळाकडं डोळं लावून बसला आहे. सध्या ऋतुमान बदलल्यामुळे पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे पेरण्यांचे नियोजनच कोलमडले आहे. कराड तालुक्यात पाहिल्यास आतापर्यंत केवळ दोन ते तीन टक्के क्षेत्रात पेरणी झाली असून 34 हजार हेक्टरवरील पेरण्या … Read more

सातारा जिल्ह्यात 131 नवी रेशनिंगची दुकाने सुरु होणार

District Supply Officer Vaishali Rajmane News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता रास्त भाव दुकानातून स्वस्त धन्याचा पुरवठा केला जातो. शासनाच्यावतीने पुरवठा करल्या जाणाऱ्या रास्त भाव दुकानांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामध्ये 131 नव्याने रास्त भाव दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. या दुकानांना मंजुरी देण्याच्या अनुषंगाने आज दि. 1 जुलै … Read more

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या अभ्यास समितीत पंजाबराव पाटील यांचा समावेश

Panjabrao Patil News

कराड प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात आला आहे. ‘शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी पैशांची गरज नसते तर सरकारच्या मानसिकतेची गरज असते. अशी समिती स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले असल्याचे बळीराजा संघटनेचे संस्थापक … Read more

नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा दाखल

jpg 20230625 232804 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील विंग येथे नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेप्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासूवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत विवाहितेची आई मिना अरुण कांबळे (रा. रविवार पेठ, बीड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून पती अनिकेत अंकूश माने व सासू राणी अंकूश माने (रा. … Read more

लाईट जाताच चोरटयांनी घातला धुमाकूळ; 7 ठिकाणी दागिन्यांसह नवीन कपड्यांवर मारला डल्ला

Crime News 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात ग्रामीण भागात चोरटयांकडून सध्या चांगलाच धुमाकूळ घातला जात आहे. रात्रीच्यावेळी चोरट्याकडून रोकड, सोने चांदीच्या दागिन्यांसह नवीन कपड्यांवर डल्ला मारला जात आहे. अशीच घटना कराड तालुक्यातील येळगाव येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या ठिकाणी अज्ञात चोरटयांनी ७ ठिकाणी घरफोडी करुन रोकड, सोने चांदीच्या दागिन्यांसह नवीन कपड्यांवर डल्ला मारला. रात्रीच्यावेळी लाईट … Read more

साताऱ्याचे सुपुत्र जवान सुरज यादव यांना नागा बॉर्डर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण

martyred Soldier Suraj Yadav

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे गावचे सुपुत्र व जवान सूरज मधुकर यादव हे आसाम दिवापूर येथे नागा बॉर्डरवर सेवा बजावत शहीद झाले. जवान सुरज यांनी रोइंगमध्ये राष्ट्रपती पदक पटकावले होते. त्यांची 14 वर्ष सेवा झाली असून ते 111 इंजीनियरिंग रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील येरवळे गावचे … Read more